मराठी मुख्य सूची|अष्टक|निरंजनस्वामीकृत अष्टक| जन्मोनी व्रज गोकुळीं यदुक... निरंजनस्वामीकृत अष्टक जनस्थान गंगातटीं सव्याभाग... जन्मोनी व्रज गोकुळीं यदुक... श्रीकाशीपुरि क्षेत्ररक्षण... गोपालकृष्णाष्टक - जन्मोनी व्रज गोकुळीं यदुक... वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते. Tags : ashtakmarathiniranjam raghunathअष्टकनिरंजन रघुनाथमराठी गोपालकृष्णाष्टक Translation - भाषांतर जन्मोनी व्रज गोकुळीं यदुकुळीं मूर्ती बरी सावळीं ।शोभे भूषणयुक्त रूप बरवी मंडीत मुक्ताफळी ।ज्याचा पार अपार सार मथितां वेडावल्या त्या श्रुती ।सद्भावें नमितो लया यदुविरा गोपाळकृष्णाप्रती ॥१॥देहूडा पद ठेवुनी निशिदिनीं व्यक्ती बहू ठेंगणी ।लीला दाउनि फारसी बहु करी वेणूचिया सुध्वनी ॥पंचत्री न करी धरी बहु परी नाना अयूधाप्रती ।सद्भावें नमितों तया यदुविरा गोपाळकृष्णाप्रती ॥२॥माळाचक्र गळां सुशंख बरवा गोवर्धनातें धरी ।मर्दूनी फणिपाळ काळ रगडी पायांतळीं श्रीहरी ॥गाई वत्ससहीत युक्त बरव्या पादांबुजा चाटिती ।सद्भावें नमितों तया यदुविरा गोपाळकृष्णाप्रती ॥२॥कर्णीं कुंडल शोभताति बरवे मकराकृती ते बरे ।वाटे चंद्र दिवाकरासि उपमा निर्मीत हे दूसरे ॥हस्तीं कंकण शृंखळा बहुबर्या त्या सुप्रभा विलसती ।सद्भावें नमितों तया यदुविरा गोपाळकृष्णाप्रती ॥३॥माथा मूगुट साजिरा बहु बरा शोभे तयासी तुरा ।भाळीं टीळक रेखिला परिमळा चर्चूनिया केशर ॥स्वच्छंदें निजमस्तकीं धरितसे शिवसांबगौरीप्रती ।सद्भावें नमितों तया यदुविरा गोपाळ कृष्णाप्रती ॥५॥राधारुक्मिणि यूवत्या बहुबर्या दोहीकडे साजिर्या ।वस्त्रें भूषणयुक्त फार बरव्या लाहानशा गोजिर्या ॥पायांचे निकटीं वसे खगपती वैचित्र्य त्याची गती ।सद्भावें नमितों तया यदुविरा गोपाळकृष्णाप्रती ॥६॥गंगेपासुनि दीडयोजन असे मोहोदधी क्षेत्रहो ।नांदे त्यास्थळिं प्रेमयुक्त बरवा श्रीकृष्णगोपाळ हो ।ज्याचे पादपदांबुजासि नमितां जोडे बहू संपती ॥सद्भावें नमितों तया यदुविरा गोपाळकृष्णाप्रती ॥७॥ N/A References : N/A Last Updated : November 23, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP