TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

अनन्वय अलंकार - लक्षण १

रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.


लक्षण १
आतां अनन्वय अलंकार-

“ दुसर्‍या सदृश पदार्थाचा निरास हें ज्याचें फळ, अशा वर्णनाला विषय होणारें, व ज्यांत उपमेय व उपमान एकच असतें, अशा सादृश्याला अनन्वय अलंकार म्हणतात. ”
तो अनन्वय कोणत्यातरी प्रधान अर्थाला उपस्कारक होत असेल तरच त्याला अलंकार म्हणावे; व तो तसा होत नसेल तर, त्याला शुद्ध अनन्वय म्हणावें.
तांबडया व पिवळ्या फुलांनीं झाकलेलें पर्वताचें शिखर, ( दुसर्‍या ) कोणत्या तरी वेळेला, वणव्याच्या ज्वाळांनीं व्याप्त झालेल्या पर्वताच्या शिखरा-प्रमाणें ( म्हणजे, स्वत:प्रमाणें ) शोभत आहे. ”
या श्लोकांत, तांबडया व पिळ्या फुलांनीं झाकलेल्या पर्वताच्या शिखराची, कोणत्यातरी वेळीं वणव्याच्या ज्वाळांनीं व्याप्त झालेल्या स्वत:शींच तुलना केली आहे; म्हणून, स्वत:शींच असणार्‍या अशा सादृश्याचें निवारण करण्याकरतां, अनन्वयाच्या व्याख्येंतील, ‘ विषयीभूतं ’ पर्यंतचें ( पहिलें ) विशेषण घातलें आहे सदृश असा दुसरा पदार्थ नाहीं, असें जेथें सूचित होत असेल तेथेंच अनन्वय समजावा, हा या विशेषणाचा अभिप्राय.
अथवा अनन्वय ( होत ) नसल्याचें हें उदाहरण-
“ नखकिरणांच्या पंक्तींनीं सुंदर दिसणारी, व अवर्णनीय, अशी श्रीहरीच्या चरणकमलाची जोडी, आकाशगंगेच्या नव्या प्रवाहांच्या समूहानें घेरलेल्या श्रीहरीच्याच चरणकमलाच्या जोडीप्रमाणें स्पष्टपणें शोभली. ”
या श्लोकांतही नखकिरणांच्या पंक्तींनीं सुंदर असलेल्या श्रीहरीच्या चरणकमलाची, आकशगंगेच्या प्रवाहाच्या समूहानें घेरलेल्या चरणकमलाशीं तुलना केला आहे. श्लोकांत केलेल्या वर्णनाच्या वेळीं, श्रीहरीच्या चरण-कमलाचा आकाशगंगेच्या प्रवाहाशीं संबंध नसल्यामुळें, आकाशगंगेच्या उत्पत्तिकालाच्या वेळींच असलेल्या त्या चरणकमलाला उपमान समजता यावें एवढ्याकरता, श्लोकांत अभिनव हें विशेषण प्रवाहाला देण्यांत आलें आहे. पण, ( चरणकमलासारखा ) सदृश असा दुसरा पदार्थ नसणें हें, या श्लोकांतील सादृश्याच्या वर्णनाचें फळ ( तात्पर्य ) नाहीं; कारण, तशा अर्थाची, या वर्णनांत प्रतिति होत नाहीं.
“ गालावरून स्तनाच्या विस्तारावर पडणारा कुरळा केस, चंद्र-बिंबावरून मेरूपर्वतावर लोंबणार्‍या सापाप्रमाणें शोभतो. ”
या कल्पित उपमान असलेल्या उपमेंत अनन्वयाची अतिव्याप्ति होऊ नये म्हणून, अनन्वयाच्या व्याख्येंत, ‘ जें उपमेय तेंच उपमान ज्यांत आहे असें सादृश्य ’ असें सादृश्याला विशेषण दिलें आहे.

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T12:53:57.4530000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

biarticulate

 • Bot. (having two nodes or joints) द्विसंधिक 
RANDOM WORD

Did you know?

सुतकातील नियमांबद्दल मार्गदर्शन करावे.
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.

Status

 • Meanings in Dictionary: 644,289
 • Dictionaries: 44
 • Hindi Pages: 4,328
 • Total Pages: 38,982
 • Words in Dictionary: 302,181
 • Tags: 2,508
 • English Pages: 234
 • Marathi Pages: 22,630
 • Sanskrit Pages: 11,789
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.