मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शब्द फुलोरा|प्रेमगीते-लावण्या-भावगीते| इशारा प्रेमगीते-लावण्या-भावगीते आवाहन आवाहन प्रतिमा रास-गीत नर्तकी चक्रव्युह शंकराचा अवतार - स्त्री इशारा वसंत सवाल - जबाब पारख सुरांची - हाक फुलराणी भावगीते - इशारा गो.रं.आंबेकरांचा जन्म कर्नाटकातील कुनगोळ गावचा. Tags : g r ambekarshabda phuloraगो रं आंबेकरशब्द फुलोरा इशारा Translation - भाषांतर आंगोपांगी चंपकाचा, रंग तोही केतकीचा ।नको सहवास तेथें, मत्सराच्या भुजंगाचा ॥केशकलाप काजळी, शिरांवरीं शोभीवंत ।गळा कोणाचा कधींही, नको गुंतवू गे त्यांत ॥धनुकली, भृकुटींच्या, आणि तेजाळ नयन ।विध्द कोणां करु नको, शरसंधान साधून ॥पोवळ्यांचे ओष्ठांतून, बोल-नव्हे, ते संगीत ।रक्त-रंजीत शब्दांनी, घाव जिव्हारीं नकोत ॥वदनांत चमकते, माला शुभ्र मौक्तीकांची ।तयांतुनी ओघळावी, ओळ गोड अक्षरांची ॥करपाश, कमनीय, करकमलेही लाल ।नखाग्रांनी सहचरां, नको करुं गे घायाळ ॥पदन्यास पाउलांचा, चालताना घेई ताल ।नको कोणांला लाथाडू, तुझे सांभाळ पाऊलं ॥ N/A References : N/A Last Updated : February 10, 2023 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP