मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत चोखामेळा|संतांच्या स्मृतीत चोखामेळा| अभंग ११ ते १३ संतांच्या स्मृतीत चोखामेळा संत नामदेवांच्या स्मृतीत चोखामेळा चोखोबांच्या स्त्रीचे बाळंतपण चोखामेळा यांच्या समाधीचे अभंग संत नरहरी सोनार यांच्या स्मृतीत चोखामेळा अभंग १ ते ५ अभंग ६ ते १० अभंग ११ ते १३ संताजी जगनाडे यांच्या स्मृतीत चोखामेळा महिपतीबुवा यांच्या स्मृतीत चोखामेळा गुंडा महाराज यांच्या स्मृतीत चोखामेळा हरिहर महाराज यांच्या स्मृतीत चोखामेळा स्वामी स्वरूपानंद यांच्या स्मृतीत चोखामेळा संत दासगणू यांच्या स्मृतीत चोखामेळा अनामी यांच्या स्मृतीत चोखामेळा स्तुतिपर अभंग - अभंग ११ ते १३ श्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखाबा एक अस्पृश्य होते. Tags : abhangchokhamelaअभंगचोखामेळा अभंग ११ ते १३ Translation - भाषांतर ११) श्रीरामनामें तारिले पाषाण । नामाचें महिमान कोण जाणें ॥१॥उफराट नामें तारियेला कोळी । दोष जाहले होळी रामनामें ॥२॥तारियेली गणिका तारियेली देखा । पवित्र तो चोखा रामनामें ॥३॥एका जानार्दनीं रामनाम जप । पवित्र तें देख रामनाम ॥४॥१२) अनुभवें नाम गाताती गणिका । मोक्षपद देखा प्राप्त जालें ॥१॥उलटया अक्षरीं वाल्हा तो तरला । उद्धार तो केला चोखियाचा ॥२॥यातीसी संबंध नाहीं नामस्मरणीं । जपोत पैं कोणी आदरें नाम ॥३॥जनार्दनीं एका सांगतसे खूप । श्रीरामनाम पूर्ण सोडूं नये ॥४॥१३) चोखियाची भक्ति कैसी । प्रेमें आवड देवासी ॥१॥ढोरें वोढी त्याचे घरीं । नीच काम सर्व करी ॥२॥त्याचे स्त्रीचे स्त्रीचें बाळंतपण । स्वयें करी जनार्दन ॥३॥ऐसी आवड भक्ताची देखा । देव भुलले तया सुखा ॥४॥नीच याती न मनीं कांहीं । एकाजनार्दनीं भुलला पाहीं ॥५॥ N/A References : N/A Last Updated : July 10, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP