नवम स्कंध - अध्याय सातवा

श्री मत्स्वच्छंदानंदानी रचिलेल्या प्रसिद्ध देवी भागवतसाराचा मराठी अवतार म्हणजे प्रस्तुत ‘ श्री देवी विजय ‘ ग्रंथ होय.


श्रीगणेशायनमः । नारदासांगेनारायण । शंखचुडेंसकाळींउठून । नित्यसर्व आटपून । स्वस्तिवाचनकरविलें ॥१॥

भांडारेंसंहस्त्रफोडिलीं । ब्राम्हणातेसमर्पिली । गजतुरगरथादिमेळी । दानकरीयाचका ॥२॥

शतकोटीग्रामदिले । पुत्रासीपदींस्थापिलें । भार्याठेवूनसिद्धकेले । सैन्यसर्वतेकाळीं ॥३॥

अश्वभारलक्षतीन । एकलक्षवारण । रथ अयुतपरिमाण । तीनकोटीधनुर्धारी ॥४॥

तीनलक्ष अक्षौहिणी । सवेघेतलीवाहिनी । स्वयेंबैसलाविमानीं । जयभेरीठोकिल्या ॥५॥

तोमोठारणधीर । पातलाजेथेंपुरहर । उतरुनीखालेसत्वर । नमनकेलेंशंकर ॥६॥

सिद्धाश्रमतोसुंदर । पुण्यभद्रानदीतीर । श्रीशैल्याचाउत्तर । पश्चिमेसीमलयाच्या ॥७॥

गंधमादनाचीदक्षिण । पंचयोजनविस्तीर्ण । दीर्घझालीशतगुण । नदीजेणेंशुद्धजला ॥८॥

वामीकरोनीगोमती । मिश्रघेऊनशरावती । गेलीपश्चिमाब्धीप्रती । शंकरतेथेंदेखिला ॥९॥

वटमूलींयोगासनी । बैसेतर्कमुद्राकरुनी । शुद्धस्फटिकशोभनी । कांतीजेवींकोटिमित्र ॥१०॥

त्रिशूलडमरुपट्टिशधर । शोभेव्याघ्रचर्मांबर । आशुतोषमहाउदार । विश्वंभरविश्वेश ॥११॥

विश्वबीजविश्वहर । विश्वव्यापीगुणाकार । गुणांतीतपरात्पर । शंखचूडेंनमियेला ॥१२॥

स्कंदादिसर्वपार्षदगण । तयादेतीअभ्युथ्थान । परस्परेंअभिवादन । कुशलप्रश्नजाहले ॥१३॥

शिवेबैसविलाजवळी । प्रसन्नात्माचंद्रमौळी । बोलेंतयासीतेकाळीं । हितयुक्तमितवाक्य ॥१४॥

सर्वजगाचाविधाता । चतुराननधर्मपिता । उत्पादिलेमानससुता । त्यांतएकमरीची ॥१५॥

कश्यपतयाचासुत । धर्मिष्ट अतिविख्यात । दक्षतयाशीदेत । तेराकन्याआपुल्या ॥१६॥

दनुनामेंत्याचीभार्या । साध्वीपतिव्रताआर्या । चाळीसपुत्रमहावीर्या । तेजःपुंजजाहले ॥१७॥

तयामाजीविप्रचित्ती । महाबळीतोनिश्चिती । दंभपुत्रतयाप्रती । विष्णुभक्तजाहला ॥१८॥

तेणेंजाऊनपुष्करी । तपकेलेंलक्षवत्सरी । शुक्रगुरुनिर्धारी । केलातेणेंभक्तीनें ॥१९॥

तेव्हांतुज ऐसासुत । लाधलातोनिश्चित । तूंहीपरमविष्णुभक्त । सखाकृष्णाचागोलोकीं ॥२०॥

विष्णुभक्त अतिविरक्त । त्रैलोक्यतुच्छमानित । चारीमुक्तीन इच्छित । सेवनावीणहरीच्या ॥२१॥

शापेंदानवझालासी । पूर्वस्मरण आहेतुसी । किमर्थदेवसंपत्तीशी । घेशीसागशंखचूडा ॥२२॥

बंधुसर्वपरस्पर । कांकरिसीव्यर्थवैर । त्यांचेंत्यांसदेईसाचार । राज्यभोगीसुखानें ॥२३॥

ज्ञातिद्रोहाचेपातक । सर्वकुळांचेघातक । आणीकजीब्रम्हहत्यादिक । लघुसर्वयापुढें ॥२४॥

जरीऐसेमानिशी । न्यूनहोईलसंपत्तीशी । समकाळासदांकोणाशी । नाहींजाणदानवा ॥२५॥

शंखचुडतेव्हांबोलें । खरेंविभोसांगीतले । परीदेवीनिपातिले । बहुदानवछळूनी ॥२६॥

पूर्वजांचीजेपद्धती । आचारावीम्यानिश्चितीं । परीयुद्धकरितांमत्संगतीं । लाजिर्वाणेंप्रभोतुज ॥२७॥

आम्हीतुच्छ असुर । तूंतोदेवामहेश्वर । एवढेंचमाझेंमानसांतर । कष्टवाटेकैवल्या ॥२८॥

हंसोनिबोलेस्मरारी । लाजकैचीमजसमरी । तुम्हींलहानकींसंसारीं । तुजसमश्रेष्ठनसें ॥२९॥

देवाचेदेईंदेवाशीं । अथवायुद्धकरीमजसी । किमर्थव्यर्थवादासी । करणेंयेथेंदानवेंद्रा ॥३०॥

मगनमुनीशिवाशी । उठिलाशूरवेगेशी । आरुढलाविमानाशी । सहामात्यतेधवा ॥३१॥

देवसैन्यशिवेंप्रेरिलें । शंखचुडेंआपले । युद्धतेव्हांआरंभिलें । परस्परजिगीषा ॥३२॥

वृषपर्वाआणिइंद्र । दंभ आणिचंद्र । विप्रचित्तीआणिमित्र । कालखराशीकालतो ॥३३॥

एवंद्वंद्वयुद्धचालले । शस्त्रास्त्रेंवर्षतींबळे । स्कंदकालींतेवेळें । शिवापाशीबैसती ॥३४॥

कोटिशःअसुरघेऊन । शंखचूडबैसेसुखान । अस्रुरबळेदेवसैन्य । पळविलेंतेसमईं ॥३५॥

पाहुनस्कंदकोपला । स्वयेंयुद्धाधांवला । देवसैन्याधीर आला । स्वतेजेवाढवितो ॥३६॥

स्वबाणेकरुन । दैत्यकेलेछिन्नभिन्न । कालीहीतेव्हांगर्जोन । ग्रासावयाधांवली ॥३७॥

एकहस्तेंलक्षहस्ती । एकदांचकोटपदाती । तेवीरथ असंख्याती । मुखांमाजीटाकित ॥३८॥

चाउनियाचराचरा । दैत्यांचाकेलाचुरा । अट्टहासेभयंकरा । रणांमाजीफिरतसे ॥३९॥

वायुवेगेजेवीदहन । ज्वालेनेंजाळीशुष्कवन । तेवींकालीदैत्यभोजन । क्षुधाशांत्यर्थकरीतसे ॥४०॥

शत अक्षौहिणीपृतना । स्कंदधाडीयमसदना । असुरसर्वशस्त्रेंनाना । प्रहरतीस्कंदावरी ॥४१॥

स्कंदशक्तीनेंपीडित । सर्वहीझालेदैत्य । परितेरणनटाकित । शूरधीरपराक्रमी ॥४२॥

देववर्षतीस्रुमने । जयशब्दकरितिस्वने । दुमदुमिलेंनिस्वने । आकाशसर्वभेरीच्या ॥४३॥

जेवींहोतोमहाप्रलय । तेवीनासतीदैतेय । पहातांचिनृपवर्य । युद्धकरीस्वयेंची ॥४४॥

सोडिलेशस्त्रास्त्रनिकर । आच्छादिलाशिवकुमर । धनुष्यभंगिलेंदुर्धर । जर्जराकेलाशिखीते ॥४५॥

शक्तिटाकिलीछेदून । पडेस्कंदमूर्छायेऊन । पुन्हासावधहोऊन । अन्ययानींबैसला ॥४६॥

शस्त्रास्त्रेंवर्षलाअपार । नगनाग अग्निघोर । छेदिलेंसर्वशस्त्रपूर । अग्नीविझवीपर्जन्ये ॥४७॥

रथधनुअश्वध्वज । सारथीमुकुटछेदिसहज । शक्तिघायेदैत्यराज । मूर्छितकेलाषणमुखें ॥४८॥

तोहीसावधहोऊन । अन्यरथींबैसून । विष्णुशक्तीदीप्यमान । गुहावरीफेकिली ॥४९॥

गुहपडलामूर्छित । कालीतयाकडियेघेत । शिवापाशीआणित । जीवविलेज्ञानेंशिवे ॥५०॥

कालीकरीसमर । सकळसंहारिलेअसुर । अनेकशस्त्रांचेप्रहार । कालीकरीतयासी ॥५१॥

नहोयतयाचाघात । कालीस्मरेपाशुपत । तव आकाशवाणीहोत । नमरेदैत्यपाशुपतें ॥५२॥

कवच अंगांतजोंवरी । स्त्रीसतीत्वनासेतरी । मृत्युनाहींयससमरी । ऐकतांकालीनसोडितें ॥५३॥

शिवाजवळीयेऊनी । कालीसांगेवर्तमान । लक्ष असुर उरलेजाण । बाकीसर्वभक्षिले ॥५४॥

तेभक्षितांमुखांतून । गेलेतेव्हांचुकवून । ऐकतांहासेंउमारमण । स्वयेंआलायुद्धाशीं ॥५५॥

पाहतांचितेणेंहराशी । नमनकेलेंसाष्टांगेसी । धनुष्यघेऊनवेगेसी । युद्धांउभाठाकला ॥५६॥

शतवर्षेंयुद्धझालें । दोघेंहीहरीन आले । निःशस्त्रदोघेंबैसले । रथींवृषीतटस्थ ॥५७॥

दैत्याचेउरलेशत । तव आलारमाकांत । वृद्धविप्ररुपेंतेथ । आशिषदेतशंखचुडा ॥५८॥

म्हणेंतूंमोठादातार । नाम ऐकिलेबहुदुर । भिक्षादेईमजसत्वर । सत्यकरितांमागेनमी ॥५९॥

दानवेश्वरसंतोषला । देईनम्हणेविप्राला । द्विजमागेकवचाला । दिलेंतेणेंतत्काळ ॥६०॥

कवचघेऊनहरी । रुपतयाचेंस्वीकारी । गेलाशंखचूडाचेंघरी । तुलसीलागीभोगिले ॥६१॥

इकडेजाणूनशंकर । शूल उचलीमहाघोर । योगासनीतेव्हांनृपवर । ध्यानकरीकृष्णाचें ॥६२॥

शिवेप्रेरिलाशूल । भस्मझालादैत्यप्रबळ । दिव्यरुपहोऊनीतत्काळ । विमानारुढजाहला ॥६३॥

गेलासवेगोलोकांशी । नमिलेंश्रीकृष्णराधेशी । आलिंगुनीसुदाम्याशी । राधाबसवीअंकावर ॥६४॥

पुत्रापरीकुरवाळीं । राधादयेनेंतेवेळीं । श्रीकृष्णेंहीप्रेममेळीं । सुदाम्याशिरक्षिले ॥६५॥

रणांगणींत्याच्याअस्थि । तेसर्वशंखहोती । शंखोदकेंबहुप्रीति । शिवावांचूनिसर्वदेवा ॥६६॥

सर्वगेलेस्वस्थानी । इंद्रपावलाराजधानी । तुलसीवृत्तनारदानी । पुशिलेंतेव्हांनारायणा ॥६७॥

सत्यांशीआणिशत । श्लोक असतीभागवत । शंखचूडवधयेथ । केलादेवेशंकरे ॥६८॥

देवीविजयेनवमेसप्तमः ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP