संस्कृत सूची|संस्कृत स्तोत्र साहित्य|पुराण|दुर्गा सप्तशती|महा-चण्डी क्रम दुर्गा सप्तशती| माहिती आणि विधी महा-चण्डी क्रम दुर्गा सप्तशती ॥ प्रथम चरित्र॥ ॥ मध्यमचरित्र ॥ ॥ उत्तर चरित्र ॥ माहिती आणि विधी माहिती आणि विधी दुर्गा सप्तशती हिन्दू धर्मातील एक अत्यंत पवित्र ग्रंथ आहे, जो मार्कण्डेय पुराणाचा एक हिस्सा आहे. ह्यांत दुर्गामातेची महिमा आणि त्यांच्या पराक्रमाच्या कथा आहेत. Tags : durgadurga saptashatipothiदुर्गादुर्गा सप्तशतीपोथी माहिती आणि विधी Translation - भाषांतर महा-चण्डी क्रम दुर्गा सप्तशतीतंत्र ग्रंथ आणि निर्णय सिंधु वगैरे ग्रंथात वर्णिलेल्या दुर्गा सप्तशतीच्या विविध क्रम आपण महा-विद्या क्रम व चण्डीक्रम, बीजात्मक तंत्र क्रम, उत्कीलनक्रम व निकुंभला क्रम आणि महा-तन्त्री क्रम वाचले. आता आपण महा-चण्डी क्रम दुर्गा सप्तशती वाचणार. महा-चण्डी क्रम दुर्गा सप्तशतीचा पाठ विशेषकरून शत्रु नाश व ऐश्वर्य प्राप्ति साठी केला जातो. जर कोणी कार्य मेहनत केल्यावरसुद्धां सिद्ध होत नसेल आणि ते कार्य लवकर सिद्ध करण्याचे असेल तर श्रीदुर्गा सप्तशतीच्या महा-चण्डी क्रमानुसार दुर्गा सप्तशतीचा पाठ करावा. ह्याने माँ चण्डी प्रसन्न होऊन आपले सारे मनोरथ सिद्ध करेल. महा-चण्डी क्रमाचा पाठ चण्डी क्रमाच्या ठीक विपरीतअसतो. अतः ह्याला उग्र व तीक्ष्ण प्रयोग मानले जाते आणि ही क्रिया तन्त्रोक्त पण आहे. महा-चण्डी क्रम दुर्गा सप्तशतीमध्ये क्लीं, ह्रीं, ऐं क्रमानुसार पाठ केला जातो अर्थात पहिला महासरस्वतीचे उत्तर चरित्र आणि त्यानंतर महालक्ष्मीचे मध्यम चरित्र आणि शेवटी महाकालीच्या प्रथम चरित्राचा पाठ करावा. प्रत्येक श्लोकात क्लीं बीज मंचा सुरू व शेवटी ' या सर्वाबाधाप्रशमनं त्रैलोक्यस्याखिलेश्वरि । एवमेव त्वया कार्यमस्मद्वैरिविनाशनम् ॥ ' मंत्र सिद्ध करून महा-चण्डी क्रम दुर्गा सप्तशतीचा पाठ करावा. महा-चण्डी क्रम दुर्गा सप्तशतीचा पाठ करण्यापूर्वी माँ चण्डीचे (श्री दुर्गाजी किंवा नवदुर्गा, महाकाली, महालक्ष्मी व महासरस्वती) पूजन करावे. तत्पश्चात ग्रंथाचे पूजन करावे. शाप विमोचन मन्त्र, कवच, नवार्णमन्त्र न्यास सहित जप करावा. रात्रिसूक्तम् चा पाठ करून सप्तशतीचा न्यास पूर्वक पाठ करावा. शेवटी पुनः नवार्णमन्त्र व देवी सूक्तम् चा पाठ करावा. नवार्णमन्त्र वगैरे सम्पूर्ण दुर्गा सप्तशती पाठनुसार करावा. महा-चण्डी क्रम दुर्गा सप्तशती पाठ केल्यानंतर देवी सूक्तम् व नवार्णमन्त्र जप करून पाठ सम्पूर्ण करावा.॥ हवन विधि - महा-चण्डी क्रम दुर्गा सप्तशती ॥ महा-चण्डी क्रम दुर्गा सप्तशतीचे हवन तान्त्रोक्त मंन्त्रांनी करावे. प्रत्येक संपुटित श्लोकाशेवटी स्वाहा लावून हवन करावे आणि उत्तर चरित्राच्या प्रथम पासून नवम अध्यायपर्यंत शेवटी खालील मंत्रा हवन करावे-ॐ क्लीं जयन्ती सांगायै सायुधायै सशक्तिकायै सपरिवारायै सवाहनायै कामबीजाधिष्ठात्र्यै महासरस्व्त्यै नमः अहमाहुति समर्पयामि स्वाहा ॥मध्यम चरित्राच्या प्रथम पासून तृतीय अध्यायापर्यंत शेवटी खालील मंत्राने हवन करावेॐ ह्रीं जयन्ती सांगायै सायुधायै सशक्तिकायै सपरिवारायै सवाहनायै हृल्लेखाबीजाधिष्ठात्र्यै महालक्ष्म्यै नमः अहमाहुति समर्पयामि स्वाहा ॥प्रथम चरित्राच्या प्रथम अध्यायाच्या शेवटी खालील मंत्राने हवन करावे.-ॐ ऐं जयन्ती सांगायै सायुधायै सशक्तिकायै सपरिवारायै सवाहनायै वाग्बीजाधिष्ठात्र्यै महाकालिकायै नमः अहमाहुति समर्पयामि स्वाहा ।इति: श्री महा-चण्डी क्रम दुर्गा सप्तशती सम्पूर्ण ॥ N/A References : N/A Last Updated : August 15, 2026 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP