-
पुस्त्री . १ पुरुषाचे रेत ; वीर्य ; धात . २ सोने , रुपे , तांबे ; लोखंड इ० जास्त विशिष्ट गुरुत्वयुक्त , अपारदर्शक व एक प्रकारच्या चकाकीने युक्त अशा खनिज पदार्थांपैकी प्रत्येक . ३ पैसा ; द्रव्य ; धन . कोणी धातूचा न करिती स्पर्श । - दावि ४०१ . तेव्हा कळेल की अमके महाल अमके धातु । - ऐपो २५३ . ४ शरीरांतील रक्त , मज्जा , वसा , मांस , अस्थि मेद व रेत या सात घटकांपैकी प्रत्येक . धातूंचे समुद्र उलंडी । मेदाचे पर्वत फोडी । आंतली मज्जा काढी अस्थिगज जे । - स्वानुदिन ९ . ४ . ७५ . ६ पृथ्वी , आप , तेज , वायु , आकाश इ० पंचमहाभूतांपैकी प्रत्येक . ७ पंचमहाभूतांच्या रुप , रस , गंध व तेज या गुणधर्मापैकी प्रत्येक . ८ मनशीळ , काव , पारा , गंधक , अभ्रक इ० सारखा पदार्थ . ९ ( महानु ) गेरु , काव . एके धातुचिआं उटी घेते । - दाव ७७ . १० ( तत्व . ) अहंकार . या अहंकारासच तैजस , अभिमान , भूतादि , धातु अशी दुसरी नावे आहेत . - गीर १७२ . ११ ( संगीत . ) चिजेचे निरनिराळे भाग . अवयव ५ अर्थी पहा . [ सं . ] ( वाप्र . )
-
पु. १ क्रियापदाचे मूळरुप ; ज्याला प्रत्यय लावून क्रियापद बनवितां येते तो शब्द . जसेः - कृ , वद , करणे ; बोलणे , चालणे इ० २ शब्दाचे मूळ ; ज्याचे पुढे पृथक्करण करतां येत नाही असा शब्दांतील मूळ अवयव . इं . रॅडिकल , रुट . किताब शब्दांत क त ब हा धातु . [ सं . ]
-
०फुटणे १ कांही रोगामुळे मूत्रविसर्जनादि प्रसंगी आपोआप गळण्याइतके वीर्य पातळ होणे . २ वयांत येणे . सामाशब्द -
-
०नाम न. क्रियवाचक नाम [ धातु + नाम ]
Site Search
Input language: