TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

रुक्मिणी स्वयंवर-प्रस्तावना

रुक्मिणी स्वयंवर या ग्रंथाचे पारायण केल्याने विवाह लवकर होण्यास मदत होते आणि सुस्वरूप, अनुरूप पती मिळतो असा अनेकांचा अनुभव आहे म्हणून शक्यतो कुमारिकांनी या ग्रंथाचे पारायण करावे.

रुक्मिणी स्वयंवर-प्रस्तावना

श्री एकनाथ महाराजांनी आपल्या "रुक्मिणी स्वयंवर" या आख्यान काव्यात सर्व प्रसंग उत्तम तर्‍हेने रंगविले आहेत. या ग्रंथाचे अनेक कुमारिका पारायण करतात. या ग्रंथाचे पारायण केल्याने विवाह लवकर होण्यास मदत होते आणि सुस्वरूप, अनुरूप पती मिळतो असा अनेकांचा अनुभव आहे म्हणून शक्यतो कुमारिकांनी या ग्रंथाचे पारायण करावे.

रुक्मिणी स्वयंवर' ग्रंथात एकूण १२ अध्याय आहेत व त्यातील सार पुढीलप्रमाणे आहे.

प्रसंग १ - भीमकाचा निर्णय

रुक्मिणी विदर्भराजा भीमक व शुद्धमती यांची कन्या. ५ पुत्रांनंतर झालेली ही कन्या. वसुदेव व देवकी यांचा पुत्र श्रीकृष्ण याच्या रूपगुणांची कीर्ती सर्वत्र पसरली होती. रुक्मिणीने ही कीर्ती ऐकली होती. त्यामुळे तिने मनानेच श्रीकृष्णाला वरले होते.

प्रसंग २-स्वयंवरास विरोध

भीमकाचा ज्येष्ठ पुत्र रुक्मी हा श्रीकृष्णाचा द्वेष करीत असे. त्याने शिशुपाल यास रुक्मिणी देण्याचे ठरविले. शिशुपाल सुद्धा श्रीकृष्णाचा द्वेष करीत असे. हा बंधूचा बेत पाहून रुक्मिणी घाबरली आणि तिने सात श्लोकांचे पत्र सुदेव ब्राह्मणाकडून श्रीकृष्णास पाठविले.

प्रसंग ३ - सुदेव श्रीकृष्णाकडे आले.

सुदेव ताबडतोब श्रीकृष्णाकडे आले. त्यांनी श्रीकृष्णास पत्र दिले. भीमकाची व शुद्धमतीची इच्छा प्रगट केली. रुक्मीचा विरोध सांगितला. शिशुपालाबरोबर रुक्मिणीचा विवाह होत असल्याचे सांगितले.

प्रसंग ४ - रुक्मिणीचे पत्र

श्रीकृष्णाने ते पत्र सुदेवासच वाचावयास सांगितले. त्यात लिहिले होते. त्याच्या श्रवणाने त्रिविध ताप नाहीसे होतात. तुमच्या ठायी माझे चित्त जडले आहे. मी अंबा पूजा दर्शनासाठी जाईन. तेथून आपण मला घेऊन जावे.

प्रसंग ५ - श्रीकृष्ण रथ घेऊन निघाला.

श्रीकृष्ण शस्त्रसंभार घेऊन रथातून निघाले. पाठोपाठ बलरामही सैन्य घेऊन निघाला. इकडे रुक्मिणीचा हळदी समारंभ चालला होता. रुक्मिणी सुदेवाची वाट पहात होती. येवढ्यात तिला सुदेव आलेला दिसला.

प्रसंग ६ /७ - श्रीकृष्णाचे आगमन

भीमकाने श्रीकृष्ण, बलरामाचे स्वागत केले. ते पाहून रुक्मी, जरासंध व शिशुपाल हे घाबरले.

शुद्धमतीने श्री अंबादर्शनाची आठवण केली पण रुक्मीने जाण्यास मनाई केली. परंतु रुक्मिणी नटून थटून देवदर्शनास निघाली. संरक्षणासाठी रुक्मीने काही सैन्य पाठविले. रुक्मिणी मंदिरात आली. अंबेची यथासांग पूजा झाली. देवीने गळ्यातील माळ तिच्या हाती टाकून उजवी दिली. ही माळ कृष्णास घालूया असे रुक्मिणीने मनात योजिले.

रुक्मिणी मंदिराच्या बाहेर आली. श्रीकृष्ण बाहेर उभा होता. त्याने सर्व सैन्याला जखडून ठेवले आणि रुक्मिणीला रथात घेऊन या यादवांत आला. रुक्मिणीने श्रीकृष्णाच्या गळ्यात माळ घातली आणि स्वयंवर संपन्न झाले.

प्रसंग ८ दोन्हीकडील सैन्य लढू लागले.

सैन्य शुद्धीवर आले. रुक्मी, जरासंध आले. त्यांनी श्रीकृष्णाला लढाईसाठी हाक मारली. यादवांचे सैन्यही युद्धास तयार झाले. बलराम युद्ध करण्यास आला.

प्रसंग ९ - रणसंग्राम सुरू झाला.

बलराम सैन्याला मारू लागला. त्या वेळी जरासंध धावून आला. कृतवर्मा व पौंड्रकाचे युद्ध सुरू झाले. अनेक रथ मोडले गेले. अनेक हत्ती मारले गेले. नंतर कौशिक, गवेषण व बलराम युद्ध सुरू झाले.

प्रसंग १० - गवेषणाचा पराजय.

गवेषणाने अनेकांचा पराभव करण्यास सुरुवात केली. गवेषणाने सारणास मूर्च्छित केले. इकडे बलराम व केशिक लढत होते. केशिकचा पराभव करून बलराम गवेषणाबरोबर लढू लागला. बलरामाने त्याचे सैन्य मारले. गवेषण पळून जाऊ लागला.

प्रसंग ११ - यादवांचा विजय झाला.

सात्विकाने वक्रदंताचा पराजय केला, त्याला पळवून लावले. गद व जरासंधाचे युद्ध सुरू झाले. तो गदाकडे पाठ करून पळू लागला. त्यामुळे त्याचे सर्व सैन्यही पळू लागले. त्यामुळे यादव विजयी झाले.

प्रसंग १२ - शिशुपाल व रुक्मीची दैन्य अवस्था

श्रीकृष्ण रुक्मिणीला घेऊन गेला. शिशुपालची दैन्य अवस्था झाली. त्याची आई श्रुतश्रवा रडू लागली. तो लढाईसाठी सैन्य घेऊन निघाला. वाटेमध्येच जखमी जरासंध भेटला. त्याने शिशुपालला सारी हकिगत सांगून परत फिरविले.

रुक्मी अतिशय संतापलेला होता. तो सैन्य घेऊन युद्धास निघाला. त्याने श्रीकृष्णावर अनेक प्रकारची अस्त्रे टाकली, परंतु श्रीकृष्णाने ती तोडून टाकली. अनेक मोठमोठ्या योद्ध्यांचा श्रीकृष्णाने पराभव केला.

प्रसंग १३ - बलरामाचा रुक्मिणीस उपदेश

युद्धातून रुक्मीचे अनेक सैन्य पळून गेले. यादवांना विजय प्राप्त झाला. रुक्मीची अवस्था पाहून बलरामने त्याला सोडून दिले. रुक्मिणीस बलरामाने उपदेश केला. तुझ्या भावाची अवस्था श्रीकृष्णाने जी केली, ती योग्यच आहे. श्रीकृष्णचरण प्राप्त झाल्यानंतर तुझे सर्व प्रकारचे द्वैत संपले पाहिजे. आता श्रीकृष्णाशी एकरूप हो.

प्रसंग १४ - विवाहसमारंभ

सर्व हकीगत भीमकास कळली. तो प्रभासला आला. त्याने श्रीकृष्णास नमस्कार केला व सांगितले, "कुंडिनपुरास आपण विवाह समारंभास यावे." बलरामासही बोलाविले. परंतु रुक्मिणीच्या सांगण्यावरून तेथेच विवाह संपन्न करण्याचे ठरविण्यात आले. शुद्धमतीने कुंडिनपुराहून सर्व विवाह साहित्य आणले. श्रीकृष्णाने वसुदेव, देवकी व उग्रसेन यांना बोलाविले. सर्वांनी मिळून भोजन केले.

प्रसंग १५ - लग्नसमय

श्रीकृष्णाने मुहूर्तमणी ओविला आणि सगळे नटून-थटून वसुदेव-उग्रसेनसह वधूमंडपाकडे वाजतगाजत निघाले. रुक्मिणी नटून-थटून सज्ज झाली. श्रीकृष्ण मंडपात आला. मधुपर्कपूजन सिद्ध झाले.

प्रसंग १६ - विवाहसंभ्रम

ब्राह्मणांनी मंत्रानी भीमकीच्या डोक्यावर अक्षता घातल्या. भीमकीला अंतरबाह्य सर्वत्र श्रीकृष्ण दिसू लागला. श्रीकृष्ण-रुक्मिणीचा विवाह संपन्न झाला. विवाह होम, पाणिग्रहण झाले. रुक्मिणी श्रीकृष्णाचे चरणास वंदन करू लागली परंतु तिला पायच कोठे दिसेनात. नंतर श्रीकृष्णाचे चरणकमलांना वंदन केले आणि दोधे एकरूप झाले.

प्रसंग १७ - घेंडानृत्य

बोधाने श्रीकृष्णास व देहाभिमानाने नोवरीस खांद्यावर घेऊन नाना प्रकारचे नृत्य केले नंतर भीमकाकडील अनेक कुलदेवतांची नृत्ये झाली.

प्रसंग १८ - द्वारकेत गृहप्रवेश

श्रीकृष्णास नाना वस्तू आंदण देऊन भीमक निघाले. इकडे द्वारकेस जाण्यास वरात निघाली. सर्व श्रृंगारले होते. विधीपूर्वक लक्ष्मीपूजन झाले.

संत एकनाथ महाराजांनी हे सर्व प्रसंग उत्तम तर्‍हेने रंगविले आहेत. या ग्रंथाचे अनेक कुमारिका पारायण करतात. या ग्रंथाचे पारायण केल्याने विवाह लवकर होण्यास मदत होते असा अनेक मंडळींचा अनुभव आहे.

या ग्रंथातील जीवा-शिवाचे मीलन समजून घ्यावे. अंत:करणातील सर्व प्रकारचे द्वैत नाहीसे करावे अणि सर्वांवर नि:स्वार्थ प्रेमाचा वर्षाव करून आनंदाने जीवनाची वाटचाल करावी.

Translation - भाषांतर
N/A

N/A
Last Updated : 2008-07-07T05:36:18.1570000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

eyelid

  • स्त्री. Zool. पापणी 
  • पु. नेत्रच्छद 
  • अधिपक्ष्म, पापणी 
  • नेत्रच्छद 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

why treeepad veedhee ? narrate
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.