संतजन रुपासी मिळले म्हणुन लागला चटका । आत्मसाधन मोक्ष झाला गुरुनें पाजला घुटका ॥धृ०॥
तुकारामाला ब्रह्म दिसलें बसला काळासी फटका । ब्रह्म साधून परब्रह्म झालों नको वाद हा लटका ।
ज्ञानदेव वरती सोपानदेव म्हणे हीच घटका । ईश्वररुपीं जाऊन मिळालों तुटला जन्म खटका ॥
चाल ॥
मुक्ताबाई एक आत्मज्ञानी । सर्वांघटी ब्रह्म जाण्नी । चांगदेव आले भेटीकारणें ॥
निर्जिव भिंत चालविली त्यांनी । चांगदेवाचा पण हरोनी । सत्वर जाऊन लागे चरणी ॥
रेड्यामुखी वेद उच्चारिले नाक लावू पोकळ फटका ॥१॥
जनार्दन एकनाथ आत्मज्ञानी भजती हरीहर कां । हरीने पैठणी पाणी वाहिलें दुष्टांस लागला चरका ॥
स्वर्गीचे पितर आणिले भोजनास ब्राह्मण मारी गरका । द्वैत भाव ज्यांनी कल्प ठेविला शेवटी जाती नरका ॥
चाल ॥
रोहिदास जातीचा चांभार । नरहरी जातीचा सोनार । रुपास मिळाला मोमीन कबीर ॥
बोधल्याचे शुद्ध अंतर । थोट्या ताटा आले कणस भरपूर । सांवतामाळ्याने हृदयी सांठविला हरी प्रेमाचा कुटका ॥२॥
दामाजीचे संकट वारिलें अंतरभाव पाहून । जनीसंगे दळूं लागला स्वतां गाणे गाऊन ।
चोख्यांसंगे ढोरें ओढीतो हरी आंगे जाऊन । नामदेव कीर्तनी नाचतो नित्य भेट देऊन ।
चाल ।
कल्याण दास एक आत्मज्ञानी । विड्यासहित शीर दिलें कापुनी । तसी श्रियाळासी आयका करणी ॥
चिलयां बाळा आपल्या हस्तें मारुनी । भोजन घातलें चांगुणीनें । नाही केली सत्त्वासी हानी ॥
अढळपदास ध्रुव बसला सहा आठाचा मोडला खटका ॥३॥
वस्ताद भीमराज म्हणे बीन दीपकाविना प्रकाश दिसला । अचल अढळ अविनाश परब्रह्म दशवे द्वारी बसला ॥
पांचव्या वेदामधीं सहाव्यातची सातवे दर्शनी ठसला । जुना गांव माझा मशीं मिळाळा तुटे प्रपंच भासला ॥
चाल ॥
मिळालें पाण्यासी पाणी । माझा मीच झालों निरंजनी । शून्या निरसून अशीच करणी ।
संत गेले रुपासी मिळुनी । टीका समजावें गुरुपासुनी । जो निंदा तो पाखंड वदनीं ॥
सावतळराजा प्रसन्न कवि गणपति म्हणे गुरुपदीं षटका । आत्मसाधन मोक्ष मिळालें गुरुनें पाजिला घुटका ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : March 27, 2024

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP