TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

अनन्वय अलंकारः - लक्षण ४

रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.


लक्षण ४
“ देव, असुर व मानव यांनीं युक्त असलेल्या या विस्तीर्ण जगांत, रामासारखा पराक्रम असलेल्या रामाची, ज्ञाते लोकांकडून कोणाशीं तुलना केली जाईल बरें ! ”
या श्लोकांत वाचक, धर्म व उपमान या तिघांचाही लोप झालेला आहे. केवळ उपमान वगैरे एकेकाचा ज्यांत लोप आहे असे अनन्वयाचे दुसरे प्रकार ( फारसे ) संभवत नाहींत व संभवत असले तरी त्यांच्यांत चमत्कार नाहीं म्हणून त्यांची उदाहरणें दिलीं नाहींत.
आतां, “ उपमेय अथवा त्याचां एक भाग अथवा त्या उपमेयालाच, तें स्वत:हुन भिन्न आहे असें मानून, वरील तिघांना स्वत:चेंच उपमान करून, त्याच्याशीं सादृश्य दाखवणें हा अनन्वय अलंकार. अनन्वयाचे हे तीन प्रकार असे:-
(१) उपमेयालाच उपमान कल्पून त्याचें उपमानाशीं वरवर भासणारें साधर्म्य सांगणें हा अनन्वयाचा पहिला प्रकार; (२) उपमेयाच्या एका भागाला उपमान करून त्याचें सादृश्य सांगणें हा दुसरा प्रकार, (३) प्रतिबिंब वगैरेच्या योगानें भिन्न समजून त्याच्याशीं उपमेयाची तुलना करणें हा तिसरा प्रकार.
पहिल्या अनन्वयाचें उदाहरण-
“ युद्धांत अर्जुन अर्जुनाप्रमाणें प्रख्यात पराक्रमाचा दिसला. ”
दुसर्‍या अनन्वयाचें उदाहरण-
“ हजारो सुंदर स्त्रियांनीं भरलेल्या या जगांत हे भाग्यशाली पुरुषा ! तिचें डावीकडील अंग उजवीकडील अंगाचें अनुकरण करतें . ”
तिसर्‍या अनन्वयाचें उदाहरण-
“ श्रेष्ठ हत्तीचें मुख असलेल्या हे गणपते ! ऐरावत वगैरे हत्तींना तुझ्या मैत्रीचें ( सादृश्याचें ) शिक्षण तूं थोडेंसुद्धा दिलें नाहींस. तर मग तूं
कैलास पर्वताच्या रत्नाच्या भिंतींत पडलेल्या स्वत:च्या अनेक प्रतिबिंबांमध्यें ह्त्तींच्या कळपांचा मुख्य म्हणून कसा गणला जाशील ? ”
या तीनही प्रकारच्या अनन्वयालंकारांत दुसर्‍या उपमानांचा अभाव असलेला कळून येतो. अशा रीतीनें, अनन्वय तीन प्रकारचा आहे. ” असें जें रत्नाकारानें म्हटलें आहे तें बरोबर नाहीं. केवळ दुसर्‍या उपमानाचा अभाव प्रतीत होण्यानेंच अनन्वय अलंकार होऊं लागेल तर “ स्तनाभोगे पतन्‍ ० ” इत्यादि-श्ल्लोकांत दाखविलेल्या कल्पितोपमेलाही अनन्वयालंकार मानण्याचा प्रसंग येईल, व यद्यर्थातिशयोक्तीलाही अनन्वय म्हणण्याचा अतिप्रसंग होऊ लागेल-दुसर्‍या उपमानाचा अभाव प्रतीत होणें हेंच ज्याचें फळ आहे व ज्यांत उपमेयच उपमान होतें अशा सादृश्याला जर अनन्वयालंकार म्हणायचें असेल तर डावें अंग व उजवें अंग ( धडधडीत ) भिन्न असतांना त्या दोहोंमधील सादृश्याला तुम्ही अनन्वयाचा एक प्रकार कसें म्हटलें ? तुम्ही म्हणाल कीं, “ उपमेय, उपमेयाचा एक भाग व त्या उपमेयाचें प्रतिबिंब या तिघांपैकीं कोणतेंही एक ज्यामध्ये प्रतियोगी आहे अशा सादृश्याला अनन्वय म्हणत असल्यानें तुम्ही दाखवलेली अनन्वयाची, कल्पितोपमा व अतिशयोक्ति यांचे ठिकाणीं अतिव्याप्ति कुठून होणार ? ” पण हें तुमचें म्हणणें बरोबर नाहीं. ज्यांत सादृश्याचा उपमेय व उपमान यांच्याशीं अन्वय होत नाहीं तो अनन्वय, असा जो अनन्वय शब्दाचा अवयवार्थ तो, या तुम्ही केलेल्या
अनन्वयाच्या व्याख्येंत नसल्यानें, उपमेयाच्या एका भागाच्या सादृश्याला अनन्वय म्हणणें संभवत नाहीं. शिवाय अनन्वयामध्येम “ आकाश आकाशाच्या आकाराचें ” इत्यादि वाक्यांत, उपमेयालाच उपमान कल्पिलें असल्यामुळें, उपमेयाहून निराळें उपमान नाहीं अशी प्रतीति होते व त्या-द्वारां उपमेयाचें निरुपमत्व सिद्ध होतें. पण, “ एतावति प्रपंचे० ” इत्यादि श्लोकांत डावें अंग हें उपमेय व उजवें अंग हें त्याचें उपमान, असें सांगितल्यानें, त्या उपमेयाचें निरुपमत्व ( म्हणजे त्याला उपमान नसणें ) सांगणें विरुद्धच आहे. आतां, ( वरील श्लोकांत ) ( नायिकेच्या ) कान्तेच्या निरुपमत्वाचा प्रत्यय येतो ही गोष्ट खरी; पण तें, अनन्वय अलंकाराचें फळ आहे असें म्हणणें योग्य होणार नाहीं. कारण या श्लोकांत कान्ता ही उपमेय म्हणून आलेलीच नाहीं.

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T12:53:57.6100000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

पदर फाडून देणें

 • स्त्रीनें नेसलेल्या वस्त्राचा पदर फोडून देण्याची कांहीं लोकांत विवाहविच्छेद निदर्शक चाल आहे यावरुन. विवाहसंबंध तोडणें 
 • काडीमोड करणें 
 • घटस्फोट करणें. 
RANDOM WORD

Did you know?

हिंदू धर्मियांत विधवा स्त्रिया कुंकू का लावत नाहीत?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.

Status

 • Meanings in Dictionary: 644,289
 • Dictionaries: 44
 • Hindi Pages: 4,328
 • Total Pages: 38,982
 • Words in Dictionary: 302,181
 • Tags: 2,508
 • English Pages: 234
 • Marathi Pages: 22,630
 • Sanskrit Pages: 11,789
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.