मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|समग्र दिवाकर|निपात्री संवाद| पाऊस निपात्री संवाद शेवटची किंकाळी रिकामी आगपेटी भर चौकात ती बिचारी रडतेच आहे ! निजलेले मूल प्रवासी सुट्टी ! शाळेला सुट्टी !! पाऊस पाऊस नाट्यछटा हा साहित्यप्रकार मराठीत प्रथम ‘ दिवाकर ‘ यांनीच आणला. त्यांचे संपूर्ण नांव - शंकर काशीनाथ गर्गे Tags : diwakarदिवाकरनाट्यछटामराठी पाऊस Translation - भाषांतर [ स्थळ : कोणते ते वाचताना हळूहळू समजेलत. पात्रे - हवेचे परमाणू. ]हुश्श ! काय रखरखीत ऊन पडले आहे !आणि पोटात तर पाण्याचा लवलेश नाही !पा....णी ! पोटभर तरी चांगले पाणी प्यायला द्या हो !ठेवले आहे आता चांगले पाणी !हे तर बाबा नेहमीचेच आहे ! कसे चांगले छानदार आणि हवे तितके पाणी येते. पण आपले वाहून जाते !मग आहेच आता जुनाट विहिरीतील आणि तळ्यातील नासके, सडलेले पाणी ! प्या ते आता !सगळाच मूर्खपणा ! जुने ते घाणेरडे म्हणून त्यातला गाळ काढला नाही, आणि नवे फार होईल.....सोसायचे नाही म्हणून त्याची काळजी घेतली नाही !शेवटी आपले कोरडे ते कोरडेच !पहा कशी जिकडे तिकडे प्रेतकळा आली आहे ती !निराशा आणि भीती यांनी तर आपण गांगरुन गेलो आहोत बुवा !काय पुढे होणार तरी काय आपले ?दुसरे काय व्हायचे ? मरायचे झाले आता !नाही रे ! मला वाटते अजून आपला यातून निभाव लागेल !नाही नको ! अहो, कुठे काही चांगुलपणा असेल तर निभाव लागेल ना ? सगळा अप्पलपोटेपणा !टिप्पुसभर पाणी ! पण त्यासाठी कापतो आहोत दिवसाढवळ्या एकमेकांचे गळे !राम राम ! कोण घाण.... आणि दुर्गधी सुटली आहे ही !पा....णी ! पा.....णी !छे ! छे ! कोण पाण्यासाठी धावपळ ही !आणि काय धुळीचे लोटचे लोट हे !अहो, जीव कासावीस झाला ! गुदमरुन मेलो ! पाणी !अरे, मग निष्कारण धावता आहा काय असे ? मूर्ख कोठले !पळा ! पळा ! स्वस्थ बसू नका !काय स्वस्थ काय बसू नका ! फुकट नाश होईल झाले अशा धावण्याने !पण नाशच होईल हे कशावरुन !हो, झालाच तर कदाचित् फायदा होईल यातून !ठेवला आहे फायदा ! कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही, आणि नाही कोणी कोणाला विचारीत, तेव्हा कसला आला आहे फायदा ?काही असो ! सगळीकडे अस्वस्थता झाली आहे ना ? ठीक आहे ! तीच जितकी आता वाढेल तितकी - पळा !अहोहो ! काय वादळ सुटले आहे हे ! धूळच धूळ ! काही दिसले तर शपथ !नको नको ! परमेश्वरा, सोडीव रे बाबा या यातनातून !ठेवला आहे आता परमेश्वर ! आधी पळा ! आटपा लवकर !कोण वेडेपणा हा ! अगदी पिसाळून गेले आहेत की !आहो ! आले ! आले ! आकाशात ढग जमत चालले !अरे, मग आता तरी उगीच धावू नका ! नाही तर चांगले आलेले ढग पार नाहीसे होतील. काय बिशाद आहे नाहीसे होतील ! आटपा लवकर ! उगीच आता आळस करु नका !लागला ! पाऊस पडायला लागला !पाऊस ! पाऊस !!वेड लागले आहे वेड ! पाऊस कसा चांगला पडायला लागला आहे आणि आता का रे उगीच धावपळ ?खरेच आहे ? पाऊस कसा आयता पडतो आहे ! तो तरी आता नीट पडू द्या !कुछ नही ! असला अर्धवट पाऊस नही मंगता है !मारे धुव्वा उडायला पाहिजे !बरोबर ! चांगला जोराचा पाऊस पडायला हवा !अहो पडायचा काय म्हणून ? चांगला झोडपून पाडला पाहिजे !अरे राम ! काय पाऊस तरी हा !पाहिलेत ? मघाशी अतिशय धूळ, आता अतिशय पाऊस ! सगळा अतिरेकच !दोन्हीकडून मरण !येऊ द्या हो ! मरायचेच तर धावपळीने तरी मरु !बापरे ! काय जिकडे तिकडे पाणीच पाणी झाले आहे हे !किती दिवसांच्या जुनाट विहिरी आणि तळी ! पण ती सुध्दा ..... नवजीवनाने तुडुंब भरुन वाह्यला लागली आहेत !याचे नाव काम ! घाण म्हणून आता राहिली नाही ! पार सगळी ....हं: ! काय मघाशी धूळ उसळली होती हो !पण राव, आधी इतकी धूळ उडाली, म्हणूनच हा इतका पाऊस झाला ना ?खरे आहे बोवा !चार थेंब पडल्याबरोबर स्वस्थ बसलो नाही, हे किती चांगले केले ?तर काय ! थोडक्यात समाधान मानले, आणि अर्धवटपणा केला असता की वाटोळंच !अहो, तेच आजपर्यंत भोवले !बाकी कैक दिवसात असा पाऊस झाला नव्हता, नाही ?वाहवा ! काय जिकडे तिकडे टवटवी आली आहे !तसेच मघाशी अक्राळविक्राळ आणि भेसूर दिसणारे हे ढग निरनिराळ्या तेजस्वी रंगानी काय खुलले आहेत पण !अरे भाई आधी इकडे बघ ! केवढे रे झाड पडले आहे हे !खरेच की !ऍं ! होते काय त्यात ! सगळे वठून तर गेले होते !बिचारी लहान लहान झाडे तर मोजायलाच नकोत !हे काय बोलणे ! वादळ म्हटले, म्हणजे असेच व्हायचे !ओहो ! काय झकास इंद्रधनुष्य पडले आहे हे !तो पहा ! खोपटाबाहेर आपली मेंढरे घेऊन आलेला तो म्हातारा....सूर्यप्रकाशात किती गंभीर आणि तेज:पुंज दिसत आहे !पक्ष्यांची किलबिलसुध्दा किती गोड लागते आहे !घाणीने आणि धुळीने भरुन गेलेले मघाचे हे वातावरण, आता कसे अगदी शुध्द आणि पवित्र होऊन गेले आहे, नाही ?आणि सर्व चराचर प्रेमाने किती आर्द्र झाले आहे !अहाहा ! जिकडेतिकडे गुलाबच गुलाब उधळून भगवान सूर्यनारायण पहा कसे आपले अभिनंदन करतो आहे ! धन्य आहे ! हे सूर्यनारायणा ! N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP