देविदिकांच्या ध्यानाचे मंत्र
श्रीमन्महागणाधिपतये नमः । लक्ष्मीनारायणाभ्याम नमः ।
उमामहेश्वराभ्यां नमः । मातापितॄभ्यां नमः ।
इष्टदेवताभ्यो नमः । ग्रामदेवताभ्यो नमः ।
स्थानदेवताभ्यो नमः । वास्तुदेवताभ्यो नमः ।
आदित्यादिनवग्रहदेवताभ्यो नमः ।
सर्वेभ्यो देवेभ्यो नमः । सर्वेभ्यो ब्रम्हणेभ्यो नमः ।
एतत्कर्मप्रधनदेवताभ्यो नमः । अविघ्नमस्तु ॥
अर्थ:
"श्रीमहागणपतीला नमस्कार असो, लक्ष्मीनारायणांना नमस्कार असो, महादेवपार्वतींना नमस्कार असो, आईवडिलांना नमस्कार असो, स्थानदेवता, वास्तुदेवता व सूर्यादी नवग्रह देवतांना नमस्कार असो, सर्व देवतांना नमस्कार असो, स्र्व ब्रम्हवेत्त्यांना नमस्कार असो व या पूजाकर्मांतील मुख्य देवतांना नमस्कार असो, (आणि यात) ' विघ्न न येवो.' असे म्हणावे. नंतर गणपतीची स्थापना करावी ती अशी-
गणपतीची स्थापना
गणपतीची मूर्ती (किंवा चित्र) असल्यास ठीकच, नाही तर एक सुपारी धुऊन ती देवपाटावर किंवा विड्याची पाने ठेवून त्यावर मांडावी, म्हणजे गणपतिस्थापना झाली. पुढे त्या सुपारीचे ठायी गणपतीचे ध्यान व आवाहन करुन गंध, अक्षता, फुले वाहून पूजा करावी. त्यावेळी मंत्र म्हणावे ते असे-
गणपतिपूजन मंत्र
सुमुखश्र्चैकदंतश्र्च कपिलो गजकर्णकः ।
लंबोदरश्र्च विकटो विघ्ननाशो गणाधिपः ॥ १ ॥
धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचंद्रो गजाननः ।
द्वादशैतानि नामानि यः पठेच्छृणुयादपि ॥ २ ॥
विद्यारंभे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा ।
संग्रामे संकटे चैव विघ्नस्तस्य न जायते ॥ ३ ॥
शुक्लांबरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजम् ।
प्रसन्नवदनं ध्यायेत्सर्वविघ्नोपशांतये ॥ ४ ॥
अर्थ :
सुमुख, एकदंत, कपिल, गजकर्णक, लंबोदर, विकट, विघ्नांचा नाश करणारा, गणाधिप ॥ १ ॥ धूम्रकेतु, गणाध्यक्ष, भालचंद्र व गजानान ही (गणपतीची) बारा नावे जो म्हणतो अथवा ऎकतोही ॥ २ ॥ त्याल विद्याभ्यास, गॄहप्रवेश, प्रवासगमन व युद्ध यांत कधीही विघ्न येत नाही व त्याचे कोणतेही संकट दूर होते ॥ ३ ॥ ज्याने पांढरे वस्त्र पांघरले असून, ज्याची शरीरकांती चंद्रासारखी आहे, तसेच ज्याला चार हात असून,ज्याचे मुख सुप्रसन्न आहे अशा देवांचे,सर्व विघ्न दूर होण्यासाठी ध्यान करावे ॥ ४ ॥ असे म्हणून हात जोडावे, नंतर पार्वती व लक्ष्मी यांचे चिंतन करावे. त्या वेळी मंत्र म्हणावा, तो-
पार्वती व लक्ष्मीचिंतन मंत्र
सर्व मंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके ।
शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोऽस्तुते ॥ १ ॥
अर्थ :
"सर्व मंगलाहूनही मंगल (कल्याणमय), शुभदायक सर्व इच्छा पुरविणाऱ्या व दुःखितांचे सांत्वन करणाऱ्या अशा पार्वती व लक्ष्मी, माझा तुम्हाला नमस्कार असो." असे म्हटल्यानंतर विष्णुचे स्मरण करावे. कारण -
सर्वदासर्वकार्येषु नास्ति तेषाममंगलम् ।
येषां हॄदिस्थो भगवान् मंगलायतनं हरिः ॥
अर्थ :
"ज्यांच्या अंतःकरणामध्ये केवळ कल्य़ाणाचे स्थान(असा) महाभाग्यशाली हरि अधिष्ठित झाला आहे, त्यांच्या कोणत्याही कार्यात केव्हाही अशुभ येणार नाही." असे म्हणून त्यांचे चिंतन करावे-
विष्णुस्मरण मंत्र
तदेव लग्नं सुदिनं तदेव तारबलं चंद्रबलं तदेव ।
विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते तेंऽघ्रियुगं स्मरामि ॥
अर्थ :
"मेषादि लग्ने (१२ राशी), चंगला दिवस, नक्षत्रबल, चंद्रबल, व द्रव्यबल, हे लक्ष्मीच्या पती (विष्णो), तुझे चरण्कमलांचे मी स्मरण करतो." कारण :
लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजयः ।
येषामिंदीवरश्यामो हृदयस्थो जनार्दनः ॥
 
अर्थ :
"नीलकमलाप्रमाणे ज्याची शरीरकांती आहे असा जनार्दन (विष्णु) ज्यांनी आपल्या हृदयात स्थापन केला, त्यांनाच लाभ व जय मिळत असतो. मग त्यांचा पराभव कसा होणार?" असो. नंतर खालीलप्रमाणे अनेक देवतांचे स्मरण कराचे. त्य्य वेळी मंत्र म्हणावा-
अनेक देवतांचे मंत्र
विनायकं गुरुं भानुं ब्रम्हाविष्णुमहेश्वरान् ।
सरस्वती प्रणम्यादौ सर्वकार्यार्थसिद्धये ॥
अर्थ :
"विनायक,गुरु,सूर्य,ब्रम्हा, महादेव व सरस्वती यांना मी अगोदर नमस्कार करतो की, त्या योगाने माझी सर्व कार्ये सिद्ध होतील." असे म्हणावे व नंतर पुन्हा गणपतीला नमस्कार करावा. त्या वेळी मंत्र म्हणावा-
गणपतिनमन मंत्र
अभीप्सितार्थसिद्धयर्थं पूजितो यः सुरासुरैः ।
सर्वविघ्नहरस्तस्मै गणाधिपतयेनमः ॥
अर्थ :
"आपले मनोरथ शेवटास जावे म्हणून देवदैत्यांनीही ज्याची पूजा केली, त्या समस्त विघ्नाचे निवारण करणाऱ्या गणाधिपतीला माझा नमस्कार असो." असे म्हणावे. नंतर त्रिभुवनेश्र्वराचे चिंतन करावे. त्या वेळी मंत्र म्हणावा, तो असा-
त्रिभुवनेश्वरचिंतन मंत्र
सर्वेष्वारब्धकार्येषु त्रयस्त्रिभुवनेश्र्वराः ।
देवा दिश्न्तु नः सिद्धिं ब्रम्होशानजनार्दनाः ॥
अर्थ :
"आरंभिलेल्या सर्व कामांत त्रिभुवनेश्र्वर ब्रम्हा, विष्णु, महादेव सिद्धी देवोत. त्यांना माझा नमस्कार असो." असे म्हणून पुढे पूजेचा संकल्प म्हणावा-

N/A

N/A
Last Updated : February 10, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP