TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

अथ काल:

प्रस्तुत ग्रंथात मंत्र, व्याख्यान, मराठी अर्थ आणि मंत्रविधान एकत्र मिळाल्याने जिज्ञासूंची तृप्ती पूर्ण होईल असा विश्वास आहे.


अथ काल:
विश्वामित्रकल्पे - ‘ज्येष्ठाषाढौ भाद्रपदं पौषं तुमलमासकम्‌ । अंगारसनिवारौ च व्यतीपातं च वैधृतिम्‌ ॥ अष्टमीं नवमीं षष्टी चतुर्थीं च त्रयोदशीम्‌ । चतुर्दशीं अमावास्यां प्रदोषे च तथा निशि ॥ यामाग्निरुद्रसार्पेन्द्रवसुश्रवणजन्मभम्‌ । मेषकर्कतुलाकुंभमकरालिकलग्नयुक्‌ ॥ सर्वाण्येतानि वर्ज्यानि पुरश्चरणकर्मणि । चंद्रतारानुकूले च शुक्लपक्षे विशेषत: ॥ पुरश्चरणकं कुर्यान्मंत्रसिद्धि: प्रजायते ।’ इति ।
अत्र सामान्यकालविचारे यद्यपि अष्टमी नवमी च्द तिथिर्निषिद्धोक्ता  तथापि अत्र श्रीसूक्तानुष्ठाने नैव तयोर्वर्जनीयत्वम्‌ । तथांगारकवारोऽपि देव्या: प्रियत्वात्‌ । तदुक्तं चं. दीपिकायां - ‘यस्य देवस्य यो वार: तिथिर्नक्षत्रमेव च । नैव तत्र प्रकर्तव्या शुबाशुभविचारणा ।’ ज्योति:शास्त्रेऽपि - ‘कार्या विद्योक्तभैदींक्षा स्वदेवतिथिभेषु च’ इति । रविसोमवुधगुरुशुक्रवारा: प्रशस्ता: । अंगारकोऽप्यत्र । यद्यपि कृष्णान्म्गचतुर्दिनं निषिद्धं तथापि देवीपुरश्चरणे शुक्लप्रतिपन्निषेधं नावहति । ‘आरभ्य शुक्लप्रतिपद्‌’ इति पूर्वोक्तवचनेन साक्षात्‌ तत्र श्रीसूक्तपुरश्चरणारंभकाललविधानात्‌ इति । योगे तु‘विव्याशूवगंडातिषु, त्र्यंकार्थांकरसर्तुपूर्वघटिका: संत्यजेत्‌ । परैघस्य पूर्वं दलम्‌ । व्यतीपातवैधृतौ संपूर्णौ वर्ज्यौं’ । तथा विष्टिसंज्ञकं करणं नाम भद्रा, गुरुशुक्रास्तौ च वर्ज्यौ ।

Translation - भाषांतर
कोणत्याहि पुरश्वरणानुष्ठानाकरितां ज्येष्ठ, आषाढ, भाद्रपद, पौष आणि मलमास वर्ज्य करावे. अर्थात्‌ चैत्र, विशाख, श्रावण, आश्निन, कार्तिक, मार्गशीर्ष, माघ, फाल्गुन हे आठ महिने शुभ होत. आश्विनमास, शरद्‌ऋतु, चैत्रांतील देवीनवरात्र हा काल देवीला प्रिय असल्यानें प्रकृत श्रीसूक्तानुष्ठानाला अत्यंत शुभ, समजावा, पौषमास निषिद्ध असला तरी त्यांत शाकंभरीनवरात्र हा देव्यत्सवाचा काल असल्यानें हें नवरात्र प्रकृतपुरश्वरणाला ग्रहण करावें. शुक्लपक्ष प्रशस्त आहे.‘कृष्णपंचमी’ किंवा ‘कृष्णाश्चांत्यत्रिकं विना’ या वचनानुसार कृष्णदशमीपर्यंत गौणत्वानें कृष्णपक्ष घ्यावा. रवि, सोम, बुध, गुरु, शुक्र, हे वार शुभ होत. मंगळवार देवीचा वार मानला असल्यानें श्रीसूक्तानुष्ठानार्थ घ्यावा. तिथींमध्यें अष्टमी, नवमी, चतुर्दशी, षष्ठी, त्रयोदशी, अमावास्या या तिथि सर्वसामान्य निषिद्ध आहेत. तथापि ‘अष्टभ्यां च चतुर्दश्यां नवम्यां चैकचेतस:’ इति सप्तसतीरहस्ये
उक्तत्वात्‌’ अष्टमी, नवमी, कृष्णचतुर्दशी ग्रहण करावी. कारण चं. दीपिकेमध्यें ज्या देवतेचा जो वार, तिथि अथवा नक्षत्र विहित असेल तें त्या देवतेच्या आराधनेकरतां
घेण्यास हरकत नाहीं. त्यांत शुभाशुभविचारणा नको असें स्पष्ट आहे. तसेंच स्रीसूक्ताच्या ऋगात्कम पौरश्चरणाला शुक्लप्रतिपदेलाच आरंभ सांगितला असल्यानें
‘कृष्णानंगचतुर्दिनं’ हा निषेध येथें येत नाहीं. वैधृति व्यतिपात योग संपूर्ण वर्ज्य करावे. विष्कंभ ३, व्याघात ९, शूल ५, वज्र ९, गंड ६, अतिगंड ६, अशा क्रमानें
या घटी प्रथमच्या टाकाव्या. भद्रा करण, गुरु - शुक्रारत, मलमास वर्ज्य करावा. भरणी, कृत्तिका, आश्र्लेषा, ज्येष्ठा, आर्ता, श्रवण, धनिष्था व जन्मनक्षत्र वर्ज्य करावें. तथापि
श्रवण विष्णुदेवताक असल्यानें विष्णूचे आराधनेकरतां घ्यावें. तसेंत आर्द्रा शिवदेवताक असल्यानें शंकरप्रित्यर्थ अनुष्ठानाला घ्यावें. आताम रोगादिपरिहारांर्थ, आतुरमहासंकट
इत्यादिप्रसंगीं देवताराधन अत्यावश्यक असेल व कालविशुद्धि विलंबानें मिळत असेल तर मासादि गुरुशुक्रास्तादिकांचा विचार करू नये. या प्रसंगीं सामान्य दिनशुद्धि पाहून त्या त्या देवतेचें आराधन करावें. इति कालविचार:.


References : N/A
Last Updated : 2018-05-24T14:14:49.1170000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

male pseudohermaphrodite

  • मिथ्या उभय लिंगाभ पुरुष 
RANDOM WORD

Did you know?

लग्न ठरवितांना पत्रिका पाहणे किती योग्य आहे? पत्रिका पाहूनही कांही विवाह अयशस्वी कां होतात
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site