दुर्गा सप्तशती पाठ केल्यानंतर
दुर्गा सप्तशतीचा पाठ विशेषकरून शत्रु नाश व ऐश्वर्य प्राप्ति साठी केला जातो.
महा-चण्डी क्रम दुर्गा सप्तशती पाठ केल्यानंतर देवी सूक्तम् व नवार्णमन्त्र जप करून पाठ सम्पूर्ण करावा.
॥ हवन विधि - महा-चण्डी क्रम दुर्गा सप्तशती ॥
महा-चण्डी क्रम दुर्गा सप्तशतीचे हवन तान्त्रोक्त मंन्त्रांनी करावे. प्रत्येक संपुटित श्लोकाशेवटी स्वाहा लावून हवन करावे आणि
उत्तर चरित्राच्या प्रथम पासून नवम अध्यायपर्यंत शेवटी खालील मंत्रा हवन करावे-
ॐ क्लीं जयन्ती सांगायै सायुधायै सशक्तिकायै सपरिवारायै सवाहनायै कामबीजाधिष्ठात्र्यै महासरस्व्त्यै नमः अहमाहुति समर्पयामि स्वाहा ॥
मध्यम चरित्राच्या प्रथम पासून तृतीय अध्यायापर्यंत शेवटी खालील मंत्राने हवन करावे
ॐ ह्रीं जयन्ती सांगायै सायुधायै सशक्तिकायै सपरिवारायै सवाहनायै हृल्लेखाबीजाधिष्ठात्र्यै महालक्ष्म्यै नमः अहमाहुति समर्पयामि स्वाहा ॥
प्रथम चरित्राच्या प्रथम अध्यायाच्या शेवटी खालील मंत्राने हवन करावे.-
ॐ ऐं जयन्ती सांगायै सायुधायै सशक्तिकायै सपरिवारायै सवाहनायै वाग्बीजाधिष्ठात्र्यै महाकालिकायै नमः अहमाहुति समर्पयामि स्वाहा ।
इति: श्री महा-चण्डी क्रम दुर्गा सप्तशती सम्पूर्ण ॥
N/A
References : N/A
Last Updated : July 27, 2026

TOP