TransLiteral Foundation

मंत्रः - श्रीलक्ष्मीनृसिंहार्तिः

उपासना विभागातील मंत्र सिद्ध केल्यास त्याची प्रचिती लगेचच मिळते , या विभागात उपासनेसाठीचे मंत्र आहेत .


श्रीलक्ष्मीनृसिंहार्तिः

( १)

कडकडशब्दे स्तंभहि कडकडला ।

नरहरी तव रव दुर्धर भयानकी उठला ।

थरथर कंपित धरणी दिग्गजा पळ सुटला ।

तडतडि अंडकटाह मेरुहि डगमगला ॥१॥

जयदेव जयदेव जय नरहरी विष्णो , श्री नरहरि विष्णो ।

निजभक्ता सुखकारी , असुरांते भयकारी प्रसीदप्रभ विष्णो ॥धृ . ॥

जनके प्रह्रादासी अति पीडा करितां ।

प्रकटसि भक्तकृपाळू स्तंभिच अवचिता ।

स्थावर जंगम व्यापक समान जी समता ।

वेदप्रणीत दाविसि सत्यचि ब्रह्मतता ॥२॥

जडतनुत्रयाद्यहं जड हिरण्यकशिपूला ।

संधिनखे विदारुनि दुर्घट मारियला ।

प्रसन्न सम्यग्ज्ञाने निज प्रह्रादाला ।

अमरचि करिसी मौनी वंदित चरणाला ॥३॥

( २)

प्रेमानंदे करितो आरती । तारी दीनाला ॥१॥

आरती ही तुजला नरहरी । आरती ही ॥धृ . ॥

प्रल्हादाते छळिता प्रगटसी । फोडुनी स्तंभाला ॥२॥

स्थावर जंगम व्यापक आहे । दावसि हे रिपुला ॥३॥

कनकशिपू वधुनी सत्वरी । तारिसि दासाला ॥४॥

विठ्ठलसुत बलवत्कवि विनवी । रक्षि विभो मजला ॥५॥

( ३)

हरिभक्त देखोनी दुःखदुर्जना ।

चांडाळ ते पापी देखो न शकती सज्जना ।

प्रल्हाद गांजिला केली यातना ।

पाहवेना साहवेन देवा राहवेना ॥१॥

जयदेव जयदेव जय सिंहवदना ।

आरती ओवाळूं सेवक सुखशयना ॥धृ . ॥

तटतटिला स्तंभ कडकडिल्या ज्वाळा ।

तडतडिल्या पडिल्या नक्षत्र माळा ।

घडघडिले पर्वत कल्पान्त वेळा ।

थोर हलकल्लोळ झाला विधी गोळा ॥२॥

पिंगट जटा जिव्हा कडकडिल्या दाढा ।

धगधगले लोचन गडगडिला गाढा ।

खणखणितो शस्त्रे वोढ्यावरि वोढा ।

पछाडिले रजनीचोर केलासे रगडा ॥३॥

चरचरचर उदर फाडी विभांडी ।

तर आंतर माळा वोढोनी काढी ।

थरथर पोटी आवेश क्रोध भडाडी ।

भक्त प्रल्हादा जवळी वोढी ॥४॥

देव भक्ताम्चा कैवारी साचा ।

गजागंडस्थळी चपेट सिंहाचा ।

तो हा नरकेसरी न बोलवे वाचा ।

सौम्य झाला नरहरी स्वामी दासाचा ॥५॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2011-03-25T23:38:13.0630000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

across the face of

 • -च्या दर्शनी बाजूवर 
RANDOM WORD

Did you know?

घरातील देव्हारा कोणत्या वस्तुपासून बनविलेला असावा?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

 • Meanings in Dictionary: 717,450
 • Total Pages: 47,439
 • Dictionaries: 46
 • Hindi Pages: 4,555
 • Words in Dictionary: 325,879
 • Marathi Pages: 28,417
 • Tags: 2,707
 • English Pages: 234
 • Sanskrit Pages: 14,232
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.