नवम स्कंध - अध्याय पहिला

श्री मत्स्वच्छंदानंदानी रचिलेल्या प्रसिद्ध देवी भागवतसाराचा मराठी अवतार म्हणजे प्रस्तुत ‘ श्री देवी विजय ‘ ग्रंथ होय.


श्रीगणेशायनमः । गजाननाचीजननी । दुर्गानामेंभवानी । आदिमायाविश्वजननी । मूळप्रकृतीनमोस्तु ॥१॥

जेंअरुप अचिंत्य । निष्कलंकब्रम्हसत्य । अखंडशाश्वतनित्य । मूळप्रकृतीनमोस्तु ॥२॥

तेथेंचजीप्रगटली । सच्चिद्रुपेंभासली । आनंदरुपेंभरली । मूळप्रकृतीनमोस्तु ॥३॥

सागरावरीलहरी । ज्वालाजेवीवन्हीवरी । पृथक्भासेतयेपरी । मूळप्रकृतीनमोस्तु ॥४॥

अरुपापरीरुपिणी । अद्वैतापरीसाक्षिणी । अनंतापरीघडमोडणी । मूळप्रकृतीनमोस्तु ॥५॥

पांचरुपेंस्वयेनटली । आकारमयाम्हणविली । नसतांचिमावकेली । मूळप्रकृतीनमोस्तु ॥६॥

भ्रांतिभुलीवासना । स्वयेझालीरुपनाना । चित्रजगगुणभिना । मूळप्रकृतीनमोस्तु ॥७॥

जगजडजालकारी । स्वयेंतयांतसंचारी । प्रकृतीनामेंनिर्धारी । मूळप्रकृतीनमोस्तु ॥८॥

कृतिसर्वकर्तव्यता । प्रकारतेचिप्रविष्टता । प्रकृतीनामयाकरितां । मूळप्रकृतीनमोस्तु॥९॥

प्रम्हणजेसत्वगुण । कृमध्यतोरजोगुण । तीनामेंतमोगुण । मूळप्रकृतीनमोस्तु ॥१०॥

तीचजाहलीपंचमूर्ती । राधालक्ष्मीसरस्वती । सावित्रीभेदेख्याती । मूळप्रकृतीनमोस्तु ॥११॥

दुर्गाप्रथमसंभवली । पुरुषरुपेंअवतरली । स्वस्वरुपींक्रीडली । मूळप्रकृतीनमोस्तु ॥१२॥

गणनामेंभूतगण । पृथ्व्यप्तेजसमीरण । खसहितनिर्मिलागण । मूळप्रकृतीनमोस्तु ॥१३॥

ऐश्यागणाजोवागवी । सत्तास्वयेचिमिखी । ईशरुपेंजोसंभवी । मूळप्रकृतीनमोस्तु ॥१४॥

तोगणेशत्याचीमाता । कृष्णतोचिकषिंता । विष्णुतोचिव्यापिता । मूळप्रकृतीनमोस्तु ॥१५॥

तोचिझालाविधाता । तोचिजगाचाभर्ता । तोचिसर्वाचाहर्ता । मूळप्रकृतीनमोस्तु ॥१६॥

हर्ताहरदुर्गारमण । कृष्णस्वयेंराधारमण । लक्ष्मीकांतविष्णुआपण । मूळप्रकृतीनमोस्तु ॥१७॥

सरस्वतीचाधाता । जोस्वयेंसर्वरचिता । सावित्रीरमेसत्यवंता । मूळप्रकृतीनमोस्तु ॥१८॥

खनामतत्वदुर्गा । रमलीजींसदाभर्गा । हरणकरीसर्वसर्गा । मूळप्रकृतीनमोस्तु ॥१९॥

राधासर्वप्राणशक्ती । लक्ष्मीरुपसर्वकांति । रसरुपासरस्वती । मूळप्रकृतीनमोस्तु ॥२०॥

सावित्रीतीसत्यधरा । एवंकेलाप्रपंचसारा । स्वयेंनिर्गुणातीपरा । मूळप्रकृतीनमोस्तु ॥२१॥

नारदानारायणऋषी । वदलाप्रकृतिरुपासी । पंचधात्यारुपराशी । प्रकृतिपासावजाणिजे ॥२२॥

तीचप्रकृतिसृष्टिकाळी । दक्षिणांगेपुरुषझाली । वामांगेंशक्तीवर्णिली । ब्रम्हरुपातीचती ॥२३॥

अग्नीमाजीदाहका । रवीमाजीभासका । वायुमाजीस्पर्शका । ब्रम्हामाजीतेविही ॥२४॥

एवंतियेशीजाणती । योगीतेव्हांभेदनेणती । पुंस्त्रीभेदनिश्चिती । लटिकाजाणनारदा ॥२५॥

स्वेच्छामयतोश्रीकृष्ण । अभेदतेब्रम्हनिर्वाण । तयाचेंआज्ञेकरुन । पंचधाजाहलीप्रकृती ॥२६॥

अथवाकर्मकरायाभिन्न । रुपेंकेलीपांचभिन्न । अथवातीभक्ताकारण । सेवनार्थभिन्नझाली ॥२७॥

गणेशमाताशिवशक्ती । विष्णुमायातेजोमुर्ती । ब्रम्हरुपाब्रम्हशक्ती । अनंतगुणजियेचे ॥२८॥

सर्वांचेहीअधिष्ठान । सृष्टीचेंमूळकारण । ब्रम्हादिसर्वमुनिगण । पूजनस्तवनकरितांती ॥२९॥

परब्रम्हजोकृष्ण । तयाचेहीअंतःकर्ण । दुर्गारुपऋषेजाण । यशमंगलदेतसे ॥३०॥

सुखमोक्षहर्षदात्री । दुःखशोककष्टहंत्री । शरणांगतपालयित्री । सिद्धेश्वरीदुर्गाही ॥३१॥

बुद्धीनिद्राक्षुधाछाया । तंद्राजातिक्षांतिदया । भ्रांतिशांतिकांतिमाया । तुष्टिपुष्टिलक्षुमी ॥३२॥

एवंसर्वांचेंमुळस्थान । दुर्गादेवीनृपाजाण । दुजेंरुपपद्माआपण । स्वयेंनटलीप्रकृती ॥३३॥

सत्वगुणप्रधान । सर्वसंपत्तीनिधान । सर्वमंगलाचेंकारण । शांतदांतरुपहें ॥३४॥

लोभमोहकामरोष । येथेंअसतीनिःशेष । अहंकारादिविकारास । ठावनसेयारुपीं ॥३५॥

विष्णुचाहीप्राणप्रिया । पतिव्रताधर्ममया । प्राणिमात्रजीवनोपाया । वैकुंठवासामहालक्ष्मी ॥३६॥

तृतीयातीसरस्वती । वाग्देवतास्वयंज्योती । सर्वविद्यारुपवती । वर्णरुपावाणीही ॥३७॥

सर्वविषयांचेंस्फुरण । सर्वकार्यांचेंस्मरण । प्रतिभास्मृतीआपण । कवितामेधाधारणा ॥३८॥

सर्ववेदांचासिद्धांत । सर्वसंशयांचाअंत । सर्वविषयांचाप्रांत । दाखवीजीजनाशी ॥३९॥

हिमचंदनकुंद । इंदुकमलकुमुद । एवंरुपशोभास्पद । वीणापुस्तकधारिणी ॥४०॥

रत्नमाळाघेऊनकरी । कृष्णसेवनाशीकरी । तपः स्वरुपानिर्धारी । तपफलदायिका ॥४१॥

चारीवेदाचिजननी । सावित्रीचौथीमंत्रवाणी । गायत्रीतीचब्रम्हरुपिणी । पवित्ररुपाजाणिजे ॥४२॥

सर्वतीर्थेंजीपावन । जीचास्पर्श इछितींजाण । ब्राम्हणजीचेंवासस्थान । निर्वाणपददेतसे ॥४३॥

सर्वांचीजीप्राणरुपिणी । पांचवीतीकृष्णरमणी । श्रीकृष्णाचेवामजघनी । वसेराधासुधन्या ॥४४॥

निर्गुणाआणिसगुणा । श्रीराधाप्रकृतीजाणा । गोलोकवासनिपुणा । चंद्रभासाईश्वरी ॥४५॥

वाराहकल्पीवृंदावनी । जीझालीकृष्णानुगामिनी । गोपकन्यास्वयेहोवोनी । रमलीगोपाळासह ॥४६॥

जिचेंव्हावेंदर्शन । ब्रम्हाकरीतपगहन । साठसहस्रवर्षेपूर्ण । तरीस्वप्नीनसेची ॥४७॥

एवंजेंदुर्लभदर्शन । तेंवृंदावनींनिधान । समस्तपाहतीजन । अंशरुपराधाती ॥४८॥

एवंहेंशक्तिप्रधान । अंशरुपेंप्रकृतीजाण । तींच अंशांशेकरुन । जगामाजीबहुरुपा ॥४९॥

अंशांशींजेंप्रधान। त्याचेंकरितोंवर्णन । ऐकनृपासावधान । शक्तिव्याख्यापुण्यदा ॥५०॥

विष्णुशरीरापासून । गंगाझालीउत्पन्न । सर्वपापाचेहोयदहन । स्मरणमात्रेंजियेच्या ॥५१॥

गोलोकांतूननिघाली । हरजटेंतप्रवेशली । तेथूनिभारतींआली । चंद्रकांतामनोरमा ॥५२॥

सर्वनदीमाजीश्रेष्ठा । सर्वलोकांसिजीवरिष्ठा । करितांस्नानएकनिष्ठा । निर्वाणपददेतसे ॥५३॥

दुजीजाणनृपातुळसी । अतिप्रियाजीविष्णूशी । वृक्षरुपेंभारताशीं । पापनाशार्थविराजे ॥५४॥

मनसानामेंतीसरी । कश्यपकन्यासुंदरी । शिवशिष्यत्वजीकरी । महाज्ञानविशारदा ॥५५॥

नागस्वसाजरत्कारी । चौथीजाण अंशधारी । आस्तिकमातानिर्धारी । जरत्कारुपत्नीजी ॥५६॥

षष्ठांशप्रकृतीझाली । षष्ठीनामपावली । देवसेनाम्हणविली । स्कंदपत्नीमातृका ॥५७॥

बाळंतिणीचेंगृहांत । जिचेरात्रोपुजनहोत । बाळासिजीरक्षीत । वृद्धरुपापांचवी ॥५८॥

प्रकृतीचेंमुखांतून । साहवीझालीनिर्माण । मंगलवारीजिचेंपूजन । मंगलचंडीनामतीचे ॥५९॥

संतोषदेईवांछित । क्रोधेविश्वसंहारित । सातवीजाणकालीप्रत । चंडमुंडघातिनीजी ॥६०॥

अर्धांशजोदुर्गेचा । गुणेंतेजेंसमसाचा । प्रकाशकोटिसूर्यांचा । सर्वशक्तिप्रधानही ॥६१॥

कृष्णमानसाकृष्णवर्णा । जगत्संहारभीषणा । पुरुषार्थदापरिपूर्णा । चामुंडाभक्तवत्सला ॥६२॥

प्रधानांशजीप्रकृती । धरिधरालोकाप्रती । आठवीहीजाणनिश्चिती । वसुंधराशोभना ॥६३॥

प्रकृतीचेकलावतार । पतिसत्याचाविस्तर । सांगतोऐकप्रेमभर । शक्तिव्याख्यानारदा ॥६४॥

स्वाहापत्नीअग्नीची । दक्षिणाजाणयज्ञाची । कर्मव्यर्थदीक्षेविण ॥६५॥

स्वधादेवीपितरांची । स्वतीदेवीवायूची । पुष्टीतीगणपतीची । अनंताचितुष्टिका ॥६६॥

ईशानपत्नीसंपत्ती । कपिलाचिमहाधृती । सत्याचिपत्नीसती । मोहपत्नीदयाजी ॥६७॥

प्रतिष्ठाजाणपुण्याची । कीर्तीजाणसुकर्माची । क्रियापत्नीउद्योगाची । विधिहीनजियेविण ॥६८॥

असत्याअधर्मकामिनी । धूर्तसेवितीतिजलागुनी । अदृश्यातीभामिनी । सत्ययुगींहोतसे ॥६९॥

त्रेतायुगींसूक्ष्मरुपा । द्वापरींतीअर्धरुपा । कलीमाजीपूर्णरुपा । घरोघरीप्रत्यक्ष ॥७०॥

लज्जाआणिशांती । सुशीलासीदोन असती । ज्ञानभार्यातीनहोती । धृतिबुद्धीआणिमेधा ॥७१॥

मूर्तींनामेंधर्माची । निद्राकालाग्निरुद्राची । दिवारात्रिसंधिकालाची । लोभाजाणक्षुधातृषा ॥७२॥

प्रभादाहिकातेजासी । दोनस्त्रियाप्रज्वारासी । कालकन्यात्याप्रेयसी । मृत्युजराजाणिजे ॥७३॥

तंद्राआणिप्रीति । दोनभार्यासुखाप्रती । श्रद्धाआणिभक्ती । वैराग्याच्याह्यादोन ॥७४॥

सुरभिकद्रूदनूदिती । विनताआणिअदिति । सृष्ट्यर्थझालीप्रकृती । कलांशेंजाणनारदा ॥७५॥

चंद्रपत्नीरोहिणी । संज्ञातीसूर्यकामिनी । शतरुपामनुभामिनी । शचीशक्तीपुरंदरा ॥७६॥

तारापत्नीवाचस्पती । वसिष्ठाचीअरुंधती । अहल्यागौतमसती । अनुसूयाअत्रीस ॥७७॥

कर्दमाचीदेवहूती । दक्षाचीतीप्रसूती । पितृकन्यामेनकावती । हिमाचलाचीतीभार्या ॥७८॥

लोपामुद्राअगस्त्याची । कुंतीजाणकुबेराची । वरुणानीवरुणाची । विंध्यावलीबलिभार्या ॥७९॥

कांतायशोदादमयंती । गांधारीद्रौपदीकुंती । शैब्यादेवकीसत्यवती । वृषभानुस्त्रीकलांश ॥८०॥

मंदोदरीरावणाची । कौसल्यादशरथाची । सुभद्रातीअर्जुनाची । रेवतीजाणबलभद्रा ॥८१॥

अष्टनाइकाकृष्णस्त्रिया । शंतनूचीसतीभार्या । उषारेखादोनीजाया । अनिरुद्धाच्याकलांशें ॥८२॥

प्रभावतीभानुमती । रेणुकाआणिमायावती । रोहिणीनंदाभगवती । प्रकृतीचेअंशरुप ॥८३॥

आणीकहीअनंत । प्रकृतीअंशविख्यात । स्त्रीरुपसर्वनिश्चित । प्रकृतीचेजाणिजे ॥८४॥

उत्तममध्यम अधम । गुणभेदेंप्रकृतीक्रम । सृष्ट्यर्थसर्वसंभ्रम । स्त्रीपुभेदनिर्मिला ॥८५॥

सुरथेंप्रथमपूजिली । रामचंद्रेंआराधिली । तिहीलोकीपूजिली । मूळप्रकृतीपरांबा ॥८६॥

दक्षकन्यातीप्रकृती । दग्धहोऊनिमागुती । जन्मकेलाहिमवती । पशुपतीपतीकेला ॥८७॥

कृष्णगणेशजाहला । स्कंदविष्णुअवतरला । दुर्गानामेंपार्वतीला । प्रकृतीजाणनिश्चयें ॥८८॥

लक्ष्मीशीमंगलनृपती । सावित्रीशीअश्वपती । ब्रम्हदेवेसरस्वती । राधापूजिलीश्रीकृष्णें ॥८९॥

सुयज्ञेंधरणीवरी । पूर्वींपूजिलिईश्वरी । ग्रामदेवतादिसर्वातरी । प्रकृतिएकभासतसे ॥९०॥

हेंप्रकृतीचेंअवतरण । कथिलेपुण्यकारण । करितांश्रवणपठण । वांछितार्थसाधतसे ॥९१॥

एकशेंसाडेअठ्ठावन । भागवतपद्येंशोभन । भाषारुपेंकेलेंकथन । परांबेचेकृपेंनें ॥९२॥

श्रीदेवीविजयेनवमेप्रथमः ॥१॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP