TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

अनन्वय अलंकार - लक्षण ३

रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.


लक्षण ३
लुप्त अनन्वयाच्या प्रकारांत धर्मलुप्त अनन्वयाचे ( उपमेप्रमाणें ) पाचही प्रकार संभवतात; उदाहरणार्थ, वरील दीड श्लोकांतील धर्मवाचक शब्द काढून टाकून, त्याचे जागीं दुसरा ( अर्थवाचक नसलेला ) शब्द घातल्यास, धर्मलुप्त अनन्वयाचे पाचही प्रकार होतील.
आतां वाचकलुप्त अनन्वयाचें उदाहरण :-
“ रामासारखा असलेला श्रीराम व सीतेसारखी मनोहर असलेली सीता हे जगाचे आईबाप, माझ्या अंत:करणांत नित्य विहार करोत. ”
वरील श्लोकांत क्यड्‍ प्रत्ययांत व समासांत वाचकाचा लोप झाला आहे, अशाच रीतीनें-“ अत्यंत चवताळलेल्या सर्पाप्रमाणें आपल्या सेनापतीसह बाहेर पडणार्‍या क्तुद्ध रावणानें, रणांगणामध्यें एकदम खळवळलेल्या रामाप्रमाणें दिसणार्‍या क्तुद्ध रामाला पाहिले. ”
कर्तरिणमुल्‍ इत्यादींच्या बाबतींतही उदाहरणें शोधून काढावीं.
“ ज्याप्रमाणें आकाश आकाशासारखें असतें, ज्याप्रमाणें समुद्र समुद्रासारखा असतो, त्याप्रमाणें हे किक्तमार्कराजा, तूं विक्तमार्क रजासारखा आहेस. ” या श्लोकांतील वाक्याच्या अवयवांत ( भागांत ) असलेल्या अनन्वय अलंकारांत धर्म व उपमावाचक यांचा लोप झाला आहे. पण सबंध श्लोकांतील मुख्य वाक्यार्थांत अनन्वयालंकाराचे निरुपमत्वरूपी जें फळ तद्रूप साधारणधर्म असलेली मालोपमाच आहे. अनन्वयाचें सोप्या रीतीनें ज्ञान व्हावें, म्हणूनच, ( अनन्वयालंकारांनी उत्पन्न केलेल्या ) मालोपमेचें या ठिकाणीं निरूपण केलें आहे.

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T12:53:57.5630000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

रांडापोरें

  • n pl  The inferior members of a family. 
RANDOM WORD

Did you know?

देवक म्हणजे काय ? त्याचे महत्व काय ?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.