TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|साने गुरूजी|
खरा तो एकची धर्म। जगाला प...

खरा धर्म - खरा तो एकची धर्म। जगाला प...

साने गुरूजींचे संपूर्ण नाव - पांडुरंग सदाशिव साने


खरा धर्म
खरा तो एकची धर्म। जगाला प्रेम अर्पावे

जगी जे हीन अति पतित
जगी जे दीन पददलित
तया जाऊन उठवावे। जगाला....॥

जयांना कोणी ना जगती
सदा जे अंतरी रडती
तया जाऊन सुखवावे। जगाला....॥

समस्ता धीर तो द्यावा
सुखाचा शब्द बोलावा
अनाथा साह्य ते द्यावे। जगाला....॥

सदा जे आर्त अति विकळ
जयांना गांजिती सकळ
तया जाऊन हसवावे। जगाला....॥

कुणा ना व्यर्थ शिणवावे
कुणा ना व्यर्थ हिणवावे
समस्ता बंधु मानावे। जगाला....॥

प्रभूची लेकरे सारी
तयाला सर्वही प्यारी
कुणा ना तुच्छ लेखावे। जगाला....॥

जिथे अंधार औदास्य
जिथे नैराश्य आलस्य
प्रकाशा तेथ नव न्यावे। जगाला....॥

असे जे आपणापाशी
असे जे वित्त वा विद्या
सदा ते देतची जावे। जगाला....॥

भरावा मोद विश्वात
असावे सौख्य जगतात
सदा हे ध्येय पूजावे। जगाला....॥

असे हे सार धर्माचे
असे हे सार सत्याचे
परार्थ प्राणही द्यावे। जगाला....॥

जयाला धर्म तो प्यारा
जयाला देव तो प्यारा!
तयाने प्रेममय व्हावे। जगाला....॥

खरा तो एकची धर्म। जगाला प्रेम अर्पावे॥

-धुळे तुरुंग, मे १९३४

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2018-04-20T08:38:00.4230000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

रांदपिणी-पोर उपाशीं मरना

  • ( गो.) स्वयंपाकिणीचा मुलगा कधींहि उपाशीं मरत नाहीं. कारण तिच्याच ताब्यांत सर्व अन्नसामुग्री असते. व ती मुलाच्या जेवणाची तरतूद आधींच करते. ज्याच्या ताब्यांत संपत्ति आहे तो धनकोला द्यावयाच्या अगोदर आपल्या सग्यासोयर्‍यांचेंच हित पाहातो. तु ०- तळें राखी तो पाणी चाखी. 
RANDOM WORD

Did you know?

Navchandi Paath explain why it should be done?
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site