TransLiteral Foundation

सुश्रुत संहिता - भग्नानानिदान

सुश्रुतसंहिता केवळ शल्यकर्म अशी अनेकांची समजूत आहे , परंतु आयुर्वेदाचे तत्वज्ञान , त्याचा व्यवहारात उपयोग कसा करावा याचेही ज्ञान सुश्रुताने जगाला दिले .


भग्नानानिदान

आता ‘‘भग्नानानिदान ’’ नावाचा अध्याय सांगतो . जसे भगवान् धन्वंतरींनी सांगितले आहे ॥१ -२॥

पडणे , चेंगरणे , प्रहार (तडाका लागणे ), जोराने हिसका बसणे , वाघ वगैरे हिंसक पशूंच्या दाताने इजा होणे वगैरे अनेक प्रकारच्या आघाताने नाना प्रकारचे ‘‘अस्थिभंग ’’ होतो , असे सांगतात .

हे भग्न स्थानाला अनुसरून व कांडभग्न असे दोन प्रकारचे आहे .

त्यापैकी संधिमुक्त भग्न उप्तिष्ट , विश्लीष्ट , विवर्जित , अयक्षिप्त , अतिक्षिप्त , आणि तीर्यक्क्षिप्त असे सहा प्रकारचे आहे .

ह्यांचे सामान्य लक्षण -ह्यामध्ये सामान्यतः पसरणे , आवळणे , वळविणे व खालीवर करणे ह्या क्रिया करण्यास शक्ति नसते , ठणका फार असतो व स्पर्श सहन होत नाही .

संधिमुक्तभग्नांची सामान्य लक्षणे आहेत . विशेष लक्षण - उप्तिष्ठ (चुरलेल्या ) सधिभग्नामध्ये सांध्याच्या दोन्ही प्रकारच्या वेदना अतिशय होतात . विश्लिष्ठसंधिभग्नांत सूज कमी असते , सतत वेदना असतात व सांध्यांची क्रिया बंद पडते . विवर्तितसंधिभग्नात सांध्याच्या बाजूस वळतांना पीडा होते व अंग वाकडे होते . अवक्षिप्तसंधिभग्नात सांधा ढिला पडतो व तीव्र वेदना होते . अतिक्षिप्त संधिभग्नात दोन्ही हाडे सांध्यापासून लांब सरतात व वेदना अस्तित्व असतातच . वीर्यक्क्षिप्तसंधिभग्नांत एक हाड आडवे होते व त्यामुळे वेदना होतात ॥३ -७॥

आता ह्यापुढे कांडभग्न सांगतो . कर्कटक , अश्वकर्ण , वर्णित , पिच्चित , अस्थिच्छल्लित , कांडभग्न , मज्जासुगत , अतिपातित , वक्र छिन्न , पाटित व स्फुटित असे बारा प्रकार कांडभग्नाचे आहेत .

कांडभग्नाचे सामान्य लक्षण -अतिशय सूज , स्पंदन (हाड हालणे ) मागे वळणे , स्पर्श सहन न होणे , दाबले असता शब्द होणे , अंग गलित होणे , नाना प्रकारच्या वेदना होणे , बसणे , निजणे वगैरे कोणत्याही गोष्टीने सुख (स्वास्थ ) न वाटणे , हे कांडभग्नाचे संक्षेपतः सामान्य लक्षण सांगितले आहे .

विशेष लक्षण -जे हाड दोन्ही बाजूस दाबल्यामुळे वाकून मध्ये वर येऊन गाठीप्रमाणे उंच दिसते त्याला ‘‘कर्कटक ’’ म्हणतात . (हे खेकड्याप्रमाणे दिसते ) जे हाड घोड्याच्या कानासारखे वर येते त्याला ‘‘अश्वकर्ण ’’ असे म्हणतात . जे हाड चुरल्यामुळे स्पर्श केला असता आवाज होतो ते ‘‘चुर्णित ’’ जे हाड पिचून पसरट होते त्याला ‘‘पिच्चित ’’ असे म्हणतात . ह्याला पुष्कळ सूज असते . दोन्ही बाजूंनी हाडे एक वर एक खाली अशी होऊन राहतात त्याला अस्थिच्छलित म्हणतात .

जे हाड मोडून लटलट हालते त्याला ‘‘कांडभग्न ’’ असे म्हणतात . हाडाचा भाग आतील हाडांत घुसून मज्जेत शिरून मज्जेला बाहेर काढतो त्याला ‘‘मज्जासुगत ’’ म्हणतात . हाड अजिबात मोडून तुकडा पडला असता त्याला ‘‘अतिपातित ’’ म्हणतात . हाड न तुटता वाकते त्याला ‘‘वक्र ’’ म्हणतात . हाड एका बाजूस शिल्लक राहून दुसर्‍या बाजूस फुटते , त्याला छिन्न म्हणतात . ज्या हाडाचे फुटून बारीक तुकडे होतात , त्याला ‘‘पाटित ’’ म्हणतात . ह्याला वेदना असतात . हाड तुटून त्याचे पुष्कळ तुकडे होतात व ती जागा कोंड्याने भरल्याप्रमाणे फुगीर (सुजलेली ) दिसते . त्याला स्फुटित म्हणतात .

त्यापैकी चुर्णित , छिन्न , अतिपातित व मज्जानुगत ही कष्टसाध्य आहेत . तसेच कृश , वृद्ध , बाल ह्यांची व व्रणाने क्षीण झालेली कुष्टी व श्वासाचे रोगी ह्यांची भग्नेही कष्टसाध्यच आहेत . त्याचप्रमाणे सांध्यापाशी होणारी भग्नही

कष्टसाध्य आहे ॥८ -११॥

कपळाचे हाड फुटले , तसेच कमरेच्या हाडाचा सांधा निखळला व जघनास्थिचा चूर झाला तर हे तीनही भग्ने वैद्याने असाध्य म्हणून सोडावी . कपाळाचे हाड फुटून वेगळे झाले अगर हाडाचा चूर झाला तर ते भग्न , तसेच स्तनाच्या आतील छातींचे हाड फुटले , शंखस्थिभग्न झाल्या , (आंखांच्या ) पाठीचा कणा मोडला अगर मस्तकाचे हाड फुटले तर , ही भग्नेही असाध्य म्हणून वर्ज करावी .

जन्मतःच जे हाड किंवा जो सांधा व्यवस्थित नसतो तो , तसेच हाड व्यवस्थित असून ते चांगले बसविले नाही किंवा चांगले बांधले नाही किंवा धक्का वगैरे लागून त्याचा क्षोम झाला (हालले ) व अशा कारणांनी विकोपास गेलेले भग्न , ही भग्ने असाध्य म्हणून वर्ज करावी .

मध्यम वयाच्या तीन अवस्थांमध्ये म्हणजे वयाच्या सोळा वर्षापासून चव्वेचाळीस वर्षापर्यंत मनुष्याचे हाड निखळले अगर मोडले असता चाणाक्ष वैद्याकडून जर त्याचवर उपचार करण्यात आले तर तो मनुष्य बरा होतो .

कान , नाक , गळा व डोळ्यांच्या भोवतालच्या अस्थि ह्यांना तरुणास्थि म्हणतात . ह्या वाकतात . हातापायांच्या अस्थिंना नलकास्थि म्हणतात . त्या तुटतात . (भग्न होतात )

कपालस्थि विदीर्ण होतात . (त्याची शकले होतात ). आणि रुचकारिस्थ म्हणजे दाताच्या अस्थि फुटतात ॥१२ -१६॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2015-06-24T13:48:39.6230000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

strickle

  • पु. साचा आकारक 
RANDOM WORD

Did you know?

आत्म्याची किती आणि कोणती रूपे मानली गेली आहेत?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.