शुद्धिसंस्कारः - देवलस्मृतिः

उत्तम संस्कार मानवाला उच्च कोटीचे जीवनमान प्रदान करते .


सिन्धुतीरे सुखासीनं देवलं मुनिसत्तमम।

समेत्य मुनयः सर्वे इदे वचनमब्रुवन ॥१॥

भगवन्म्लेच्छनीता हि कथं शुद्धिमवाप्नुयुः।

ब्राह्मणाः क्षत्रिया वैश्याः शूद्राश्चैवानुपूर्वशः ॥२॥

कथं स्नानं कथं शौचं प्रायश्चितं कथं भवेत।

किमाचारा भवेयुस्ते तदाचक्ष्व सविस्तरम ॥३॥

देवल उवाच -

त्रिशंकु वर्जयेद्देशं सर्व द्वादशयोजनम।

उत्तरेण महानद्या दक्षिणेन तु कीकटम ॥४॥

प्रायश्चितं प्रवक्ष्यामि विस्तरेण महर्षयः ॥५॥

मृतसूते तु दासीनां पत्नीनां चानुलोमिनाम।

स्वामितुल्यं भवेच्छौचं मृते यौनिकम ॥६॥

अपेय येन संपीतमभक्ष्यं चापि भक्षितम।

म्लेच्छैर्नीतेन विप्रेण अगम्यागमनं कृतम ॥७॥

तस्य शुद्धिं प्रवक्ष्यामि यावदेकं तु वत्सरम।

चांद्रयणं तु विप्रस्य सपराकं प्रकीर्तितम ॥८॥

पराकमेकं क्षत्रस्य पादकृच्छ्रेण संयुतम।

पराकार्ध तु वैश्यस्य शूद्रस्य दिनपञ्चकम ॥९॥

नखलोमविहिनानां प्रायश्चित्तं प्रदापयेत।

चतुर्णामपि वर्णानामन्यथाऽशुद्धिरास्ति हि ॥१०॥

प्रायश्चित्तविहिनं तु यदा तेषां कलेवरम।

कर्तव्यस्तत्र संस्कारो मेखलादण्डवर्जितः ॥११॥

म्लेच्छैर्नीतेन शूद्रैर्वा हारिते दण्डमेखले।

संस्करप्रमुखं तस्य सर्व कार्य यथाविधि ॥१२॥

संस्कारान्ते च विप्राणां दानं धेनुश्च दक्षिणा।

दातव्यं शुद्धिमिच्छद्भिरश्वगोभूमिकाञ्चनम ॥१३॥

तदासौ तु कुटुंबानां पंक्ति प्राग्नोति नान्यथा।

स्वभार्यां च यथान्यार्य गच्छन्नेव विशुध्यति ॥१४॥

अथ संवत्सरादूर्ध्वं म्लेच्छैर्नीतो यदा भवेत।

प्रायश्चितं तु संचीण गंगास्नानेन शुध्यति ॥१५॥

सिंधुसौवीरसौराष्ट्रं तथा प्रत्यन्तवासिनः।

कलिंकौकणान्वंगान गत्वा संस्कारमर्हति ॥१६॥

बलाद्दासीकृता ये च म्लेच्छचांडालदस्युभिः।

अशुभं कारिताः कर्म गवादिप्राणिहिंसनम ॥१७॥

उच्छिष्टमार्जनं चैव तथा तस्यैव भोजनम।

खरोष्ट्रविंवराहाणामामिषस्य च भक्षणम ॥१८॥

तत्स्रीणां च तथां संगं तामिश्च सह भोजनम।

मासेषिते द्विजातौ तु प्राजापत्यं विशोधनम ॥१९॥

चांद्रायणं त्वाहिताग्नेः पराकस्त्वथवा भवेत।

चान्द्रायणं पराकं च चरेत्संवत्सरोषितः ॥२०॥

संवत्सरोषितः शूद्रो मासार्ध यावकं पिबेत।

मासमात्रौऽषितः शूद्रः कृच्छ्र्पादेन शुध्यति ॥२१॥

ऊर्ध्व संवत्सरात्कल्प्यं प्रायश्चित्तं द्विजौत्तमैः।

संवत्सरैश्चंतुर्भिश्च तद्भवमधिगच्छति ॥२२॥

ह्रासो न विद्यते यस्य प्रायश्चित्तं तु कारयेत।

गुह्यकक्षशिरोभ्रूणां कर्तव्यं केशवापनम ॥२३॥

प्रायश्चित्तं समारभ्य प्रायश्चित्तं तु कारयेत।

स्नानं त्रिकालं कुर्वीत धौतवासा जितेन्द्रीयः ॥२४॥

कुशहस्तः सत्यवक्तादेवलेनह्युदाहृतम।

वत्सरं वत्सरार्धं वा मासं मासार्धमेव वा ॥२५॥

बलान्म्लेच्छैस्तु यो नीतस्तस्य शुद्धिस्तु कीदृशी।

संवत्सरोषिते शूद्रे शुद्धिश्चान्द्रायणेन तु ॥२६॥

पराकं वत्सरार्धे च पराकार्ध त्रिमासिक।

मासिके पादकृच्छ्रश्च नखलोमविवर्जितः ॥२७॥

पादोनं क्षत्रियस्योक्तमर्धं वैश्यस्य दापयेत।

प्रायश्चित्तं द्विजस्योक्तं पादं शूद्रस्य दापयेत ॥२८॥

प्रायश्चित्तावसाने तु दोग्ध्री गौर्दक्षिणा मता।

तथाऽसौ तु कुटुम्बान्ते ह्युपाविष्टो न दुष्यति ॥२९॥

अशीतिर्यस्य वर्षाणि वालोवाऽप्यूनषोडशः।

प्रायश्चित्तार्धमर्हन्ति स्त्रियो रोगिण एव च ॥३०॥

ऊनैकादशवर्षस्य पञ्चवर्षात्परस्य च।

प्रायश्चित्त चरेदभ्राता पिता वाऽन्योऽपि वर्धिता ॥३१॥

स्वयं व्रतं चरेत्सर्वमन्यथा नैव शुध्यति।

तिलहोगं प्रकुर्वीत जपं कुर्यादतन्द्रितः ॥३२॥

संलापस्पर्शनिःश्वाससहयानासनाशनात।

याजनाध्यापनाद्यौनात्पापं संक्रमते नृणाम ॥३३॥

याजनं योनिसंबंध स्वाध्यायं सहभोजनम।

कृत्वा सद्यः पतत्येव पतितेन न संशयः ॥३४॥

संवत्सरेण पतति पतितेन सहाऽऽचरन।

याजनासनयज्ञादि कुर्वाणः सार्वकामिकम ॥३५॥

अतः परं प्रवक्ष्यामि प्रायश्चित्तमिदं शुभम।

स्त्रीणां म्लेच्छैश्च नीतानां बलात्संवेशने क्वचित ॥३६॥

ब्राह्मणी क्षत्रिया वैश्या शूद्रा नीता यदांत्यजैः।

ब्राह्मण्याः कीदृशं न्याय्यं प्रायश्चित्तं विधीयते ॥३७॥

ब्राह्मणी भोजयेन्म्लेच्छमभक्ष्यं भक्ष्ययेद्यदि।

पराकेण ततः शुद्धिः पादेनोत्तरतोत्तरान ॥३८॥

न कृतं मैथुनं तामिरभक्ष्यं नैव भक्षितम।

शुद्धिस्तदा त्रिरात्रेण म्लेच्छान्नेनैव भक्षिते ॥३९॥

रजस्वला यदा स्पृष्टा म्लेच्छेनान्येन वा पुनः।

त्रिरात्रमुषिता स्नात्वा पञ्चगव्येन शुध्यति ॥४०॥

स्पृष्ट्वा रजस्वलाऽन्योयं ब्राह्मणी क्षत्रिया तथा।

त्रिरात्रेण विशुद्धिः स्याद्देबलस्य वचो यथा ॥४१॥

स्पृष्ट्वा रजस्वलाऽन्योयं ब्राह्मणी क्षत्रिया तथा।

पञ्चरात्रं निराहारा पञ्चगव्येन शुध्यति ॥४२॥

ब्राह्मण्यनशनं कुर्यात्क्षत्रिया स्नानमाचरेत।

सचैलं वैश्यजातीनां नक्तं शूद्रे विनिर्दिशेत ॥४३॥

म्लेछान्नं म्लेच्छसंस्पर्शो म्लेच्छेन सह संस्थितिः।

वत्सरं वत्सरादूर्ध्व त्रिरात्रेण विशुध्यति ॥४४॥

म्लेच्छैर्हृतानां चौरैर्वा कान्तारेषु प्रवासिनाम।

भुक्त्वा भक्ष्यमभक्ष्यं वा क्षुधार्तेन भयेन वा ॥४५॥

पुनः प्राप्य स्वकं देशं चातुर्वर्णस्य निष्कृतिः।

कृच्छ्रमेकं चरेद्वैश्यः शूद्रः पादेन शुध्यति ॥४६॥

गृहीता स्त्री बलादेव म्लेच्छैर्गुर्वीकृता यदि।

गुर्वी न शुद्धिमाप्नोति त्रिरात्रेणेतरा शुचिः ॥४७॥

योषा गर्भ विधत्ते या म्लेच्छात्कामादकामतः।

ब्राह्मणी क्षत्रिया वैश्या शूद्रा वर्णेतरा च या ॥४८॥

अभक्ष्यभक्ष्यणं कुर्यात्तस्याः शुद्धिः कथं भवेत।

कृच्छ्रं सांतपनं शुद्धिर्घृतैर्योनेश्च पाचनम ॥४९॥

असवर्णेन यो गर्भः स्त्रीणां योनौ निषिच्यते।

अशुद्धा सा भवेन्नारी यावच्छल्यं न मुञ्चति ॥५०॥

विनिसृते ततः शल्ये रजसो वापि दर्शने।

तदा सा शुध्यते नारी विमलं कांचनं यथा ॥५१॥

स गर्भो दीयतेऽन्यस्मै स्वयं ग्राह्यो न कर्हिचित।

स्वजातौ वर्जयेद्यस्मात्संकरः स्यादतोऽन्यथा ॥५२॥

गृहीतो यो बलाम्छेच्छैः पञ्च षट सप्त वा समाः।

दशादि विंशति यावत्तस्य शुद्धिर्विधीयते ॥५३॥

प्राजापत्यद्वयं तस्य शुद्धिरेषा विधीयते।

अतः परं नास्ति शुद्धिः कृच्छ्रमेव सहोषिते ॥५४॥

म्लेच्छैः सहोषितो यस्तु पंचप्रभृति विंशतिः।

वर्षाणि शुद्धिरेषोक्ता तस्य चान्द्रायणद्वयम ॥५५॥

कक्षागुह्यशिरःश्मश्रुभ्रूलोमपरिकृन्तनम।

प्राहृत्य पाणिपादानां नखलोम ततः शुचिः ॥५६॥

यो दातुं न विजानाति प्रायश्चित्तं द्विजोत्तमः।

शुद्धिं ददाति चान्यस्मै तदशुद्धैः स भाजनम ॥५७॥

सभायां स्पर्शने चैव म्लेच्छेन सह संविशेत।

कुर्यात्स्नानं सचैलं तु दिनमेकमभोजनम ॥५८॥

माता म्लेच्छत्वमागच्छेत्पितरो वा कथंचन।

असूतकं च नष्टस्य देवलस्य वचो यथा ॥५९॥

मातरं च परित्यज्य पितरं च तथा सुतः।

ततः पितामहं चैव शेषपिण्डं तु निर्वपेत ॥६०॥

स्त्रीणां चैव तु शूद्राणां पतितानां तथैव च।

पञ्चगव्यं न दातव्यं दातव्यं मंत्रवर्जितम ॥६१॥

वरुणो देवता मूत्रे गोमये हव्यावाहनः।

सोमः क्षीरे दघ्नि वायुर्घृते रविरुदाहृतः ॥६२॥

गोमूत्रं ताम्रवर्णायाः श्वेतायाश्चैव गोमयम।

पयः काञ्चनवर्णाया नीलायाश्चपि गोर्दधि ॥६३॥

घृतं वै कृष्णवर्णाया विभक्तिर्वर्णगोचरा।

उदकं सर्ववर्ण स्यात्कस्य वर्णो न गृह्यते ॥६४॥

षण्मात्रिके तु गोमूत्रं गोमयं च कुशोदकम।

त्रिमात्रिकं घृतं क्षीरं दधि स्याद्दशमात्रिकम ॥६५॥

व्रते तु सर्ववर्णानां पञ्चगव्यं तु संख्यया।

प्रायश्चित्तं यथोक्तं तु दातव्यं ब्रह्मवादिभिः ॥६६॥

अन्यथा दापयेद्यस्तु प्रायश्चित्ती भवेद्द्विजः॥६७॥

कपिलायाश्वगोर्दुग्ध्वा धारोष्णं यः पयः पिबेत।

एष व्यासकृतः कृच्छ्रः श्वपाकमपि शोधयेत ॥६८॥

तिलाहोमं प्रकुर्वीत जपं कुर्यादतन्द्रितः।

’ विष्णो रराट ’ मंत्रेण प्रायश्चित्ती विशुध्यति ॥६९॥

बहुनाऽत्र किमुक्तेन तिलहोमो विधीयते।

तिलान्दत्त्वा तिलान्भुक्त्वा कुर्वीताघनिवारणम ॥७०॥

संपादयन्ति यद्विपाः स्नानं तीर्थफलं तपः।

संपादी क्रमते पापं तस्य संपद्यते फलम ॥७१॥

प्रायश्चित्तं समाख्यातं यथोक्तं देवलेन तु।

इतरेषामृषीणां च नान्यथा वाक्यमर्हथ ॥७२॥

सुवर्णदानं गोदानं भूमिदानं गवान्हिकम।

विप्रेभ्यः संप्रच्छेत प्रायश्चित्ती विशुध्यति ॥७३॥

पञ्चाहान्सहवासेन संभाषणसहाशनैः।

संप्राश्य पंञ्चागव्यं तु दान दत्वा विशुध्यति ॥७४॥

एकद्वित्रिचतुःसंख्यान्वत्सरान्संवसेद्यदि।

म्लेच्छवासं द्विजश्रेष्ठः क्रमते द्रव्ययोगतः ॥७५॥

एकाहेन तु गोमूत्रं द्वयहेनैव तु गोमयम।

त्रहात्क्षीरेण संयुक्तं चतुर्थे दधिमिश्रितम ॥७६॥

संवासं च प्रवक्ष्यामि देहशुद्धिं द्विजन्मनाम।

पंचाहं पंचगव्यं स्यात्पादकृच्छ्रं दशाहिके ॥७८॥

पराकं पंचदशभिर्विशेऽतिकृच्छ्रमेव च।

उदरं प्रविशेद्यस्य पंचगव्यं विधानतः ॥७९॥

म्लेच्छैर्नीतस्य विप्रस्य पंचगव्यं विशोधनम ॥८०॥

पंचगव्यं च गोक्षीरे दधि मूत्रं घृतं पयः।

यत्किंचिद्दुष्कृतं तस्य सर्व नश्यति देहिनः।

पंच सप्ताष्ट दश वा द्वादशाहोऽपि विंशतिः।

प्राश्यापरेऽहन्युपवसेत्कृच्छ्रं सांतपनं चरेत ॥८१॥

पृथक्सांतपनं द्रव्यैः षडहः सोपवासकः।

सप्ताहेन तु कृच्छ्रोऽयं महासांतपनः स्मृतः ॥८२॥

पर्णोदुम्बरराजीवबिल्वपत्रकुशोदकैः।

प्रत्येकं प्रत्यहं पीतैः पू ( प ) र्णकृच्छ्र उदाहृतः ॥८३॥

कृच्छ्रातिकृच्छ्रः पयसा दिवसानेकविंशतिम।

द्वादशाहोपवासेन पराकः परिकीर्तितः ॥८६॥

एषां त्रिरात्रमभ्यासादेकैकस्य यथाक्रमम।

तुलापुरुष इत्येष ज्ञेयः पञ्चदशाहिकः ॥८८॥

तिथिवृद्ध्या चरेत्पिण्डाञ्शुक्ले शिख्यण्डसंमितान।

एकैक ह्रासयेत्पिण्डान्कृच्छ्रचांद्रयाणं चरेत ॥८९॥

यथाकथंचित्पिण्डानां चत्वारिंशच्छतद्वयम।

इति देवल ( ले ) नकृतं धर्मशास्त्रं प्रकीर्तितम ॥९०॥

समाप्तेयं देवलस्मृतिः

देवल स्मृती

१ . सिंधुनदीच्या तीरावर सुखाने बसलेल्या मुनिश्रेष्ठ देवलाकडे येऊन सर्व मुनि पुढीलप्रमाणे म्हणाले .

२ . भगवन , म्लेंछांनी बाटविलेले , ब्राह्मण , क्षत्रिय , वैश्य व शूद्र क्रमाने कसे शुद्ध होतील ?

३ . त्यांनी स्नान कसे करावे , शुद्ध कसे व्हावे आणि प्रायश्चित्त कसे घ्यावे , त्यांनी कोणत्या आचारांना पाळावे हे सविस्तर आम्हांस सांगा . देवल म्हणालेः -

४ . उत्तर बाजूस महानदी व दक्षिण बाजूस कीकट ( मगध ) देश असा बारा योजने विस्तीर्ण त्रिशंकु देश सोडून

५ . हे महर्षिहो , मी विस्तारपूर्वक प्रायश्चित्त सांगतो . अनुलोमपद्धतीने केलेल्या पत्नीस व दासीस जाताशौच व

६ . मृताशौच पतीच्या जातीप्रमाणे पाळावयाचे . पति मेल्यानंतर भाऊबंदाइतके पाळावयाचे ;

७ . म्लेच्छांनी बाटविलेल्या ब्राह्मणांनी अपेयपान , अभक्ष्यभक्षण , आणि अगम्यागमन एक वर्षापर्यंत केले असल्यास

८ . त्यास मी प्रायश्चित्त सांगतो . ब्राह्मणांस सपराक चांद्रायण

९ . क्षत्रियास पादकृच्छ्रासहित पराक , वैश्यास पराकार्ध व शूद्रास पांच दिवस प्रायश्चित्त द्यावे .

१० . नख , केश काढून प्रायश्चित्त द्यावे . चारहि वर्णांना त्याच्याशिवाय शुद्धि नाही .

११ . म्लेंच्छ झालेल्या माणसाचे शरीर प्रायश्चित्त न घेतां मृत झालेले असेल , परंतु त्यांची प्रायश्चित्त घेण्याची इच्छा असेल तर त्याच्या प्रेतास मेखलादण्डवर्जित संस्कार करावेत .

१२ . बाटलेल्या किंवा शूद्रांनी दण्डमेखला पळविल्यास त्याचे यथाविधि संस्कार करुन

१३ . विप्रांना दान , गाय , दक्षिणा , द्यावी . विशेष पवित्रपणाची इच्छा करणारांनी , अश्व , गाय , भूमि , सुवर्ण यांचे दान द्यावे .

१४ . इतके केल्यानंतर तो आपल्या कुटुम्बातील लोकांच्या पंक्तीस बसण्यास योग्य होतो , नाही तर होत नाही . स्वतःच्या पत्नीकडे यथाशास्त्र गमन करील तरच तो शुद्ध होतो .

१५ . एक वर्षापेक्षा जास्त दिवस जर बाटलेला असेल तरच तो वरीलप्रमाणे प्रायश्चित्त घेऊन गंगास्नान केल्याने शुद्ध होतो .

१६ . सिन्धु , सौवीर , आणि सौराष्ट्र तसेंच त्या देशाच्या आसपास राहणार्‍या लोकांच्या देशांत , व तसेच कलिंग , कोंकण आणि वंग या देशांत जाऊन आले असता शुद्धीकरितां संस्कार करावे लागतात .

१७ . बलात्काराने म्लेंछ , चाण्डाळ व दस्यूंनी जे आपले दास बनविले आणि गाई वगैरे प्राण्यांची हिंसारुप अपवित्र कृत्ये करावयास लावली

१८ . उच्छिष्ट धुवावयास लावले , तसेच उष्टे खाण्यास भाग पाडले , तसेच गाढव , उंट , गांवडुक्कर यांचे मांस खावविले ,

१९ . त्या जातींच्या स्त्रियांशी संग घडला , त्या स्त्रियांशी भोजन घडले असे ब्राह्मणाला महिनाभर घडले तर त्याला प्राजापत्य प्रायश्चित्त शुद्ध करिते .

२० . आहिताग्नीला चान्द्रायण किंवा पराक प्रायश्चित्त आहे ; पण एक वर्षपर्यंत असे राहण्याचा प्रसंग आल्यास चांद्रयण आणि पराक अशी दोनहिं प्रायश्चित्ते केली पाहिजेत .

२१ . शूद्रास एक वर्षपर्यंत परधर्मात राहणेचा प्रसंग आलेला असल्यास पंधरा दिवस गव्हाची पेज पिऊन राहावे . एक महिनाभरच तो परधर्मात राहिला असल्यास त्याबद्दल कृच्छ्रपाद प्रायश्चित्त घेतले असतां तो शुद्ध होतो .

२२ . यावरुन एक वर्षापेक्षां जास्त दिवस असल्यास त्याबद्दल विद्वान लोकांनी प्रायश्चित्ताची कल्पना करावी . चार वर्षे असाच परधर्मात राहिल्यास तो त्या धर्माचा होतो ( मग पहिल्या जातीत घेणे कठिण होते . ) बाटल्यानंतर होणारा जीवाच र्‍हास प्रायश्चित्त घेतल्यानेच बंद होतो . गुह्य , कांख , मस्तक , भ्रू या ठिकाणचे केश काढावेत .

२४ . प्रायश्चित्ताला आरंभ झाल्यापासून प्रायश्चित्त घेणार्‍या माणसाकडून सर्व विधि करावेत . ( बरेंच वेळा प्रायश्चित्त अनेक दिवसांचे असते . त्याकरितां हे सांगितले आहे . ) स्नान तीन वेळा दिवसांतून करावे . धूत वस्त्र नेसावे आणि इंद्रियनिग्रह करुन असावे .

२५ . दर्भ हातांत घेतलेला , खरे बोलणारा असे प्रायश्चित्त घेणार्‍या माणसाने असावे असे देवलांनी सांगितले आहे . वर्ष , सहा महिने , महिना किंवा पंधरा दिवस बाटविलेल्या माणसाची शुद्धि कशी करावी ? एक वर्षपर्यंत शूद्र जातीचा मनुष्य बाटलेला असल्यास चांद्रायण प्रायश्चित्त केले असतां त्याची शुद्धि होते .

२७ . सहा महिने बाटला असल्यास पराक , तीन महिने बाटला असल्यास पराकाचा अर्धा भाग आणि महिनाभर बाटलेला असल्यास पादकृच्छ्र , प्रायश्चित्त द्यावे . क्षौर सर्वांना करावयाला पाहिजेच .

२८ . ( वर जे प्रायश्चित्त सांगितले ते ब्राह्मणांना उद्देशून सांगितले ) यापैकी एक चतुर्थांश कमी करुन क्षत्रियांना त्यापैकी अर्धे वैश्यांना आणि ब्राह्मणांना सांगितलेल्या प्रायश्चित्तापैकी १ / ४ शूद्रांना द्यावे .

२९ . प्रायश्चित्त संपल्यानंतर दुभती गाय दक्षिणा म्हणून द्यावी . असे प्रायश्चित्त केल्यानंतर कुटुंबात जाऊन राहिल्यास कोणासहि दोष लागत नाही .

३० . ज्याच्या वयाला ऐंशी वर्षे झाली आहेत , किंवा ज्या मुलाचे वय सोळा वर्षाचे आंत आहे , त्यांना व स्त्रिया आणि रोगी यांना नेहमी सांगितल्यापेक्षा अर्धे प्रायश्चित्त द्यावे .

३१ . अकरा वर्षांच्या आंतील आणि पांच वर्षांच्या वरील मुलकरितां प्रायश्चित्त भाऊ , किंवा अन्य कोणत्याहि पालकांनी केले असतां चांलते .

३२ . या शिवाय इतर वयाच्या लोकांनी सर्व प्रायश्चित्त व्रताचरण स्वतः केले पाहिजे . तिलहोम व निरलस रीतीने जप केला पाहिजे .

३३ . ( आतां मनुष्य कोणकोणत्या गोष्टीने धर्मभ्रष्ट होतो हे सांगतात ) संभाषण , स्पर्श , निश्वास , बरोबर फिरणे , एकत्र बसणे , याजन , शिकविणे , योनिसंबंध , यामुळे परस्परांचे पातक परस्परांस जाते .

३४ . पतित मनुष्याशी सहधर्मविधि , विवाहसंबंध , अध्ययन , सहभोजन केल्याने मनुष्य तात्काळ पतित होतो .

३५ . अशा तर्‍हेने एक वर्षपर्यंत पतिताशी सहवास घडल्यास आणि याजन , बसणे यज्ञादि वगैरे सर्व कामनिक क्रिया घडल्यास मनुष्य पतित होतो .

३६ . येथून पुढे क्वचित बलात्काराने बाटलेल्या स्त्रियांना शुद्ध करण्यासाठी चांगले प्रायश्चित्त सांगतो . ब्राह्मणी , क्षत्रिय स्त्री , वैश्य स्त्री आणि शूद्र स्त्री या जर अन्त्यज वगैरेंनी बलात्काराने भ्रष्ट केल्या तर ब्राह्मण स्त्रीला योग्य प्रायश्चित्त कोणते होईल .

३८ . ब्राह्मणी जर म्लेंछ माणसाला भोजन वाढील किंवा अभक्ष्य भक्षण करील तर पराक प्रायश्चित्ताने तिची शुद्धि होते . क्षत्रिय स्त्री , वैश्य स्त्री आणि शूद्र स्त्री यांना शुद्ध होण्याकरिता त्यांतील क्रमाने पाव पाव प्रायश्चित्त कमी करावे .

३९ . केवळ म्लेंछांन्न भक्षण केले आहे , मैथुन व इतर अभक्ष्यभक्षण जिच्या हातून झाले नाही तिला तीन रात्री व्रतस्थ राहिल्याने शुद्धि प्राप्त होते .

४० . रजस्वला जर म्लेंच्छ किंवा अन्य कोणी यांनी स्पृष्ट झाली तर तेथून पुढे तीन दिवस बसून पंचगव्य घेऊन शुद्ध होते .

४१ . रजस्वला जर परस्परांना स्पर्श करतील तर त्या ब्राह्मण असोत वा क्षत्रिय असोत , तीन रात्रींनी शुद्ध होतात असे देवलाने सांगितले आहेत .

४२ . ब्राह्मणी आणि शूद्रस्त्री रजस्वला असून परस्पराला स्पर्श करतील तर पांच रात्री निराहार राहून पंचगव्य घेऊन शुद्ध होतात .

४३ . ब्राह्मणीने उपवास करावा . क्षत्रिय स्त्रीने स्नान करावे . वैश्य स्त्रीने सचैल स्नान करावे आणि शूद्र जातीच्या स्त्रीला नक्त सांगावे .

४४ . म्लेंछभक्षण , म्लेंछसंस्पर्श , आणि म्लेंच्छासहवर्तमान वसति एक वर्ष किंवा वर्षापेक्षां जास्त असेल तर तीन रात्रीत शुद्धि होते .

४५ . अरण्यांत प्रवास करीत असतां , चोर किंवा म्लेंछ यांनी पळविलेल्यास , भुकेने किंवा भयाने भक्ष्य किंवा अभक्ष्यभक्षण करण्याचा प्रसंग आल्यास

४६ . पुनः स्वतःच्या देशांत येऊन कोणत्याहि जातीच्या माणसांनी प्रायश्चित्त घ्यावे . क्षत्रियांनी त्यांच्या एक चतुर्थांश प्रायश्चित्त करावे .

४७ . बलात्काराने स्त्री धरुन तिच्याशी व्यभिचार केल्यामुळे ती गरोदर राहिल्यास गरोदर स्त्री शुद्ध होत नाही . अभक्षभक्षण केले तर ती तीन दिवसांत शुद्ध होते .

४८ . जी स्त्री इच्छेने किंवा अनिच्छेने म्लेंच्छापासून गर्भ धारण करिते , ती स्त्री ब्राह्मणी , क्षत्रिय स्त्री , शूद्र स्त्री किंवा कोणचीहि असो

४९ . तिची शुध्दि कशी होईल ? कृच्छ्रसांतपन करावे आणि तुपान योनिपाचन करावे .

५० . असवर्ण पुरुषापासूनचा गर्भ वेळपर्यंत पोटांत आहे तोपर्यंत स्त्री शुद्ध होत नाही .

५१ . गर्भ पोटांतून बाहेर पडला किंवा रजोदर्शन झाले म्हणजे स्त्री शुद्ध सुवर्णाप्रमाणे शुद्ध होते .

५२ . तो गर्भ दुसर्‍याला द्यावा . स्वतः केव्हांहि घेऊ नये . स्वतःच्या जातींत त्याला घेऊ नये , कारण तसे केले असतां संकर होईल .

५३ . बलात्काराने म्लेंछांनी बाटविलेला पांच , सहा , सात , वर्षे किंवा दहा ते वीस वर्षेपर्यंत त्याची शुद्धि केली जाते .

५४ . त्याला प्राजापत्यद्वय प्रायश्चित्त केले असतां शुद्धि होते . यांपेक्षा जास्त दिवस राहिल्यास जातींत समाविष्ट करण्यासारखी शुद्धि करतां येत नाही . केवळ इतकी वर्षे बरोबर राहणेच झाले असेल तर कृच्छ्रप्रायश्चित्तानेच शुद्धि होते .

५५ . पांच वर्षांपासून वीस वर्षापर्यंत म्लेंच्छांसह वर्तमान सहवास घडलेला असल्यास दोन चांद्रायणे प्रायश्चित्त घेतले असतां शुद्धि होते .

५६ . कांख , गुह्य , मस्तक , मिशा , सर्व ठिकाणचे केस काढावेत . हातापायाची नखे काढावीत , असे प्रायश्चित्त घेतल्यानंतर शुद्ध होतो .

५७ . ज्याला प्रायश्चित्त देतां येत नाही आणि जो प्रायश्चित्त देऊन शुद्ध मात्र करितो , तो बाटलेल्या माणसाच्या पातकाचा अधिकारी होतो असे निश्चित समजावे .

५८ . सभेत स्पर्श झाला असतांहि म्लेंच्छांसह बसावे . मात्र सचैल स्नान करुन एक दिवस उपवास करावा .

५९ . आई म्लेंछ झाली असेल किंवा बाप वगैरे कोणीहि बाटले असतील तर ते मेले असतां सूतक नाही असे देवल मुनि सांगतात .

६० . श्राद्ध वगैरे करितांनाहि बाटलेल्या आईबापांना पिण्ड न देतां बाटलेल्या अशा पितामहादिकांना पिण्ड द्यावे .

६१ . बाटलेल्या स्त्री किंवा शूद्रांना पंचगव्य देऊ नये . देणे झाल्यास मंत्रांशिवाय द्यावे .

६२ . गाईच्या मूतांत वरुणदेवता , शेणांत अग्नि , दुधांत चंद्र , दह्यांत वायु , आणि तुपांत सूर्य देवता आहे .

६३ . तांबड्या गाईचे गोमूत्र , पांढर्‍या गाईचे शेण , सोनेरी रंगाच्या गाईचे दूध , निळ्या गाईचे दहि ,

६४ . काळ्या गाईचे तूप घ्यावे . कारण गुण विशेष वर्णावर अवलंबून आहेत . पाण्याला सर्व वर्ण आहेत . कारण उदक कोणाचा वर्ण ग्रहण करीत नाही . कोणत्याहि व्रतांत पंचगव्य सर्ववर्णाच्या लोकांना प्रमाणबद्ध असते .

६५ . सहा भाग गोमूत्र , शेण , दर्भाचे पाणी , आणि तूप तीन भाग . दूध व दहि दहा भाग घ्यावे .

६६ . विद्वान ब्रह्मवेत्त्यांनी वर सांगितल्याप्रमाणे प्रायश्चित्त द्यावे . जर यापेक्षां

६७ . वेगळे प्रायश्चित्त देईल तर तो ब्राह्मण दोषी होईल .

६८ . कपिला गाईचे दूध काढून धारोष्ण पिईल तर ह्या व्यासांनी सांगितलेल्या कृच्छ्र प्रायश्चित्ताने चांडाळहि शुद्ध होईल .

६९ . तिळाचा होम करावा , लक्षपूर्वक ’ विष्णोरराट ’ या मंत्राचा जप केला असतां बाटलेला मनुष्य शुद्ध होतो .

७० . फार काय सांगावे , तिळाचा होम करावा , तीळ द्यावेत आणि पाप नाहीसे करावे .

७१ . ब्राह्मण लोक स्नान , तीर्थफळ , शुद्ध तप यांपासून जे पुण्य संपादन करितात , त्यांचे त्या पुण्याने पाप नाहीसे होते आणि त्या पुण्याचे फळ शुद्ध होणाराला मिळते .

७२ . अशा प्रकारे दवल मुनीने बाटलेल्यास शुद्ध करण्याकरितां प्रायश्चित्त सांगितले आहे . अन्य मुनींचेहि मत याशिवाय वेगळे असणार नाही .

७३ . सुवर्णदान , गोदान ; भूमिदान गाईला लागणारी खाद्य वगैरे सामुग्री ब्राह्मणाला दिली असतां बाटलेला मनुष्य शुद्ध होतो .

७४ . पांच दिवस संभाषण , एकत्र राहणे भोजन असा सहवास घडल्यास पंचगव्य घेऊन दान दिले असतां शुद्ध होतो .

७५ . एक , दोन , तीन अगर चार वर्षेपर्यंत म्लेंछांच्या सहवासांत राहिल्यास पुढीलप्रमाणे प्रायश्चित्त केले असतां ब्राह्मण जातीचा मनुष्य शुद्ध होतो .

७६ . एक दिवस गोमूत्र , दोन दिवस शेण , तीन दिवस दूध , चौथ्या दिवशी दह्यासहित दूध , पांचव्या दिवशी घृतयुक्त पंचगव्य द्यावे , म्हणजे शुद्धि होते .

७७ . पांच , सात , दहा , आणि पंधरापासून वीस

७८ . दिवसपर्यंत जर म्लेंच्छाशी सहवास होईल तर ब्राह्मणांची देहशुद्धि कशी होईल ती सांगतो . पांच दिवस सहवास झाल्यास पंचगव्य द्यावे . दहा दिवस सहवासास पराक द्यावे . वीस दिवस सहवास झाल्यास अतिकृच्छ प्रायश्चित्त द्यावे . ज्याच्या पोटांत शास्त्रोक्त विधानाने पंचगव्य जाईल

८० . त्याचे जे कांही पातक असेल , ते सर्व नष्ट होते . पांच , सात , आठ , बारा , फार काय वीसहि दिवस बाटलेल्या ब्राह्मणास केवळ पंचगव्याने शुद्धि प्राप्त होते .

८१ . पंचगव्य म्हणजे गाईचे दूध , दहि , गोमूत्र , तूप , पाणी हे घेऊन दुसरे दिवशी उपवास करावा म्हणजे कृच्छ्र सांतपन होते .

८२ . पृथवसांतपन म्हणजेच वेगवेगळ्या पदार्थांनी सहा दिवस उपवास करावयाचा . सात दिवस वरीलप्रमाणे उपवास केल्यास त्यास कृच्छ्र असे म्हणतात . तेच महासांतपन होय .

८३ . पर्ण , उदुम्बर , कमल , बिल्वपत्र , कुशोदक यांपैकी एक दिवस एक अशा क्रमाने प्याल्यास पूर्णकृच्छ्र होतो .

८४ . तापलेले दूध , तूप व पाणी यांपैकी एक दिवस एक प्याल्यास आणि एकरात्र उपवास केल्यास तप्तकृच्छ्र नांवाचे शुद्धि करणारे प्रायश्चित्त होते .

८५ . एक वेळा जेवण , नक्त , त्याचप्रमाणे अयाचितवृत्तीने राहणे किंवा एक उपवास केल्यास पादकृच्छ्र होते .

८६ . एकवीस दिवस दूध पिऊन राहिले असतां ’ कृच्छ्रातिकृच्छ्र ’ प्रायश्चित्त होते . बारा दिवस उपवास केल्याने पराक नावाचे प्रायश्चित्त होते .

८७ . पेज , भाजी , ताक , पाणी आणि सातू यांपैकी प्रत्येक दिवशी एक खाऊन एक रात्र उपवास केल्यास सौम्यकृच्छ्र प्रायश्चित्त होते .

८८ . वरील प्रत्येक पदार्थ तीन दिवस क्रमाने पुनः भक्षण केल्यास पुरुष नांवाचे पंधरा दिवसांचे व्रत होते .

८९ . तिथिक्रमाने शुक्लपक्षांत मोराच्या अण्डाएवढे अन्नाचे ग्रास वाढवावे आणि कृष्णपक्षांत कमी करावे यास कृच्छ चांद्रायण असे म्हणतात .

९० . कोणच्याहि रीतीने एका महिन्यांत दोनशे चाळीस घास व्हावेत असे देवालाने धर्मशास्त्र सांगितले आहे .

येथे देवल स्मृतीचे भाषांतर संपले .


References : N/A
Last Updated : August 31, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP