सुश्रुत संहिता - श्लीपदनिदान

सुश्रुतसंहिता केवळ शल्यकर्म अशी अनेकांची समजूत आहे , परंतु आयुर्वेदाचे तत्वज्ञान , त्याचा व्यवहारात उपयोग कसा करावा याचेही ज्ञान सुश्रुताने जगाला दिले .


आता ‘‘वृद्धि , उपदेश व श्लीपदनिदान ’’ नावाचा अध्याय सांगतो . जसे भगवान् धन्वंतरीनी सांगितले आहे ॥१ -२॥

वात , पित्त , कफ , रक्त , मेद , मूत्र व अंत्रजन्य अशा कारणांनी सात प्रकारचा वृद्धिरोग अंडवृद्धि किंवा अंत्रवृद्धि आहे . त्यांना कारणीभूत मूत्र व अंत्र (आतडे ) ही दोन आहेत . तथापि वायूपासूनही वाढतात . किंवा केवळ मूत्रसंचयाने मूत्रजन्यअंडवृद्धिरोग होतो व अतिशय ओझी वाहण्यानेही अंत्रवृद्धिरोग होतो . संप्रप्ति -अधोभागी (नाभीच्या खाली ) प्रकुपित झालेला वातादि कोणताहि एक दोष फलकोशवाही घमनीमध्ये शिरून दोन्हीही फलकोशांची वृद्धि करितो तिला वृद्धि असे म्हणतात . त्याचे पूर्वरूप -ह्या वृद्धि होण्यापूर्वी बस्ति , कंबर , अंड व शिस्न ह्या ठिकाणी वेदना होतात . वायूचा अवरोध होतो . आणि वृषणाना सूज येते ॥३ -५॥

६ ) घातपरिपूर्णवृद्धि वार्‍याने फुगलेल्या बस्तीप्रमाणे (भात्याप्रमाणे ) फुगतो व खरखरीत व वायुतमुळे कारणावाचून दुखणारा असा असतो . ह्या वृद्धीला वातजन्य ‘‘अंडवृद्धि ’’ असे म्हणतात . जी वृद्धि पिकलेल्या उंबराप्रमाणे तांबुस रंगाची , ज्वर , दाहयुक्त असून स्पर्शाला उष्ण व त्वरित उत्पन्न होऊन त्वरित पिकणारी असते ती पित्तजन्य असते . तिला पितजन्यअंडवृद्धि म्हणतात .

जी वृद्धि कठीण , किंचित वेदनायुक्त , स्पर्शाला थड व कंडुयुक्त असते तिला कफजन्य अंडवृद्धि म्हणतात .

रक्तजन्य अंडवृद्धि काळ्या पुटकुळ्यांनी व्याप्त असून पित्तजन्यवृद्धिच्या लक्षणांनी युक्त असते .

मृदु , स्निग्ध , कंडुयुक्त , किंचित् वेदनायुक्त व ताडाच्या फळाप्रमाणे दिसते तिला मेदोजन्य अंडवृद्धी म्हणतात .

जो नेहमी लघवीचा अवरोध करितो त्याला मूत्रजन्य अंडवृद्धी होते . ती चालताना पाण्याने भरलेल्या पाखालीप्रमाणे हालते . आणि मूत्रकृच्छ् वृषणामध्ये वेदना व अंडाला सूज हे विकार उत्पन्न होतात . हिला मूत्रजन्य अंडवृद्धी म्हणतात .

ओझे वाहणे , बलवानाशी कुस्ती करणे , झाडावरून पडणे , वगैरे विशेष प्रकारचे श्रम फार झाल्याने अतिशय वाढलेला वायु क्षुब्ध होऊन लहान आतड्याच्या एखाद्या भागात शिरून विगुण होऊन त्या आतड्यासह खाली सरून वंक्षणसंधीत जाऊन गाठीच्या रूपाने राहतो . त्यावर उपचार केला नाही तर काही कालाने फलकोशात शिरून वृषणाची वृद्धी करितो . त्यामुळे तो वृषण पूर्ण असता बस्तिप्रमाणे (भात्याप्रमाणे ) मोठे व लांबट होते . आणि ते वृषण दाबले असता तो वायु शब्द करीत वर जातो . आणि सोडले असता पुनः फुगते . हिला अंत्रवृद्धी म्हणतात व ही असाध्य आहे असेही म्हणतात .

अति मैथुनाने किंवा अति कटाक्षाने ब्रह्मचर्य राखल्याने तसेच अतिशय ब्रह्मचर्य राखून राहिलेली स्त्री , जिच्याशी फार दिवस समागम होत नाही अशी स्त्री , रजस्वाला , लांब किंवा राठ केसाची स्त्री , अतिशय दाट केसांची , जिच्या अंतर्गत रोम आहेत अशी , अति संकुचित किंवा अति विस्तृत द्वार असलेली अप्रिय निष्काम अपवित्र पाण्याने प्रक्षालन केलेली , अप्रक्षालित योनी , योनिरोगयुक्त , स्वाभाविकच दूषित योनीची व योनिविरहित अशा स्त्रियांशी अति समागम केल्याने , तसेच नखे , दात विष व शुक्र ह्यांच्या घर्षणाने , घट्ट बांधल्याने , हाताच्या ताडणाने , चतुष्पादि स्त्रीजातीशी समागम झाल्याने , अपवित्र पाण्याने धुतल्याने , दाबस्थाने शुक्र व मूत्र ह्यांचे वेग धारण केल्याने आणि मैथुनानंरत इंद्रियप्रक्षालन न केल्याने , प्रकुपित झालेले दोष लिंगाच्या ठिकाणी येऊन जखम असो किंवा नसो त्याठिकाणी सूज उत्पन्न करितात . त्याला उपदंश असे म्हणतात . हा वातादि पृथक् तीन दोषांनी तीन प्रकारचा , चौथा सन्निपातज व पाचवा रक्तजन्य असा पाच प्रकारचा आहे .

त्यापैकी वातजन्य उपदंशात खरखरीतपणा , त्वचेला चिरा पडणे , इंद्रिय ताठणे , खरखरीत अशी सूज येणे आणि वातासंबंधी अनेक वेदना ही लक्षणे होतात .

पित्तजन्य उपदंशात ज्वर , पिकलेल्या उंबराप्रमाणे तांबूस सूज , तीव्र दाह , लवकर पिकणे व पित्तजन्य वेदना ही लक्षणे होतात . कफजन्य उपदंशांत कंडुयुक्त व कठीण अशी सूज , स्निग्धपणा व कफजन्य वेदना ही लक्षणे होतात .

रक्तजन्यउपदंशात इंद्रियांवर काळे फोड येणे व त्यातून रक्त फार वाहणे , पित्तजन्य उपदंशाची लक्षणे , अतिशय ज्वर , दाह व शोष ही लक्षणे असतात . हा कदाचित (फार प्रयासाने ) याप्य होतो . (सतत औषधाने बरा असतो .)

सन्निपतिकउपदंशात सर्व दोषांची लक्षणे असून इंद्रिय विदीर्ण होते . त्यात मृमी उत्पन्न होऊन मरणही येते .

प्रकुपित झालेले वातादिदोष (वात , पित्त व कफदोष ) वंक्षणसंधि , मांड्या , गुडघे व पिंढर्‍या ह्या ठिकाणी राहून कालांतराने पायाचा आश्रय करून हळु हळु एक प्रकारची सूज उत्पन्न करितात . त्याला ‘‘श्लीपद ’’ असे म्हणतात . ते वातजन्य , पित्तजन्य व कफजन्य असे तीन प्रकारचे आहे .

त्यापैकी वातजन्य श्लीपद खरखरीत काळसर , कठीण व कारणावाचून दुखणारे असून हे बहुतकरून फुटते . पित्तजन्य श्लीषद पिवळट , किंचित् मऊ असून ज्वर व दाह ह्यांनी युक्त असते .

कफजन्य विसर्प श्वेतवर्ण , स्निग्ध , किंचित् वेदनायुक्त , जडत्वयुक्त , मोठाल्या गाठींनी युक्त व काट्यांसारख्या अंकुरांनी युक्त असते .

त्यापैकी ज्याला एक वर्ष होऊन गेले आहे , जे अतिशय मोठे होऊन त्यावर वारुळाप्रमाणे छिद्र पडली आहेत व जे फार पसरले आहे ते अशी श्लीपदे असाध्य म्हणून वर्ज करावी॥७ -९॥

जडत्व व मोठेपणा ही ज्याअर्थी कफावाचून असत नाहीत त्याअर्थी ही तीनही श्लीषदे कफदोषाच्या अधिक्याने होतात .

ज्या देशात फार दिवसांच्या संचित पाण्याचे जलाशय असतात व सर्वऋतूत ज्या ठिकाणची हवा थंड असते अशा देशात (अनुपदेशात ) विशेषतः हा श्लीषदाच्या रोग होतो .

हा श्लीषदरोग पायाप्रमाणे हाताला देखील होतो . कित्येक वैद्य असे म्हणतात की , हा कान , डोळे , नाक व ओठ ह्या ठिकाणी देखील होतो ॥१३ -१५॥

N/A

References : N/A
Last Updated : June 24, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP