बुध ग्रह शांती पूजा

बुध ग्रहाचे अशुभ फल निवारण करण्याची शास्त्रोक्त विधी.


कमजोर (निर्बल) बुधाचे उपाय
जर बुध ग्रह कमजोर अर्थात निर्बल असेल तर सबल करण्यासाठी खालील उपाय (रत्नादि धारण) केले जाऊ शकतात.
रत्न : पन्ना।
उपरत्न : ओनेक्स.
जड़ी : विधाराची जडी.
दिन : बुधवार.
समिधा : अपामार्ग (चिड़चिड़ी)
धातु : स्वर्ण
९    ४    ११
१०    ८    ६
५    १२    ७
बुध यंत्र

बुध शांति मंत्र
वैदिक मंत्र (वाजसनेयी) : ॐ उद्‍बुध्यस्वाग्ने प्रतिजागृहि त्वमिष्टापूर्ते स  सृजेथामयं च ।
अस्मिन्त्सधस्थे अध्युत्तरस्मिन् विश्वेदेवा यजमानश्च सीदत ॥
वैदिक मंत्र (छन्दोगी) : ॐ अग्ने विवश्वदुषसश्चित्रां राध्नो अमर्त्य आदाशुषे ।
जातवेदो वहात्वमद्या देवो उषर्बुधः ॥
तांत्रिक मंत्र : ॐ ब्रां ब्रीं ब्रौं सः बुधाय नमः॥
एकाक्षरी बीज मंत्र : ॐ बुं बुधाय नमः॥
जप संख्या : ८०००

बुध शांति विधि :
बुध शांति
बुध शांति विधि
अग्नि स्थापन विधि
बुध मंत्र जप विधि
न्यास विधि :
ध्यान :
====
बुध शांति

आधार : बुध शांतिसाठी कर्मठगुरूंचा वर्णित विधिचा आधार ग्रहण केला गेला आहे.

मुहूर्त : बुध शांतीसाठी बुधवार दिवशी जर विशाखा नक्षत्र असेल तर त्या दिवसापासून नक्त व्रताचा आरम्भ करावा आणि ७ बुधवार पर्यंत नक्त व्रत करावे. सातव्या बुधवारी विधिवत बुध शांति करावी. प्रथम बुधवारी विशाखा नक्षत्राचा योग बुध शांतीचा मुहूर्त विशेष आहे.

नियम : प्रथम बुधवारपासून नक्तव्रत करावे.

मंत्र जप : मंत्र जपाचे तात्पर्य निर्बलता आणि अशुभता दोन्ही निवारण करणे आहे. बुध ग्रहासाठी मंत्र जप संख्या 8000 सांगितली आहे. हे ८००० जप ७ बुधवारी केले जाऊ शकतात. जर चतुर्गुणित अर्थात ३२००० जप करणे असतील  १५ ब्राह्मणांची आवश्यकता असेल जे ३२००० जप करतील.

शांति केव्हां करावी : वरील प्रमाणे विशाखा नक्षत्रापासून आरंभ करावी.
==
बुध शांति विधि, बुध शांति चे उपाय


पूर्वोक्त विधिनुसार ६ बुधवारी व्रत करून सातव्या बुधवारी बुध शांति करावी. शांति हेतु पूजा स्थानावर मध्यभागी हवन वेदी बनवावी व पूर्व भागात बुध पूजा निमित्त वेदी (अष्टदल) बनवावी. ईशान्या दिशेत नवग्रह वेदी बनवावी. नवग्रह वेदीच्या ईशान्य कोपर्‍यात कलश स्थापन हेतु अष्टदल बनवावे. सातव्या बुधवारी प्रातः काळी पूर्ववत नित्यकर्म संपन्न करून भगवान सूर्याला तांब्याच्या पात्रात रक्तपुष्पाक्षतयुक्त पाण्याने अर्घ्य देऊन पूजा स्थानावर सपत्नीक येऊन आसनावर बसावे..

ग्रंथि बंधनासाठी पवित्रीकरणादि विधी करावा.
त्यानंतर शान्ति पाठ अर्थात स्वस्तिवाचन करावे.
त्यानंतर गणेशाम्बिका पूजन करावे.
त्यानंतर त्रिकुशा, तिल, जल, पुष्प, चन्दन, द्रव्यादि घेऊन संकल्प करावा.

संकल्प : ॐ विष्णुर्विष्णुर्विष्णुः श्रीमद् भगवतो महापुरूषस्य, विष्णोराज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणोऽह्नि द्वितीये परार्धे श्रीश्वेत वाराहकल्पे वैवस्वत मन्वन्तरे अष्टाविंशतितमे कलियुगे कलि प्रथमचरणे भारतवर्षे भरतखण्डे जम्बूद्वीपे आर्यावर्तैक देशान्तर्गते ………… १ संवतसरे महांमागल्यप्रद मासोतमे मासे ………. २ मासे ………… ३ पक्षे ………… ४ तिथौ …………५ वासरे ………… ६ गोत्रोत्पन्नः ………… ७ शर्माऽहं (वर्माऽहं/गुप्तोऽहं) ममात्मनः श्रुति स्मृति पुराणतन्त्रोक्त फलप्राप्तयर्थं मम कलत्रादिभिः सह जन्मराशेः सकाशात् नामराशेः सकाशाद्वा जन्मलग्नात् वर्षलग्नात् गोचराद्वा चतुर्थाष्टमद्वादशाद्यनिष्ट स्थान स्थित बुधेन सूचितं सूचीष्यमाणं च यत् सर्वारिष्टं तद्विनाशार्थं सर्वदा तृतीयैकादश शुभस्थानस्थितवदुत्तमफल प्राप्त्यर्थं तथा दशांतरदशोपदशा जनित पीडाल्पायुरधिदैवाधिभौतिक आध्यात्मिक जनित क्लेश निवृत्ति पूर्वक दीर्घायु शरीरारोग्य लाभार्थं परमैश्वर्यादि प्राप्त्यर्थं श्रीबुध प्रसन्नतार्थं च बुधशांति करिष्ये ॥

(१ संवत्सरचे नांव, २ महीन्याचे नांव, ३ पक्षाचे नांव, ४ तिथीचे नांव, ५ दिवसाचे नांव, ६ गोत्राचे नांव, ७ ब्राह्मण शर्माऽहं, क्षत्रिय वर्माऽहं, वैश्य गुप्तोऽहं म्हणावे)

तत्पश्चात पुण्याहवाचन करावे,
नंतर आचार्यांना वंदन करून दिग्रक्षण करावे.
नंतर हवन विधी अनुसार पञ्चभूसंस्कार पूर्वक अग्निस्थापन करावा.
==
अग्नि स्थापन विधि

परिसमूह्य : ३ कुश गवताने स्थण्डिल किंवा हस्तमात्र भूमीची सफाई करावी. कुश गवताच्या ईशानकोपर्‍यात (अरत्निप्रमाण) त्याग करावा.
उल्लेपन : शेणाने ३ वेळा सारवावे.
 
अग्नानयन व क्रव्यदांश त्याग – कांस्यपात्र किंवा हस्तनिर्मित मृण्मयपात्रात झाकण लावून अग्नि घेऊन अग्निकोनात ठेवावे. वरील झाकण काढून थोडीशी क्रव्यदांश अग्नि (ज्वलतृण) घेऊन नैर्ऋत्यकोनात पाण्याने विझवावी.

अग्निस्थापन – दोन्ही हातांनी अग्नि स्थापित करावा :- ॐ अग्निं दूतं पुरोदधे हव्यवाहमुपब्रुवे । देवां२ आसादयादिह ॥ अग्नानयन पात्रांत अक्षत-जल शिंपडावे.
अग्निपूजन-उपस्थान – अग्नि प्रज्वलित करून पूजा करावी, नैवेद्य वायव्यकोनात ठेऊन स्तुति करावी : ॐ अग्निं प्रज्वलितं वन्दे जातवेदं हुताशनं। हिरण्यवर्णममलं समृद्धं विश्वतोमुखं ॥
अग्नि स्थापन केल्यानंतर अग्नि जळत राहण्याची व्यवस्था करून पुढील पूजन कर्म ककरावे.
==
नंतर नवग्रह मंडल स्थापन-पूजन करावी.
नंतर नवग्रह मंडलाच्या ईशान्य कोपर्‍यात अष्टदल बनवून कलश स्थापन पूजन करावे.
हवन वेदीच्या पूर्वेला अन्य वेदीवर अष्टदल बनवून, तांदळावर मृण्मय कलश स्थापन करावा, पूर्णपात्र हेतु कांस्याचे भांडे वापरावे.
नंतर बुधाच्या सुवर्ण प्रतिमेचे अग्न्युत्तारण करून कलशावर ठेवावे.
त्याला युगल शुक्लवस्त्र, शुक्ल गंधपुष्पाक्षत इत्यादींनी युक्त करून नंतर षोडशोपचार पूजन करावे.
तत्पश्चात ब्रह्मावरण करून पुढील हवन कर्म करावे. जर जप केला असेल तर जपाच्या एक दशांश होम करावा, अन्यथा अष्टोत्तरशत अथवा अष्टोत्तरसहस्र करावा.
हवन द्रव्य : दधि-मधु, घृताक्त अपामार्ग समिधा, शाकल्य सहित।
आरती करून मृण्मयकलश नदीसंगमात विसर्जित करावा.
नंतर मृण्मयकलशातील पाण्याने आचार्य यजमानाला अभिषेक करावा.
नंतर ग्रहस्नान करून बुध प्रतिमा, नीलवस्त्र, सुवर्ण, कांस्य, मुद्ग (मूंग), गरुत्मत (पन्ना),हस्तिदंत,पुष्पादि आचार्‍याला प्रदान करावे.
दान मंत्र : ॐ बुध त्वं बुद्धिजननो बोधवान् सर्वदा नृणाम्। तत्त्वावबोधं कुरु मे सोमपुत्र नमो नमः ॥
==
बुध मंत्र जप विधि

विनियोग : ॐ उद्बुध्यस्वेति मंत्रस्य परमेष्ठि प्रजापति ऋषिः, त्रिष्टुप् छन्दः बुधो देवता बुध प्रीत्यर्थे जपे विनियोगः॥

न्यास विधि :
देहन्यास : ॐ उद्बुध्यस्वेति शिरसि ॥
अग्ने प्रति ललाटे ॥
जागृहि त्वं मुखे ॥
इष्टापूर्त्ते हृदये ॥
पतिः उदरे ॥
स ᳪ सृजेथामयं च नाभौ ॥
अस्मिन्त्सधस्थे कट्यां ॥
अध्युत्तरस्मिन् ऊर्वोः ॥
विश्वेदेवा जान्वोः ॥
यजमानश्च गुल्फयोः ॥
सीदत पादयोः ॥

करन्यास : उद्‍बुध्यस्वाग्ने प्रतिजागृहि त्वं अंगुष्ठाभ्यां नमः ॥
इष्टापूर्त्ते तर्जनीभ्यां नमः ॥ स ᳪ सृजेथामयं च मध्यमाभ्यां नमः ॥
अस्मिन्त्सधस्थे अध्युत्तरस्मिन् अनामिकाभ्यां नमः ॥
विश्वेदेवा यजमानश्च कनिष्ठिकाभ्यां नमः ॥
सीदत करतल-करपृष्ठाभ्यां नमः ॥

हृदयादिन्यास : उद्‍बुध्यस्वाग्ने प्रतिजागृहि त्वं हृदयाय नमः

इष्टापूर्त्ते शिरसे स्वाहा ॥ स ᳪ सृजेथामयं च शिखायै वषट् ॥
अस्मिन्त्सधस्थे अध्युत्तरस्मिन् कवचाय हुँ ॥
विश्वेदेवा यजमानश्च नेत्रत्रयाय वौषट् ॥
सीदत अस्त्राय फट् ॥

ध्यान :
पीताम्बरः पीतवपुः किरीटी चतुर्भुजो दण्डधरश्च हारी ।
चर्मासिधृक् सोमसुतो धनुष्मान् सिंहाधिरुढो वरदो बुधश्च ॥

मंत्र : ॐ उद्‍बुध्यस्वाग्ने प्रतिजागृहि त्वमिष्टापूर्त्ते स ᳪ सृजेथामयं च ।
अस्मिन्त्सधस्थे अध्युत्तरस्मिन् विश्वेदेवा यजमानश्च सीदत ॥

N/A

References : N/A
Last Updated : June 10, 2026

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP