TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

भारताचा नियंत्रक - कलम १४८ ते १५१

भारतीय संविधान किंवा भारताची राज्यघटना ही भारतातील पायाभूत कायदा असून डॉ .बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत .

२६ नोव्हेंबर १९४९ रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व २६ जानेवारी १९५० पासून राज्यघटना अंमलात आली .


कलम १४८ ते १५१

भारताचा नियंत्रक व महा लेखापरीक्षक . १४८ .

( १ ) भारताला एक नियंत्रक व महा लेखापरीक्षक असेल आणि तो राष्ट्रपतीकडून सहीशिक्क्यानिशी अधिपत्राद्वारे नियुक्त केला जाईल आणि त्याला सर्वोच्च न्यायालयाच्या नायाधीशाप्रमाणे , तशाच रीतीने व तशाच कारणास्तव पदावरुण दूर केले जाईल .

( २ ) भारताचा नियंत्रक व महा लेखापरीक्षक म्हणून नियुक्त झालेली प्रत्येक व्यक्ती . आपले पद ग्रहण करण्यापुर्वी राष्ट्रपतीच्या समोर अथवा शपथ किंवा प्रतिज्ञा यांच्या संबंधात त्याने नियुक्त केलेल्या कोणत्याही व्यक्तीसमोर . तिसर्‍या अनुसूचीत त्या प्रयोजनार्थ दिलेल्या नमुन्यानुसार शपथ घेऊन किंवा प्रतिज्ञा करून त्याखाली सही करील .

( ३ ) नियंत्रक व महा लेखापरीक्षक याचे वेतन व त्याच्या अन्य सेवाशर्ती . संसद कायद्याद्वारे निर्घारित करील अशा असतील आणि त्या याप्रमाणे निर्धारित केल्या जाईपर्यंत . दुसर्‍या अनुसूचीत विनिर्दिष्ट केल्यानुसार असतील :

परंतु , नियंत्रक व महा लेखापरीक्षक याचे वेतन अथवा अनुपस्थिती रजेबाबतचे , निवृत्तिवेतनाबाबतचे किंवा निवृत्तिवयाबाबतचे त्याचे अधिकार यांपैकी कशातही त्याला अहितकारक होईल असा बदल त्याच्या नियुक्तीनंतर केला जाणार नाही .

( ४ ) नियंत्रक व महा लेखापरीक्षक त्याची पदधारणा संपल्यानंतर . तो भारत सरकारच्या नियंत्रणाखालील किंवा कोणत्याही राज्य शासनाच्या नियंत्रणाखालील इतर कोणत्याही पदास पात्र असणार नाही .

( ५ ) या संविधानाच्या आणि संसदेने केलेल्या कोणत्याही कायद्याच्या तरतुदींना अधीन राहून . " भारतीय लेखापरीक्षा आणि लेखा विभाग " यात सेवेत असणार्‍या व्यक्तीच्या सेवाशर्ती आणि नियंत्रक व महा लेखापरीक्षक याचे प्रशासकीय अधिकार . राष्ट्रपतीने नियंत्रक व महा लेखापरीक्षक याचा विचार घेऊन नंतर केलेल्या नियमांद्वारे विहित केले जातील असे असतील .

( ६ ) नियंत्रक व महा लेखापरीक्षक याच्या कार्यालयात सेवेत असणार्‍या व्यक्तींना किंवा त्यांच्याबाबत द्यावयाची सर्व वेतने . भत्ते व निवृत्तिवेतने यांसह त्या कार्यालयाचा प्रशासकीय खर्च भारताच्या एकत्रित निधीवर प्रभारित केला जाईल .

नियंत्रक व महा लेखापरीक्षक याची कर्तव्ये व अधिकार . १४९ .

नियंत्रक व महा लेखापरीक्षक हा , संघराज्य व राज्ये आणि अन्य कोणतेही प्राधिकारी किंवा निकाय यांच्या लेख्यांच्या संबंधात संसदेने केलेल्या कोणत्याही कायद्याद्वारे किंवा त्याखाली विहित करण्यात येतील अशा कर्तव्यांचे पालन करील व अशा अधिकारांचा वापर करील आणि त्यासंबंधात याप्रमाणे तरतूद केली जाईपर्यत तो . या संविधानाच्या प्रारंभाच्या लगतपूर्वी डोमिनिअन ऑफ इंडियाच्या व प्रांतांच्या लेख्यांच्या संबंधात भारताच्या महा लेखापरीक्षकाकडे जी कर्तव्ये सोपविण्यात आली होती त्यांचे पालन व त्यास जे अधिकार वापस्ता येण्यासारखे होते त्यांचा वापर . अनुक्रमे संघराज्याच्या व राज्यांच्या लेख्यांच्या संबंधात करील .

संघराज्याच्या व राज्यांच्या लेख्यांचा नमुना . १५० .

संघराज्याचे व राज्याचे लेखे . भारताचा नियंत्रक व महा लेखापरीक्षक [ याच्या सल्ल्यावरून ] राष्ट्रपती विहित करील अशा नमुन्यामध्ये ठेवले जातील .]

लेखापरीक्षा अहवाल . १५१ .

( १ ) भारताचा नियंत्रक व महा लेखापरीक्षक याचे संघराज्याच्या लेख्यांविषयीचे अहवाल राष्ट्रपतीस सादर केले जातील व तो ते संसदेच्या प्रत्येक सभागृहासमोर ठेवण्याची व्यवस्था करील .

( २ ) भारताचा नियंत्रक व महा लेखापरीक्षक याचे एखाद्या राज्याच्या लेख्यांविषयीचे अहवाल त्या राज्याच्या राज्यपालास सादर केले जातील व तो ते राज्याच्या विधानमंडळासमोर ठेवण्याची व्यवस्था करील .

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2012-12-30T04:35:08.3700000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

टापरा

  • पु. मोगरी ; लांकडी मोठा खुंटा . 
RANDOM WORD

Did you know?

कोणतीही ही पूजा करण्याआधी संकल्प कां करावा?
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.