मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ श्रीएकनाथी भागवत|अध्याय सतरावा|
श्लोक ४२ वा

एकनाथी भागवत - श्लोक ४२ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


ब्राह्मणस्य हि देहाऽयं क्षुद्रकामाय नेष्यते ।

कृच्छाय तपसे चेह प्रेत्यानंतसुखाय च ॥४२॥

वर्णांमाजीं उत्तम वर्ण । त्या ब्राह्मणाचा देहो जाण ।

क्षुद्रकामार्थ निर्माण । देवें आपण नाहीं केला ॥१९॥

पशुपक्ष्यादि योनींच्या ठायीं । कामावांचूनि आन नाहीं ।

तेंचि जरी ब्राह्मणाचे देहीं । तैं विशेष कायी उत्तमत्वें ॥४२०॥

ब्राह्मणांचे देहीं जाण । करावें स्वधर्में अनुष्ठान ।

माझेनि उद्देशें संपूर्ण । तपसाधन कृच्छादिकें ॥२१॥

मी हृदयीं धरोनि अनंत । जो पूर्णवैराग्ययुक्त ।

तपादि साधनीं सतत । सदा शिणत ब्राह्मण जे ॥२२॥

त्यांसी देहपाताच्या अंतीं । माझ्या अनंत सुखाची प्राप्ती ।

तेथ स्वर्गसुखादि संपत्ती । मावळती तत्काळ ॥२३॥

ज्या सुखाचे सुखस्थितीं । स्फुरेना संसारस्फूर्ती ।

जेथूनि नाहीं पुनरावृत्ती । ते सुखप्राप्ती त्या ब्राह्मणां ॥२४॥

कृच्छ्रादि साधनयुक्तीं । ब्राह्मणां ब्रह्मसुखप्राप्ती ।

त्याचि सुखाची सुखसंपत्ती । शिलोंछवृत्ती साधकां ॥२५॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP