चैत्र महिन्यातील विशिष्ट व्रते

चैत्र महिन्यातील विशिष्ट व्रते


अजादान :
अजा= शेळी. चैत्र मासी कोणत्याही शुभ दिवसापासून तीन दिवस नक्त भोजन करतात. दुधाने भिजवलेल्या तांदळाच्या पिठाची भाकरी हे भोज्य अन्न समजतात. भोजनापूर्वी चंदनाने पार्वतीची दशभुज प्रतिमा रेखतात. ज्वालामुखी या नावाने तिची पूजा करतात. तिसर्‍या दिवशी पाच दुधाळ शेळ्या ब्राह्मणास दान देतात. दानाचे फल-मोक्ष.
आनंदव्रत :
या व्रतात अयाचित जलदान करावयाचे असते. व्रतावधी चैत्रादी चार महिने. व्रताच्या अंती अन्न, वस्त्र, तिलपात्र व सुवर्ण यांचे दान करावयाचे असते. फल-ब्रह्मलोकाची प्राप्ती व कल्पान्ती राजपद.
तिथीपूजन :
प्रतिपदादी प्रत्येक तिथीला तिथिस्वामीची पूजा करुन हे व्रत केले जाते. त्याचे विधिविधान असे- प्रातःस्नान उरकुन वेदीवर अथवा चौरंगावर लाल वस्त्र पसरुन त्यावर अक्षतांचे अष्टदल काढावे. ज्या दिवशी जी तिथी असेल  त्या दिवशी त्या तिथीच्या स्वामीची सुवर्णमूर्ती अष्टदलाच्य मध्यभागी स्थापन स्थापन करुन तिची पूजा करावी. निरनिराळ्या तिथींचे स्वामी पुढीलप्रमाणे आहेत.
प्रतिपदा-अग्निदेव; द्वितीया-ब्रह्मा; तृतीया-गौरी; चतुर्थी-गणेश; पंचमी-सर्प; षष्ठी-स्वामी कार्तिक; सप्तमी-सूर्य; अष्टमी-शिव (भैरव); नवमी-दुर्गा; दशमी-अन्तक (यमराज); एकादशी-विश्‍वेदेवा; द्वादशी-हरी (विष्णु); त्रयोदशी-कामदेव; चतुर्दशी-शिव; पूर्णिमा-चंद्र; अमावस्या-पितर. या तिथीस्वामींचे पूजन  त्या त्या तिथीला करावे म्हणजे हर्ष, उत्साह आणि आरोग्य यांची अभिवृद्धी होते.

N/A

N/A
Last Updated : December 21, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP