मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|पांडुरंग आरती संग्रह|
ओवाळूं आरती माझ्या पंढरीर...

पांडुरंगाची आरती - ओवाळूं आरती माझ्या पंढरीर...

देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.
The poem composed in praise of God is Aarti.

ओवाळूं आरती माझ्या पंढरीराया, माझ्या पंढरीराया ।
सर्वभावें शरण आलो तुझीया पायां ॥ धृ. ॥

सर्व व्यापुनि कैसे रूप राहिलें अकळ, रूप राहिले अकळ ।
तो हा गवळ्याघरी झाला कृष्ण गोपाळ ॥ १ ॥

स्वरीप गुणातीत अवतार धरीं, अवतार धरीं ॥
तो हा पांडुरंग उभा विटेवरी ॥ २ ॥

भक्तांचा काजा कैसा रूपासी आला, कैसा रूपासी आला ।
ब्रीदाचा तोडरू चरणी मिरविला ॥ ३ ॥

आरती कैसी ओवाळीली, कैसी ओवाळीली ।
वाखाणिता कीर्ति वाचा परतली ॥ ४ ॥

भावभक्तीबळें होसी कृपाळू देवा, होसी कृपाळू देवा ॥
तुका म्हणे तुझ्या न कळता भावा ॥ ५ ॥

N/A


References : N/A
Last Updated : February 12, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.