मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|देवांच्या भूपाळ्या| पहाटेच्या भूपाळ्या देवांच्या भूपाळ्या निरंजन स्वामीकृत भूपाळ्या उठा उठा हो सकळिक । वाचे स... घनश्याम सुंदरा श्रीधरा अर... उठा प्रातःकाळ झाला । मारु... ऊठिं गोपालजी जाइं धेनुंकड... जाग रे जाग बापा । विश्र्व... उठोनियां प्रातःकाळी । जपा... उठा उठा हो वेगेंसी । चला ... पहाटेच्या भूपाळ्या राम कृष्ण विष्णु गोविंद ॥... उठि उठि वा पुरुषोत्तमा ऊठ गोपाळजी ! जाय धेनूंकडे... उठा प्रातःकाळ झाला । ... धवळे भोळे चक्रवर्ती । धवळ... उठोनियां प्रातःकाळीं । वद... प्रातःकाळीं प्रातःस्नान ।... जन म्हणा हो श्रीहरि । प्र... उठिं उठिं बा पुरुषोत्तमा ... दत्तदिगंबरा , ऊठ करुणाकरा... पहाटेसी उठोनि भक्त हर्षुन... उठिं उठिं बा दत्तात्रेया... उठी उठी बा मुनिनंदना । भक... उठीं उठी श्रीदत्तात्रेया ... उठीं उठीं बा आत्मया । चिन... उठी सत्त्वर प्रभुवरा यतिव... पाहें पाहें सद्गुरुमूर्त... उठीउठी बा श्रीगुरुवरा । श... उठि उठि दत्तात्रेया । करु... ऐका भोळे भाविकजन । नित्य ... पहाटेच्या भूपाळ्या देवाला जागे करण्यासाठी पहाटे जी गाणी म्हणतात, त्यांना 'भूपाळी' म्हणतात.Poems that can be sung early morning while remembering God Ganaesha. Tags : bhoopaliभूपाळीमराठी पहाटेच्या भूपाळ्या Translation - भाषांतर १योगियां दुर्लभ तो म्यां देखिला साजणी ।पाहतां मना न पुरे धणी ॥१॥देखिला देखिला मायें देवांचा देवो । फिटला संदेहो निमालें दुजेपण ॥२॥अनंत रूपें अनंत वेषें देखिलें म्यां त्यासी । बापरखुमादेवीवरु खुण बाणली कैसी ॥३॥२अवतारची राशी तो हा उभा विटेवरी ।शंखचक्रगदापदम्सहित करीं ॥१॥देखिला देखिला देवाधिदेव बरवा ।समाधान जीवां पाहतां वाटे गे माये ॥२॥सगुण चतुर्भुज तेज पुंजाळती ।वंदुनी चरणरज नामा विनवितसे पुढती ॥३॥३करुनि विनवणी पायीं ठेवितो माथा ।परिसावी विनंति माझी पंढरीनाथा ॥१॥अखंडित असावें ऐसें वाटतें पायीं ।साहोनि संकोच ठाव थोडासा देई ॥२॥असो नसो भाव आलों तुझिया ठाया ।कृपादृष्टी पाहे मजकडे पंढरिराया ॥३॥तुका म्हणे आम्ही तुझी वेडीं वाकुडीं ।नामें भवपाश हातें आपुल्या तोडी ॥४॥४माझे चित्त तुझे पायीं । राहे ऐसें करी कांही ।धरोनियां बाही । भव हा तारी दातारा ॥१॥चतुरा तूं शिरोमणी । गुणलावण्याची खाणी ।मुकुट सकळां मणी । धन्य तूंचि विठोबा ॥२॥करी या तिमीराचा नाश । उदय होऊनि प्रकाश ।तोडी आशा पाश । करी वास हृदयीं ॥३॥पाहें गुंतलों नेणतां । माझी असो तुम्हां चिंता ।तुका ठेवी माथा । पायीं आतां राखावें ॥४॥५ऐसी वाट पाहे कांही निरोप कां मूळ ।कां हो कळवळा तुम्हां उमटेचिना ॥१॥अहो पांडुरंगे पंढरीचे निवासे ।लावोनियां आसे चाळवुनि ठेविलें ॥२॥काय जन्मा येऊनियां केली म्यां जोडी ।हाचि घडीघडी चित्तां येतो आठव ॥३॥हाचि म्हणे खरा न पविजे विभाग ।धिक्कारितें जग हाचि लाहें हिशोब ॥४॥६बोलोनियां दाऊं कां तुम्ही नेणाजी देवा ।ठेवाल ते ठेवा तैसा राहेन ॥१॥पांगुळलें मन कांही नाठवे उपाय ।म्हणऊनि पाय जीवीं धरूनि राहिलों ॥२॥त्याग भोग दु:ख काय सांडावे मांडावें ।ऎसी धरियेली जीवें माझ्या थोर आशंका ॥३॥तुका म्हणे बाळ माता चुकलिया वनीं ।न पवतां जननी दु:ख पावें विठठले ॥४॥७कां गा केविलवाणा केलो दिनाचा दीन ।काय तुझी हीन शक्ति झालीसे दिसे ॥१॥लाज वाटे मना तुझा म्हणवितां दास ।गोडी नाहीं रस बोलिलिया सारिखी ॥२॥लाजविलीं मागें संतांची हीं उत्तरें ।कळो येतें खरें दुजें एकावरूनी ॥३॥तुका म्हणे माझी कोणी वदविली वाणी ।प्रसादावांचुनि तुमचिया विठठला ॥४॥८जळो माझें कर्म वाया केली कटकट ।झालें तैसें तट नाहीं आलें अनुभवा ॥१॥आतां पुढें धीर काय देऊं या मना ।ऎसें नारायणा प्रेरिलें तें पाहिजे ॥२॥गुणवंत केलों दोष जाणायासाठीं ।माझें मज पोटीं बळकट दूषण ॥३॥तुका म्हणे अहो केशीराजा दयाळा ।बरवा हा लळा पाळियेला शेवटीं ॥४॥९जळोत तीं येथें उपजवितीं अंतराय ।सायासाची जोडी माझी तुमचे पाय ॥१॥आतां मज साह्य येथें करावें देवा ।तुझी घेई सेवा सकळ गोवा उगवोनी ॥२॥भोगें रोगा जडोनियां दिलें आणिका ।अरुचि ते हो कां आता सकळांपासूनी ॥३॥तुका म्हणे असो तुझे तुझे मस्तकीं ।नाही ये लौकिकीं आतां मज वर्तणें ॥४॥१०न सांगतां तुम्हां कळों येतें अंतर ।विश्वीं विश्वंभर परीहारचि नलगे ॥१॥परि हें अनावर आवरितां आवडी ।अवसान तें घडी पुरों एकी देत नाहीं ॥२॥काय उणें मज येथें ठेवलिये ठायीं ।पोटा आलें तई पासुनियां समर्थे ॥३॥तुका म्हणे अवधी आवरली वासना ।आतां नारायणा दुसरियापासूनी ॥४॥११तुजसवें आम्ही अनुसरलें अबळा ।नको अंगीं कळा राहो हरीहीन देऊं ॥१॥सासुरवासा भितो जीव ओढें तुजपाशी ।आतां दोहींविषीं लज्जा राखे आमुची ॥२॥न कळतां संग झाला सहज खेळतां ।प्रवर्तली चिंता मागिलाचि यावरी ॥३॥तुका म्हणे असतां जैसें तैसें बरवें ।वचन या भावें वेंचूनियां विनटलों ॥४॥१२कामें नेलें चित्त नेदी अवलोकूं मुख । बहु वाटें दु:ख फुटों पाहे ह्रदय ॥१॥कां गा सासुरवासी मज केलें भगवंता ।आपुलिया सत्ता स्वाधीनता ते नाहीं ॥२॥प्रभातेसीं वाटे तुमच्या यावें दर्शना ।येथें न चलें चोरी उरली राहे वासना ॥३॥येथें अवघे वायां गेले दिसती सायास ।तुका म्हणे नास दिसे झाला वेंचाचा ॥४॥१३तुझें दास्य करुं आणिका मागों खावया ।धिग् झालें जिणें माझें पंढरीराया ॥१॥काय गा विठोबा तुज आतां म्हणावें ।शुभाशुभ गोड तुम्हां थोरांच्या नांवें ॥२॥संसाराचा धाक निरंतर आम्हांसी ।मरण भलें परि काय अवकळा ऎसी ॥३॥तुझा शरणागत शरण जाऊं आणिकांसी ।तुका म्हणे लाज कवणा हें कां नेणसी ॥४॥१४चित्तिं तुझें पाय डोळां रूपाचें ध्यान ।अखंड मुखीं नाम तुमचे वर्णावे गुण ॥१॥हेंचि एक तुम्हां मागतों मी दातारा ।उचित तें करा भाव जाणोनि खरा ॥२॥खुंटली जाणीव कांही बोलणेंचि आतां ।कळों येईल तैसी करा बाळाची चिंता ॥३॥तुका म्हणे आतां नका देऊं अंतर ।न कळे पुढें काय कैसा होईल विचार ॥४॥१५वाट पाहें बाहें निढळीं ठेवूनियां हात ।पंढरीचे वाटे दृष्टी लागलें चित्त ॥१॥कई येतां देखेन माझा मायबाप ।घटिका बोटें दिवस लेखीं धरूनियां माप ॥२॥डावा डोळा लवे उजवी स्फुरतसे बाहे ।मन उतावीळ भाव सांडुनियां देहे ॥३॥सुख सेज गोड चित्ति नलगे आणिक ।नाठवे घरदार तहान पळाली भूक ॥४॥तुका म्हणे धन्य ऎसा दिवस तो कोण ।पंढरीचे वाट येतां मूळ देखेन ॥५॥१६पडिलें दूरदेशीं मज आठवे मानसी ।नको नको हा वियोग कष्ट होताती जिवासी ॥१॥दिन तैसी रजनी झाली वो माये ।अवस्था लाऊनि गेला अझुनि कां नये ॥२॥गरुडावाहना गंभीरा येई गा दातारा ।बापरखुमादेवीवरा श्रीविठठला ॥३॥१७पैल विळाचिये विळ आंगणीं उभी ठेलिये ।येतिया जातिया पुसे विठठल केउता गे माये ॥१॥पायरऊ झाला संचारु नवल ।वेधें विंदान लाविलें म्हणे विठठल विठ्ठल ॥२॥नेणें तहान भूक नाहीं लाज अभिमान ।वेधिलें जनार्दनीं देवकीनंदनु गे माये ॥३॥बापरखुमादेवीवरु जीवींचा जीवनु ।माझें मनींचें मनोरथ पुरवी कमलनयनु ॥४॥१८येतिया पुसें जातिया धाडी निरोप ।पंढरपुरीं आहे माझा मायबाप ॥१॥येई वो येई वो विठाबाई माउलिये ।निढळावरी कर ठेऊनि वाट पाहे ॥२॥पिंताबर शेला कैसा गगनी झळकला ।गरुडावरी बैसोनि माझा कैवारी आला ॥३॥विठोबाचें राज्य आम्हां नित्य दिवाळी ।विष्णुदास नाम जीवें भावें ओवाळी ॥४॥१९येई वो येई वो येई धांवोनिया ।विलंब कां वाया लावियला कृपाळे ॥१॥विठाबाई विश्वंभरें भवच्छेदके ।कोठें गुंतलीस माये विश्वव्यापके ॥२॥न करी न करी आतां आळस अव्हेरु ।व्हावया प्रकट कैचे दूरी अंतरु ॥३॥नेघे नेघ नेघे माझी वाचा विसावा ।तुका म्हणे हांवा हांवा हांवा साधावा ॥४॥२०देखिले तुमचे चरण निवांत राहिलें मन ।कासया त्यजीन प्राण आपुला हे माये ॥१॥असेन धरणीवरी आपलें माहेरी ।मग तो श्रीहरी गीतीं गाईन गे माये ॥२॥सकळही गोत माझें पंढरीस जाण ।बापरखुमादेविधरा श्रीविठ्ठलाचि आण ॥३॥२१आतां कोठें धावें मन । तुमचे चरण देखिलिया ॥१॥भाग गेला शीण गेला ।अवघा झाला आनंद ॥२॥प्रेमरसें बैसली मीठि ।आवडी लाठी मुखासी ॥३॥तुका म्हणे आम्हां जोगे ।विठ्ठल घोगें खरें माप ॥४॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP