भावगीते - शंकराचा अवतार - स्त्री

गो.रं.आंबेकरांचा जन्म कर्नाटकातील कुनगोळ गावचा.


चंद्रशोभतो मुखांवती, अन् नाग वेणीचा गळ्यावरीं ।
त्रितिय नेत्र, ती आग पसरली, मुखांत स्त्रिच्या जिभेवरीं ॥
एकां शब्दें, खुलुनि तियेचा, पूर्णचंद्र बध प्रकटेल ।
दुसर्‍या शब्दें, नाग फडीचा, डाव तुम्हावरि उलटेल ॥
तप पार्वतीचें उग्र, वरायां महादेव शंकर पुजिला ।
खूण आपुल्या अस्तित्वाची, स्त्री-हृदयामधी अवतरला ॥
गंगावतरण, पृथ्वितलांवर, गोठविले स्त्री-नेत्रांत ।
वेळीअवेळीं तीच वाहते, प्रकट होऊनीं ओघांत ॥
स्त्रीरुपाने महादेव हा, पृथ्वितलांवरी अवतरला ।
सांबसदाशिव भोळा, किंवा रौद्ररुप, चल बघायला ॥

N/A

References : N/A
Last Updated : February 10, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP