नवम स्कंध - अध्याय अकरावा

श्री मत्स्वच्छंदानंदानी रचिलेल्या प्रसिद्ध देवी भागवतसाराचा मराठी अवतार म्हणजे प्रस्तुत ‘ श्री देवी विजय ‘ ग्रंथ होय.


श्रीगणेशायनमः । नारदम्हणेमहामुनी । सावित्र्याख्यान ऐकुनी । आनंदझालामाझेंमनीं । कर्मविपाकऐकिला ॥१॥

आतांलक्ष्मीचेंचरित्र । मज ऐकवीपवित्र । कोणेंपुजिलीकोणमंत्र । प्रगटकेवींजाहली ॥२॥

तेव्हांबोलेनारायण । प्रकृतीपुरुषदोघेंजण । त्याप्रकृतीपासून । लक्ष्मीप्रगटेवामांसी ॥३॥

दक्षिणांसीराधाझाली । पूर्वींचकृष्णेंतीवरिली । कृष्णावामांसीप्रगटली । विष्णुमूर्तिचतुर्भुज ॥४॥

द्विभुजेंतेव्हांतयासी । लक्ष्मीदिलीसंतोषी । दोघेंगेलेंवैकुंठासी । लक्ष्मीआणिनारायण ॥५॥

तीलक्ष्मीमहामाया । झालींयोगेंजगन्मया । नानारुपेंसर्वठायां । व्यापूनियाशोभविलें ॥६॥

स्वर्गमृत्यूपाताळ । महालक्ष्मीव्याप्तसकळ । तियेचेयोगेंमंगळ । अमंगळलक्ष्मीविना ॥७॥

प्रथमपूजाविष्णूची । दुजीपुजाविधीची । तिसर्‍यानेंशंकराची । मन्वादिकींअनंतर ॥८॥

दुर्वासशापेंकरुन । इंद्रलक्ष्मीकोपून । वैकुंठींझालीलीन । सिंधुकन्यातीझाली ॥९॥

इंद्रेंकेलेंमधुपान । रंभेसहक्रीडेवन । मार्गींदुर्वांसादेखून । नमिलातेणेंआदरे ॥१०॥

विष्णुप्रसादपारिजात । ऋषिपुरंदरासिदेत । तेंपुष्पघेऊनत्वरित । इंद्रेंठेविलेंकरिमाथां ॥११॥

पुष्पस्पर्शेंऐरावत । झालातेजेउन्मत्त । इंद्रांतेव्हांझुगारित । गेलावनींमोकळा ॥१२॥

मत्तहोऊनपवीश्वर । पुष्प अवमानिलेंथोर । कोपलातेणेंमुनिवर । बिडोजाशीशापिलें ॥१३॥

हेमूढापाकशासन । केवीकरिसीअवमाना । विष्णुप्रसादचतुरानना । वंद्यहोयशिवासीजो ॥१४॥

महापातकाचेदहन । विष्णुप्रसादसेवन । त्रैलोक्यहोयपावन । निर्माल्यस्पर्शमात्रें ॥१५॥

त्याचाकरिसीअव्हेर । दरिद्रीहोसत्वर । लक्ष्मीजाईलविष्णुपुर । तुजटाकोनीममशापें ॥१६॥

कोणासीमीनाहींभीत । कायकरीलतुझातात । बृहस्पतीपुरोहित । मरीचिअथवाविरंची ॥१७॥

ऐकतांऋषिशापवणी । इंद्रालोखेमुनिचरणीं । म्हणेस्वामीमजशापोनि । दंडकेलायथार्थ ॥१८॥

नमागेमीराज्यादिक । ज्ञानद्यावेंमोहनाशक । जेणेंहोईलसुख । उपदेशावेकृपेनें ॥१९॥

मुनिम्हणेपुरंदरा । बीज ऐक अज्ञानांकुरा । जन्ममृत्यूशोकजरा । विपद्वीजसंपत्ती ॥२०॥

लक्ष्मीप्राप्तहोयजरी । दोषकितीतेअवधारी । धनमदाचीथोरी । सांगतोंतुज ॥२१॥

धनजैसेंजैसेंमिळें । आशावाढेंवेळवेळे । तुप्तिनसेचिकदाकाळें । द्रव्यलाभहोतांची ॥२२॥

पाप अथवाअन्याय । सहजघडेंलोभमय । परदुःखाचाआशय । नयेमनींकदापि ॥२३॥

धनाचेंकरितांरक्षण । निद्रानये एकक्षण । मोहजडेविलक्षण । नसेविश्वासकोणाचा ॥२४॥

प्राणाहूनिजरीप्रिय । धनयोगेंतोअप्रिय । धनयोगेसर्वाप्रिय । उपकारतुच्छमानीत्याचे ॥२५॥

अहंपणाअंगींचढे । लोकींप्रतिष्ठावाढें । मीथोर ऐसेंगाढे । ठसावेंमग अंतरी ॥२६॥

सुखघेईंविषयाचे । वस्तुमात्रींमनलालचें । शरीरींमगसुखाचे । चोजवाढेंअतिशय ॥२७॥

किंचितहीश्रमनसोसें । नेत्रांपुढेंकांहींनदिसे । थोरपणाचेंभरेंपिसे । कर्ण असोनीतोबहिरा ॥२८॥

पाय असोनीपांगुळा । नेत्र असोनिअंधळा । सेवकगर्जतीवेळवेळां । सावधव्हावेंम्हणूनीं ॥२९॥

वाचाळपरीमुकाजैसा । नबोलेखुळाजैसा । संपत्तीचाएंवसोसा । लागेजेव्हां ॥३०॥

तेणेंहोयमदांध । वाढेंतेव्हांभवबंध । लोभमानकामक्रोध । उपजतींतेणेंची ॥३१॥

सुखभासेंविषयागमी । परीदुःखहोयपरिणामीं । संगसुखेंरजतमी । न इच्छीमोक्षमार्ग ॥३२॥

बरीवाटेप्रवृत्ती । नोळखेकदांनिवृत्ती । मावळेंतेव्हांस्वात्मवृत्ती । दुर्वृत्तहोयमदांध ॥३३॥

विषयमदेंनासलेडोळे । संपत्तीखूपलागेबळें । दरिद्रांजनेंनिर्मळे । नेत्रहोतीसवेग ॥३४॥

रजतमतेव्हांनासत । सत्वशुद्धप्रकाशत । मोक्षमार्गतेव्हांदिसत । मदमळनासता ॥३५॥

एवंशक्रासेबोधून । कैलासांज्जायतपोधन । स्वर्गीगेलावृत्रहण । भ्रष्टश्रीकपाहिलें ॥३६॥

अस्रुरेंनगरवेष्टिलें । भयंकरसर्वभासले । गुरुचरणवंदिले । मंदाकिनीतीरासीं ॥३७॥

वाक्पपतीसतोसुरपती । सांगेसर्वकर्मगती । सर्वांसहबृहस्पती । ब्रम्हलोकींपातला ॥३९॥

चतुर्मुखेंऐकूनवृत्त । मानसीहोयविस्मित । अवश्यभावींनचुकत । मायाबलदुस्तरहें ॥४०॥

तेव्हांस्वयेंब्रम्हदेव । सवेघेऊनसर्वदेव । वैकुंठींयेऊनमाधव । स्तविलातेणेंवेदपदी ॥४१॥

कथिलासर्ववृत्तांत । मघवादुःखेंरुदनकरीत । अभय देईरमाकांत । अचलाश्रीदेईनम्हणे ॥४२॥

परिवाक्यसमयोचित । ऐकामाझेंकिंचित । परिणामींकरीहित । सत्यमित अतिप्रीय ॥४३॥

असंख्यातहाजन । सर्वमाझेंआधीन । परीमीभक्तपराधीन । स्वतंत्रनाहींमोकाटा ॥४४॥

निरंकुशमाझेंभक्त । तेजयावरीकोपत । तेथेंमीनवसेंसत्य । सलक्ष्मीकतयांघरीं ॥४५॥

शंकरांशतोमुनीवर । माझाभक्त अतिथोर । तद्वचनेंअतिसत्वर । गृहत्यागिलेंतुमचेंमी ॥४६॥

शंखध्वनीशिवार्चन । नतुळसीविप्रभोजन । भक्तनिंदाभक्तीहीन । तेथेंपद्मानराहे ॥४७॥

हरिवासरीजन्मदिनीं । भोजनकरीजोप्राणी । ममनामेंकन्याविकूनी । द्रव्यघेईदुरात्मा ॥४८॥

जेथेंनजेवीअतिथी । जारिणीपुत्र अथवापती । शूद्रश्राद्धान्नखाती । पद्मातेथेंनराहे ॥४९॥

शुद्रशवाचेंकरीदहन । शूद्रगृहींशिजवीअन्न । वृषावरीआरोहण । करितांपद्मानराहे ॥५०॥

हिंसानिंदाक्रूरमन । शुद्रगृहींकरीयजन । जोभक्षीअवीरात्र । पद्मातेथेंनराहे ॥५१॥

नखानेंछेदीतृण । मखेंभूचेविलेखन । निराशजायब्राम्हण । पद्मातेथेंनराहे ॥५२॥

सूर्योदयींकरीभोजन । दिवसांकरीतसेशयन । दिवसांचकरीमैथुन । पद्मातेथेंनराहे ॥५३॥

विप्रजोआचारहीन । शूद्राचेघेईंदान । अदीक्षितस्वांगवादन । पद्मातेथेंनराहे ॥५४॥

ओलेंचपायठेऊन । नग्नचीकरीशयन । सदाहसेबहुभाषण । पद्मातेथेंनराहे ॥५५॥

तेललावुनीशिरी । अन्यासीजोस्पर्शकरी । व्रतोपवाससंध्यानकरी । पद्मातेथेंनराहे ॥५६॥

सदाराहेमलीन । शिवविष्णूभक्तिहीन । निंदकहिंसकदयाहीन । पद्मातेथेंनराहे ॥५७॥
 
शालिग्रामशंखतुलसी । सेवाकरीभक्तीसी । शिवदुर्गाआर्चनाशी । करीतेथेंश्रीवास ॥५८॥

विप्रसेवाविप्रभोजन । सर्वदेवांचेंअर्चन । शिवविष्णूनामस्मरण । करीतेथेंश्रीवास ॥५९॥

ऐसेंबोलूनसुराशी । बोलेप्रेमेंरमेशी । क्षीरोदधींतकलांशी । अवतरोनीसुररक्षी ॥६०॥

विधीसीसांगेनारायण । क्षीरोदकींजेंमंथन । लक्ष्मीदेवासीदेऊन । सुखीकीजेपद्मजा ॥६१॥

अंतःपुरींगेलाहरी । देव आलेक्षीरसागरी । शेषाचीकेलीदोरी । रवीकेलीमंदराचला ॥६२॥

कूर्माचाकेलाआधार । मंथितीतेव्हांसुरास्रुर । कालकूटविषदुस्तर । पूर्वींप्रगटजाहलें ॥६३॥

उठतींसागरींविषज्वाला । कल्पांततेणेंआरंभिला । सर्वींतेव्हांशिवस्तविला । प्रसन्नझालादयाळ ॥६४॥

सर्वांचेंकरायारक्षण । विपाचेंकेलेंपान । सर्वजगाचेशोषण । भूषणझालेस्मरांतका ॥६५॥

नीलकंठनामझालें । सर्वजगांतेंरक्षिलें । मंथनपुन्हाचालिलें । सागराचेसवेग ॥६६॥

सप्ताश्व इंदूपारिजात । धन्वंतरीधेनुअमृत । सुदर्शनशंख ऐरावत । निधिपद्मरमारत्नें ॥६७॥

रमाविष्णूसीवरी । अमृतार्थसुरासुरी । कलहहोतापरस्परीं । मोहिनीझालामाधव ॥६८॥

देवांपाजिलेंअमृत । सूर्यचंद्रामध्येंबैसत । सुधार्थसिंहिकासुत । सुधाबिंदुलाधला ॥६९॥

तेणेंझालातोअमर । विष्णुछेदीत्याचेंशिर । एकाचेतेदोन असुर । राहुकेतुजाहले ॥७०॥

सूर्यचंद्रेंसांगितलें । म्हणोनित्यांसीवैरझालें । उपरागतोचिग्रहणझालें । चंद्रसूर्यासवैरत्वें ॥७१॥

देवीदैत्यपराभविलें । विप्रशापांतूनीसुटले । लक्ष्मीकृपेंराज्यपावलें । स्वर्गलक्ष्मीसुस्थिरा ॥७२॥

इंद्रेंकेलेंपूजन । मंत्राचेकेलेंअनुष्टान । रमादेतसेदर्शन । विमानस्थांजगत्प्रसू ॥७३॥

ब्रम्हहरीहर आर्चिंती । सर्वमुनीमनींध्याती । इंद्रकरीभावेंस्तुती । वेदोक्तजीविधिदत्त ॥७४॥

पद्मनेत्रेपद्मानने । पद्मकरेपद्मासने । हेपद्मेपद्मभूषणे । पद्मजस्तुतेवंदितों ॥७५॥

कृष्णप्रियेकृष्णमये । श्रीकृष्णेंकृष्णह्रदये । कृष्णान्वयेकृष्णमाये । कृष्णस्तुतेवंदितों ॥७६॥

हर्षदेहर्म्यदेमाते । वृद्धीसिद्धिसिंधुजाते । लक्ष्मीलज्जेविष्णुकांते । चंद्रशोभेवंदितों ॥७७॥

वैकुठींतूंक्षीरसागरीं । राजगृहींतूंशक्रपुरी । गृहस्थाचेराहसीघरी । देवमातेवंदितों ॥७८॥

स्वाहास्वधासर्वांधारा । सत्वरुपातूंचिधरा । धर्मार्थकाममोक्षसारा । वेदसारावंदितो ॥७९॥

मातेचातोमिळेस्तन । बाळवाचदैवधीन । परीकोणीहीतुजवांचुन । वांचुनशकेनिश्चये ॥८०॥

करुनियाकृपादृष्टी । वाचीव अंबेतवसृष्टी । तुजवांचून अनावृष्टी । बहुदुःखसोशिलें ॥८१॥

नमूंतुज आदिमाये । मूळप्रकृतीअव्यये । नमोनमोकरुणामये । विश्वभर्त्रीनमोस्तु ॥८२॥

ऐकतांचिऐसेंस्तवन । श्रीरमाझालीप्रसन्न । केलेदेवश्रीसंपन्न । गेलोस्वयेवैकुंठा ॥८३॥

करितांहेंस्तोत्रपठन । नरहोयभाग्यसंपन्न । दरिद्रजायनिरसून । पुत्रपौत्रयशवाढें ॥८४॥

एकुणसाठदोनशत । श्लोकलक्ष्मीचेचरित । तीचयेथेंप्राकृत । महालक्ष्मीबोलिली ॥८५॥

देवीविजयेनवमस्कंदेनारद नारायणसंवादे । लक्ष्म्यावतारवर्णनंनामएकादशोध्यायः ॥११॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP