TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

सुश्रुत संहिता - दंतगतरोग

सुश्रुतसंहिता केवळ शल्यकर्म अशी अनेकांची समजूत आहे , परंतु आयुर्वेदाचे तत्वज्ञान , त्याचा व्यवहारात उपयोग कसा करावा याचेही ज्ञान सुश्रुताने जगाला दिले .


दंतगतरोग

दातांचे रोग -दालन , कृमिदंतक , दंतहर्ष , भंजनक , शर्करा , कपालिका , श्यावंदतक व हनुक्षोभ असे दातांच्या ठिकाणी होणारे हे आठ रोग आहेत .

दांत फुटतात व अतिशय दुखतात ह्या वातजन्यव्याधीला ‘‘दालन ’’ असे म्हणतात .

दांत काळा होतो , त्याला भोक पडते , तो हालतो , त्याच्या योगाने लाळ गळते , दांताला सूज असते व फार ठणका असतो , वातदोषाने कारणावाचूनही दुखतो , त्याला ‘‘कृमिदन्त ’’ असे म्हणतात .

दातांना शीत , उष्ण किंवा स्पर्श कळत नाही , ह्या वातजन्यव्याधीला ‘‘दंतहर्ष ’’ म्हणतात .

ज्या दंतरोगाने तोंड वाकडे होते , दात फुटतात व तीव्र वेदना होतात , त्या कफवातजन्यव्याधीला ‘‘भंजनक ’’ असे म्हणतात .

ज्याच्या दातांवर मळ अगदी पातळ खापरीप्रमाणे कठीण होऊन बसतो , त्याला ‘‘दंतशर्करा ’’ असे म्हणतात . हिच्या योगाने दातांचे शुभ्रपणा वगैरे गुण नष्ट होतात . वरील शर्करेसह जेव्हा दाताची त्वचा निघते तेव्हा तिला ‘‘कपालिका ’’ म्हणतात . ही दातांचा नाश करिते .

रक्तमिश्रित पित्तदोषाने सर्व दांत विस्तवाने भाजल्यासारखा काळा पडतो , किंवा निळा होतो त्याला ‘‘श्यावदंत ’’ असे म्हणतात .

कठीण पदार्थ चावणे , मोठ्याने पुष्कळ बोलणे वगैरे कारणांनी वात प्रकुपित होऊन हनुवटीचा सांधा हालतो , ह्या विकाराला ‘‘हनुमोक्ष ’’ असे म्हणतात . ह्यांत अर्दितवाताची लक्षणे असतात॥२७ -३५॥

वातादि तीन दोषांनी तीन कंटक रोग , अलास व उपजिव्हक असे पाच जिव्हा रोग आहेत .

वातदोषाने जीभ फुटते तिला स्पर्श कळत नाही व ती सागाच्या झाडाच्या पानासारखी खरखरीत होते .

पित्तदोषाने जीभ पिवळी होते तिचा दाह होतो . आणि ती आरक्तवर्ण काट्यानी व्याप्त होते .

कफदोषाने जीभ जड व जाड होते आणि तिजवर शेवरीच्या काट्यासारखे मांसाचे अंगुर येतात .

जिभेच्या खाली मोठी सूज येते तिला ‘‘अलास ’’ असे म्हणतात . हा कफरक्तदोषाने होतो . हा फार वाढला तर जीभ ताठवितो . आणि ह्याच्या योगाने मुळाच्या ठिकाणी जीभ पिकते .

जिभेला वर करून म्हणजे जिभेच्या खाली जिभेच्या शेंड्याप्रमाणे कफरक्तपासून एक प्रकारची सूज येते . तिजमुळे लाळ गळते . आणि कंडु व दाह ही लक्षणे होतात . ह्या व्याधीला उपजिव्ह असे म्हणतात .

टाळ्य़ाचे रोग - गलशुंडिका , तुंडिकेरी , अध्रुव , मांसकच्छप , अर्बद , माससंघात , तालुपुप्पट , तालुशोष व तालुपाक असे हे नऊ तालुरोग आहेत॥३६ -३९॥

टाळ्य़ाच्या मुळाशी कफरक्ताच्या प्रकोपाने वायूने भरलेल्या भात्याप्रमाणे लांबट अशी मोठी सूज येते . तिजमुळे तहान , खोकला , श्वास हे विकार होतात . हा ‘‘कंठशुंडो ’’ नावाचा एक रोग आहे असे वैद्य म्हणतात (लोक ह्याला पडजीभ आली म्हणतात .)

वर सांगितलेल्या कफरक्तदोषाने टाळ्य़ात कापशीच्या बोंडाच्या आकाराची मोठी सूज येते . तिजमुळे टोचणी व दाह हे विकार असून ती पिकणारी असते , तिला ‘‘तुंडिकेरी ’’ असे म्हणतात .

रक्तदोषाने टाळ्य़ामध्ये लाल व कठीण अशी सूज येते , तिजमुळे वेदना व ज्वर हे विकार होतात . ह्या विकाराला ‘‘अधु्रव ’’ असे म्हणतात .

टाळ्य़ात कासवाच्या पाठीच्या आकाराची वेदनारहित व जलद उत्पन्न होणारी अशी केवळ कफदोषाने एक प्रकारची सूज येते तिला लालीही नसते . ह्या विकाराला

‘‘ कच्छप ’’ असे म्हणतात .

टाळ्य़ाच्या मध्यभागी कमळातील गुच्छासारखी सूज येते तिला ‘‘अर्बुद ’’ असे म्हणतात . हे रक्तदोषाने होते व मागे अर्बुदाची जी लक्षणे सांगितली ती ह्यामध्येही असतात .

टाळ्य़ाच्या आतील मास कफाने एकत्र होऊन वर उचलते त्याला वेदना नसतात . ह्याला ‘‘मांससंघात ’’ असे म्हणतात .

वेदनारहित , स्थीर (कठीण ) अशी एक बोराएवढी गाठ कफमेदापासून उत्पन्न होते तिला ‘‘पुप्पुट ’’ असे म्हणतात .

पित्त व वातप्रकोपाने टाळा कोरडा पडून त्याला भेगा पडतात व श्वास लागतो . ह्या विकाराला ‘‘तालुशोष ’’ असे म्हणतात .

पित्तदोषाने टाळा भयंकर पिकतो त्याला ‘‘तालुपाक ’’ असे म्हणतात॥४० -४५॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2015-06-24T13:48:40.1530000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

radioactivate

  • (to make radioactie) किरणोत्सारी करणे 
  • किरणोत्सारी करणे 
RANDOM WORD

Did you know?

मकर संक्रांति हिंदू सण असूनही १४ जानेवारीला का साजरा करतात?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site