मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|साने गुरूजी|
दिसतात सुखी तात! सारेच लो...

दिसतात सुखी तात! सारेच लोक - दिसतात सुखी तात! सारेच लो...

साने गुरूजींचे संपूर्ण नाव - पांडुरंग सदाशिव साने


दिसतात सुखी तात! सारेच लोक
हसतात जगी तात! सारेच लोक ॥
मम अंतरंगात
परि ही निराशा
भरतात डोळे जळे, जाळि शोक ॥दिसतात.... ॥

खाणे पिणे गान
जग सर्व बेभान
असे फक्त माझ्याच हृदयात दु:ख ॥दिसतात.... ॥

फुलतात पुष्पे
गातात पक्षी
रडे एक मच्चित्त हे नित्य देख ॥दिसतात.... ॥

जनमोददुग्धी
मिठाचा खडा मी
कशाला? तुझे जाई घेऊन तोक ॥दिसतात.... ॥

-पुणे, ऑक्टोबर १९३४

N/A

References : N/A
Last Updated : April 10, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP