मोरोपंतकॄत सप्तशती - अध्याय ४

सप्तशतीदेवी माहात्म्य नित्य पठन केल्याने सर्व शत्रूंचा नाश होतो, विशेषेकरून नवरात्रीत पाठ केल्याने जास्त परिणाम जाणवतात.


प्रकुपित दुत सविस्तर शुंभासि शिवोक्त सर्व आयकवी ॥

विघ्नित काम खळावा वर्णील क्रोध वेग काय कवी ॥१॥

त्या दुतोक्तश्रवणें कोपें अत्यंत तापला खळ गा ॥

व्यसनांत आपणाला पाडी मद जेविं आपला खळगा ॥२॥

व्यावें फूंटकें तुंबी, फळ गंगा लंघनाऽर्थं बाहुनीं ॥

हें कार्यं तसेंसांगे मुढा असुराऽधिपास बाहुनीं ॥।

हें कार्यं तसें सांगें मुढा असुराऽधिपास बाहुनीं ॥३॥

हे धुम्रलोचना त्वां पाने मानेंही नित्य जी तृष्टा ॥

स्वचमु घेउनि सत्वर जावें जेथें असेल ती दुष्टा ॥४॥

केशंतें धरुनि बळें आकर्षुनि करुनि विव्हळा वीरं ॥

आणावी जाणावी आज्ञा निःसंशया तुवां धीरें ॥५॥

तीतें रक्षाया तरि तेथें कोणी उठेल जो दक्ष ॥

मारावाचि असो पर तो सुर गंधर्वराज कीं यक्ष ॥६॥

साठ सहस्त्र असुर बळ घेऊनि लंघावायासि तो मलः घी ॥

पावं श्रेदुर्गेतें वेळेतें खवळला जसा जलवी ॥७॥

जी व्यसन आश्रितांस न बाधों दे जेविं घन घटा ऊन ॥

त्या भगवतीस तो खळ बळ मत्त असे वदे दटाऊन ॥८॥

शुंभ नुशुंमापाशीं चाल तिळहि हित नसे दुरामिमानीं ॥

त्या प्रभुच्या आज्ञेतें सर्वस्व हितावहा सुरभि मानीं ॥९॥

प्रभुचे आज्ञा मोडिशि आवडली तुज नवीच कां चाल ॥

प्रभुवाग्वशांसि ह्मणे नय कीं पाशीं पडोनि कांचाल ॥१०॥

तुं नीतिनें जरि न त्या मत्स्वामि समीप धरुनि मद येशी ॥

केशीं कवळुनि ओढुनि नेईन कीं कुजन पात्र न दयेशी ॥११॥

जगदंबा त्यासि ह्मणे दैत्यैद्रे धाडिलासि या काजा ॥

तुंचि बळी बळ वेष्टित जरि नेसिल यत्‍नकाय तरि माजा ॥१२॥

नेसिल बळेंचि मज कीं तुं बळवानु ज्ञानधर्म नय शस्त्रे ॥

कलह करुनि पुरुषाशी तेजें साधी न शैमं न यश स्त्री ॥१३॥

तो समजे देवींनें रचिल्या विपुला निजोपहाससी ॥

तीवरि धावं व्याघ्री वरि ओतुतसा सकोप हा सासी ॥१४॥

हुंकारेंचि तयातें सहसा परमेश्वरी करी मसित ॥

प्रकटि यश दरहिमकर दुग्धब्धितरंगहरहरिभसिन ॥१५॥

क्रोधं तेहि खवळले गर्वे कोठेंहि जे न पर माती ॥

पर माती करि त्यांची तत्काळाचे सहमृगेंद्र परमा ती ॥१६॥

त्या धुम्रलोचनाचा तत्सैन्याचाही नाश कळला हो ॥

शुंभ ह्मणे ती दृष्टा या कर्माचें यथार्थ फ्ळें लाहो ॥१७॥

आज्ञा करी शिवेवरि जाया तो शुंभ दैप्त पुंडातें ॥

जेणें निवेदिली ती त्या चंडातें तयाहि मुंडातें ॥१८॥

रे चुंडमुंद हो जा सत्वर घेऊनि विपुल सैन्यातें ॥

आणा खाणा तन्मद गद द्या धिक्कार करुनि दैन्यातें ॥१९॥

यानंतर अंबेतें ओढुनि बळें धरुनियां वेणीं ॥

किंवा बांधुनि आणा वृकचि तुह्मी असुर वीर ती एणी ॥२०॥

अथवा गांठुनि समरीं अमुरांही शस्त्र शत गणें अल्पा ॥

सिंह वधुनि करावी ती सर्वांहीं झटोनि हतकल्पां ॥२१॥

मग करुनि कठिन निजमन बंधन युवतीस बळकट कर हो ॥

तुमचें असावध स्त्री ती धरिल्याही न पळ कटक राहो ॥२२॥

कार्य करा भुर्त्यावर पुर्ण प्रभुच्या प्रसाद हे जाणा ॥

साधु असाधु करा परि बहु सत्वर मत्समीप ती आणा ॥२३॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP