भावगीते - सुरांची - हाक

गो.रं.आंबेकरांचा जन्म कर्नाटकातील कुनगोळ गावचा.


सूर एकादा निघावा, क्षितिज ओलांडीतसे ।
खुलुनि एखादी अलापी, आसमंता ढवळिते ॥
तान बरसावी अशी की, मनि तृषार्थी तृप्त हो ।
`सरगमी' ती लहर यावीं, भूल वायूसीं पडे ॥
लय जुळावी, ऐशि कीं, जाणीव सारी, विरतसे ।
ताल ऐसा भरुनि जावा, तोल अंतापरि वसें ॥
सम पडावी तेथ कीं, जीव-शीव गाठ पडोनिया ।
राग तो, ऐसा फुलावा, भिडुनि जाय अनंत रे ॥
ख्याल मांडावा पुढे, जणु ताज, यमुना तारीचा ।
ठुमरी रंगावी, अशी, ते इन्द्रधनु साकारिते ॥
गीत छेडावे कधितरी, घुमत शब्दां पलिकडे ।
भजन गावे एकदां, निर्गुण कोडे सुटतसे ॥
पुढति श्रोता-पारखी, अद्वैत स्पर्शाचा घडे ।
जमविणे, `अद्भुत मैफल', शुचीता मंगल वसे

N/A

References : N/A
Last Updated : February 10, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP