मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|समग्र दिवाकर|एकांकिका|सगळेच आपण ह्य: ! ह्य: !| प्रवेश पाचवा सगळेच आपण ह्य: ! ह्य: ! प्रवेश पहिला प्रवेश दुसरा प्रवेश तिसरा प्रवेश चौथा प्रवेश पाचवा प्रवेश पाचवा नाट्यछटा हा साहित्यप्रकार मराठीत प्रथम ‘ दिवाकर ‘ यांनीच आणला. त्यांचे संपूर्ण नांव - शंकर काशीनाथ गर्गे Tags : diwakarदिवाकरनाट्यछटामराठी प्रवेश पाचवा Translation - भाषांतर [ स्थळ : राघोपंतांचा दिवाणखाना. समोरच पुस्तकांची चार कपाटे आहेत. मध्ये एक राऊंड टेबल असून त्याच्याभोवती खुर्च्यांवर राघोपंत, द्त्तोपंत व चिंतोपंत बसले आहेत. टेबलावर कपबशा आहेत. राघोपंत तिन्ही कप्समध्ये किटलीतून चहा ओततात. प्रत्येकजण आपापला कप घेऊन बशीत चहा ओतून पिऊ लागतो. पक् जवळच उभा आहे. ]राघोपंत : ( बिस्किटांचा डबा दत्तोपंताच्या पुढे सारुन ) घ्या हो, घ्या, बिस्किटे घ्या. द्त्तोपंत : ( एकदोन बिस्किटे घेऊन ) बाकी आज चहा फारच छान झाला आहे बोवा ! नाही चिंतोपंत ?चिंतोपंत : अहो, आजच काय ! राघोपंताच्या येथला चहा नेहमीच चांगला असतो. येथल्यासारखा चहा गावात कोठे नसतो तो !दत्तोपंत : नुसता चहाच काय, पण राघोपंताचे सगळेच चांगले असते.चिंतोपंत : यात काय संशय !राघोपंत : ह्य: ह्य: ह्य: ! आपले म्हणजे एक त्रिकुट आहे ना ! दत्तोपंतांवाचून राघोपंताला करमायचे नाही, राघोपंतावाचून चिंतोपंतांना करमायचे नाही ! अगदी त्रिमूर्ती दत्तात्रय ! दत्तोपंत : ह्य: ह्य: - चाललेच आहे.राघोपंत : जिथे जाल तिथे आपले तिघे ! काल नाटकालासुध्दा, तिघे बरोबर !चिंतोपंत : खरेच कालचे नाटक आपल्याला फारच आवडले बोवा !दत्तोपंत : मलासुध्दा फार आवडले, तोंडावर स्तुती व पाठीमागे निंदा करणार्या लोकांची ऐशी उडवली आहे त्याच्यामध्ये, की यंव !राघोपंत : जग पाहिले तर शिंचे असेच आहे. तोंडावर स्तुती आणि पाठीमागे निंदा, हे सगळीकडेच आहे ! ह्य: !चिंतोपंत : अहो, हे चालायचेच ! पाठीमागे शिव्या देत नाही कोण ? सगळे देतात ! पण पुन: समोरासमोर आलो, की, सगळे आपण - ह्य: ह्य: !राघोपंत : ह्य: ह्य: ! बहोत खाशी ! कविराज, बहोत खाशी !दत्तोपंत : बहोत खाशी ! ह्य: ह्य: !चिंतोपंत : बाकी मी तर म्हणतो की, अशा लोकांना मारे काठीखालीच झोडपून काढावे ! ह्य: ह्य: !राघोपंत : नाही तर त्याच्याहीपेक्षा चांगल्या तोंडातच भडकवाव्या - ह्य: ह्य: ह्य: !दत्तोपंत : नाही नाही ? चांगल्या लाथा मारुन तोंडघाशी पाडावे, तोंडघशी ! ह्य: ह्य: ह्य: ! [ सगळेच ’ कशी फजिती केली !’ अशा भावनेने एकमेकांकडे पाहून मोठमोठ्याने हसू लागतात. तोच पकही ’ कशी फजिती केली ! कशी फजिती केली ?’ असे म्हणून मोठमोठ्याने हसू लागतो. तिघेही चकित होऊन एकमेकांकडे पाहू लागतात. ] N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP