मंत्रशास्त्र - नियम व विधी

" श्रद्धावान लभते फलं" म्हणजे श्रद्धालु पुरूषालाच मंत्रानुष्ठानाची यथोक्त फलप्राप्ति होते.


भगवान् ‍ भूतनाथ श्री महादेवांनी अथर्ववेदांतर्गत मंत्रतंत्रशास्त्र शिवपार्वतीसंवादरूपाने ग्रंथित केले , ते प्राचीन ऋषींनी आणि श्रीमच्छेंद्रनाथ व श्रीगोरखनाथ इत्यादी अर्वाचीन सिद्धपुरूषांनी कलियुगातील परिस्थिती जाणून सर्व जनहितार्थ प्रकट केले . मंत्राचे सामर्थ्य इतके आहे की , त्याच्या विधीपूर्वक पठण करून देवांस पाचारण करता येते , आणि त्यांपासून वर प्राप्त करून घेऊन इष्टार्थ साधता येतो . ऋषींनी मंत्राद्वारे देवांस आस्थापूर्वक म्हटले आहे की ," हे देव हो , येथे या ; आणि आमचा सोमरस ग्रहणा करा ! " ह्यावरून देव आगमन करतात हे सिद्ध होते . यास्तव जे कार्य अनेक व्रताचरणाने सिद्ध होत नाही , ते मंत्रतंत्राच्या योगें सुसाध्य होऊ शकते . जितेंद्रिय व अनुभवज्ञ अशा गुरूमुखद्वारा मंत्रतंत्रादि ग्रहण करणे उचित होय . कोणताही मंत्रप्रयोग करणे झाल्यास आपले व सकल प्राणीमात्रांचे कल्याण व्हावे , अशा सद्‍हेतूनेचे केला पाहिजे , म्हणजे तो निःसंशय फलद्रुप होतो .

N/A

References : N/A
Last Updated : September 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP