मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ श्रीएकनाथी भागवत|अध्याय सतरावा|
श्लोक २९ वा

एकनाथी भागवत - श्लोक २९ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


शुश्रूषमाण आचार्यं सदोपासीत नीचवत् ।

यानशय्यासनस्थानैर्नातिदूरे कृताञ्जलिः ॥२९॥

सर्वदा अतिसादर । न पडतांही अंतर ।

गुरुसेवेसी निरंतर । अतितत्पर उल्हासें ॥१५॥

गुरु यानारूढ असतां । पुढें चालावें साटोपतां ।

पाठीसी यावें चरणीं चालतां । उपचारतासमवेत ॥१६॥

समयोचित जाणोन । द्यावें तांबुल जीवन ।

करावें चरणसंवाहन । घालावें आसन बैसती तेथें ॥१७॥

सद्‍गुरु बैसल्या आसनीं । शिष्यें न बसावें नेहटूनी ।

दूरी नवजावें तेथूनी । नयनोन्मीलनीं रहावें ॥१८॥

अंजळीसंपुट जोडुनी । संमुख राहावें सावधानीं ।

गुरूची संज्ञा ज्यालागूनी । तें अविलंबनीं करावें ॥१९॥

गुरु शेजेवरी निजले असतां । जवळी नसावें तत्त्वतां ।

जेथूनि ऐकूं ये वचनार्था । तेथें निशीं अवस्था क्रमावी ॥३२०॥

मी एक सेवेनें संपन्न । ऐसा धरिलिया अभिमान ।

केले सेवेसी आंचरण । सर्वेंचि जाण होईल ॥२१॥

सेवकांमाजीं मी एक । केवळ रंकाचाही रंक ।

ऐसा भावो निष्टंक । सेवेसी देख धरावा ॥२२॥

तैसेंचि नीच काम करितां । लाज न धरावी सर्वथा ।

उबग न मानूनी चित्ता । उल्हासता गुरुभजनीं ॥२३॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP