श्रावण वद्य ९

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.


अहमदनगरचा किल्ला व इंग्रज !

शके १७२५ च्या श्रावण व. ९ रोजीं इंग्लिश अहमदनगरचा किल्ला लांच देऊन घेतला. ख्रिस्त्री शकाच्या एकोणिसाव्या शतकांतील पहिल्या दशकापासूनच मराठी राज्यास उतरती कळा लागून राहिली होती. धनी बाजीराव हाताशीं आल्यावर शिंदे-होळकर आदि मराठे सरदारांचा पराभव करण्याकडे इंग्रज वळले. अहमदनगरचा किल्ला शिंदे यांच्या ताब्यांत होता. इंग्रजांची राजनीति मोठी ‘धूर्त’ - पणाची होती. श्रावण व. ५ रोजीं वेढ्याचें काम सुरु झाल्याबरोबर जनरल वेलस्ली यानें एक जाहिरनामा प्रसिद्ध केला. कीं, शिंदे-भोसले वेगवेगळेच होते ! दुसर्‍याच दिवशीं वेढयाचें काम जोरांत सुर झालें. किल्ल्यावर शिंदे यांच्याकडील पायदळांतील कांही लोक होते. थोडे घोडेस्वारहि असून किल्ल्याचें रक्षण करणारे नेहमींचे अरब शिपाई होते. या सर्वांनी किल्ला सोडण्यास नकार दिल्यावर इंग्रजांनी अहमदनगरच्या भोंवतीं असणार्‍या तटालाच वेढा दिला. तट आणि बुरुज उंच असल्यानें शत्रूचें कांही चाललें नाहीं. परंतु निकराचा    प्रयत्न करुन आणि मराठ्यांच्या गोळीबारास तोंड चालले तोंड देऊन इंग्रज भिंतीवरुन शहरांत तर घुसलेच. अर्थातच शहरांतील लोक किल्ल्यावर गेले. आतां किल्ल्यावर हल्ला कोठून व कसा करावा याविषयीं विचार सुरु झाला. किल्ल्याच्या भिंती मजबूत होत्या. परंतु इंग्रजांजवळील तोफखाना त्या भिंतींना सहज पाडून टाकणारा होता. त्याचाहि फारसा उपयोग होईना. तेव्हां वेलस्ली यानें एक युक्ति योजिली. या युक्तीचा फायदा दुर्दैवानें इंग्रजांना अनेक वेळां मिळाला होता. अहमदनगरच्या मजबूत किल्ल्यावर यश मिळणार नाहीं असें पाहतांच जवळ असणार्‍या भिंगारगांवच्या देशमुखाला इंग्रजांनीं वश करुन घेतलें; आणि त्याला चार हजार रुपये लांच देऊं केली. त्याबरोबर हल्ला कोठें करावा याचें ज्ञान इंग्रजांना मिळालें. झालें. श्रावण व. ९ रोजीं सहजासहजीं नगरचा किल्ला शत्रूच्या हातांत पडला.

- ११ऑगस्ट १८०३

N/A

References : N/A
Last Updated : September 26, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP