भाग दोन - कलम ७

भारतीय संविधान किंवा भारताची राज्यघटना ही भारतातील पायाभूत कायदा असून डॉ .बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत .

२६ नोव्हेंबर १९४९ रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व २६ जानेवारी १९५० पासून राज्यघटना अमलात आली .


स्थलांतर करुन पाकिस्तानात गेलेल्या विवक्षित व्यक्तींचे नागरिकत्वाचे हक्क .

७ . अनुच्छेद ५ व ६ यामध्ये काहीही असले तरी , जी व्यक्ती १ मार्च , १९४७ या दिवसानंतर भारताच्या राज्यक्षेत्रातून स्थलांतर करुन सध्या पाकिस्तानात समाविष्ट असलेल्या राज्यक्षेत्रात गेलेली आहे , ती व्यक्ती भारताची नागरिक आहे असे मानले जाणार नाही :

परंतु , जी व्यक्ती आता पाकिस्तानात समाविष्ट असलेल्या राज्यक्षेत्रांत याप्रमाणे स्थलांतर केल्यानंतर , पुन्हा स्थायिक होण्यासाठी किंवा कायमचे परत येण्यासाठी , कोणत्याही कायद्याच्या प्राधिकाराद्वारे किंवा तदन्वये दिलेल्या परवान्याखाली भारताच्या राज्यक्षेत्रात परतलेली आहे , तिला या अनुच्छेदातील कोणतीही गोष्ट लागू असणार नाही व अनुच्छेद ६ खंड ( ख ) च्या प्रयोजनांकरता , अशी प्रत्येक व्यक्ती १९ जुलै , १९४८ या दिवसानंतर स्थलांतर करुन भारताच्या राज्यक्षेत्रात आलेली व्यक्ती असल्याचे मानण्यात येईल . **

N/A

References : N/A
Last Updated : December 19, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP