हरिपाठ - अभंग २३

श्रीज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठाचे पारायण केल्याने चातुर्मासाचे पुण्य मिळते.


सर्व तत्त्वांच्या मेळाव्यांत एकतत्त्वी कळां दाखविणारा हरी आहे

सात पांच तीन दशकांचा मेळा । एकतत्वीं कळा दावी हरी ॥१॥

नाम हें सर्व मार्गत श्रेष्ठ असुन त्याला कष्ट पडत नाहीत

तैसे नोहे नाम सर्व मार्गा वरिष्ठ । तेथें कांहीं कष्ट न लागती ॥२॥

प्राणाचा उलट साधणें हाच अजपाजप.

अजपा जपणें उलट प्राणाचा । तेथेंही मनाचा निर्धारु असे ॥३॥

ज्ञानेश्वरमहारांजांनी रामकृष्णी नामाच पंथ आक्रमण केला

ज्ञानदेव म्हणे नामविण व्यर्थ । रामकृष्ण पंथ क्रमियेला ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 27, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP