ज्येष्ठ शु. अष्टमी

Jyeshtha shuddha Ashtami


१ निंदुकाष्टमी :

एक व्रत. या व्रताचा आरंभ ज्येष्ठ शु. अष्टमीला करुन ते वर्षभर करतात. या व्रतात पहिले चार महिने विष्णूचे कमलांनी पुढील चार महिने धोत्र्याच्या फुलांनी आणि शेवटचे चार महिने शतपत्रांनी (दिवसा उमलणार्‍या कमळांनी ) पूजा करतात. फल-विष्णुलोकाची प्राप्ती.

२ शिवपूजा :

ज्येष्ठ शु. वा व. अष्टमी दिवशी श्रीशंकराची व फक्त शु. तृतीयेला शुक्लादेवीची यथाविधी पूजा करावी. शुक्लादेवीने या दिवशी दानवांचा संहार केला म्हणून देवतांनी तिची पूजा केली होती. म्हणून संकटमुक्त होण्यासाठी हे व्रत करावे.

N/A

N/A
Last Updated : February 10, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP