-
अ.क्रि. १ ( सूर्य , अग्नि , ज्वर इ० कांच्या योगाने ) पर्वत , शरीर इ० तप्त होणे . २ ( ल . ) ( काम , क्रोध इ० विकारांनी ) क्षुब्ध , संतप्त , उद्दीपित होणे ; संतापणे ; रागावणे . ३ ( ल . ) ( दुःख , शोक इ० कानी ) तळमळणे ; व्याकूळ ; घाबरे होणे ; पोळणे ; अनुदिनि अनुतापे तापलो रामराया । - रामदास - करुणाष्टक १ . ( नवनीत पृ . १७० ). करुं वरि कृपा हरुं व्यसन दीन हा तापला । - केका ९ . ४ ( विषयवासना , तृष्णा ) चेतणे ; उद्दीपित , प्रब्ध होणे ; विकोपास जाणे . ५ ( व . ) शेकणे . [ ताप ] ( वाप्र . ) गळा तापणे - काही वेळ गायन केल्याने कंठांतून बराच मोठा स्वर निघावा अशी दशा होणे . तापल्या तव्यावर ( पोळी ) भाजून घेणे - एखाद्या कार्यात दुसरे कार्य सहजासहजी होण्यासारखे असल्यास अवश्य करुन घेणे ; वाहत्या गंगेत हात धुणे . तापल्या पाठीने - क्रिवि . अंगांत उमेद , जोम , ताकद आहे तोपर्यंत . म्ह० तापल्या पाण्याला चव नसते . मैत्रीचा एकदां भंग झाला तर ती पुन्हा पूर्ववत सुखकारक होत नाही .
-
क्रि. गरम होणे ;
-
verb उष्णता मिळाली असता गरम होणे
Ex. उन्हाळयात रेताड जमीन खूप तापते.
-
क्रि. उद्दीप्त होणे , रागावणे , संतापणे , क्षुब्ध होणे .
Site Search
Input language: