संस्कृत सूची|पूजा विधीः|श्रीसूक्तविधानम्|सामान्यजपनियमा:| जपप्रसंगेनोक्तं सामान्यजपनियमा: सामान्यजपनियमा: नामसुधायां जपप्रसंगेनोक्तं पुरश्चरणकर्तुर्विशेषा: जपप्रसंगेनोक्तं प्रस्तुत ग्रंथात मंत्र, व्याख्यान, मराठी अर्थ आणि मंत्रविधान एकत्र मिळाल्याने जिज्ञासूंची तृप्ती पूर्ण होईल असा विश्वास आहे. Tags : hindupoojasrisooktvidhiपूजाविधीश्रीसूक्तहिंदू जपप्रसंगेनोक्तं Translation - भाषांतर यत्तु तंत्रे जपप्रसंगेनोक्तं - अशुचिर्वा शुचिर्वापि गच्छन् तिष्ठन् स्वपन्नपि । मंत्रैकशरणो विद्वान् मनसैव सदा चरेत् ॥ न दोषो मानसे जापे सर्वदेशेऽपि सर्वदा । जपनिष्ठो द्विजश्रेष्ठोऽखिलयज्ञफलं लभेत् ॥ इत्येतदपि नामस्मरणपरं न तु उपदिष्टमंत्रजपविषयमम् ।आचाररत्नाद्याकरग्रंथविरोधात् ॥ इत्यलं प्रसक्तानुप्रसक्त्या ॥ अर्थ :--- याप्रमाणें बहुविध नियम त्या त्या ग्रंथांत सांगितले आहेत. त्यांचें देशकालादिपरिस्थित्यनुरुप यथाशक्ति आचरण करावें. सौभाग्यकल्पद्रुमामध्यें हेंच स्पष्ट आहे. या वचनांत रोगी हें पद आपद्रस्त प्रापंचिकाचेंही उपलक्षण आहे. यांत एक गोष्ट अवश्य लक्षांत घ्यावी कीं, हे सर्व नियम गुरुमुखानें घेतलेल्या उपासनेच्या मंत्राविषयीं आहेत. नामस्मरणाविषयीं नाहींत. भगवन्नामस्मरण हें केव्हांही ग्रहण करावें. त्याला दोष नाहीं हें भागवतांत स्पष्ट आहे. वामनपंडितांनीं हेंच नामसुधेंत सांगितलें आहे. तंत्रग्रंथांतील जपप्रसंगानें “अशुचिर्वा शुचिर्वापि” हें लिहिलेलें वचन नामस्मरणपरच समजावें. गुरुपदिष्टमंत्राचें नाहीं.याप्रमाणें जपसामान्यनियम सांगितले. आतां पुरश्चरण करणाराचे विशेष नियम सांगतों. References : N/A Last Updated : May 24, 2018 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP