भक्तिगीते - तुझे अढळपण राहिल कां रे ?

गो.रं.आंबेकरांचा जन्म कर्नाटकातील कुनगोळ गावचा.


N/Aघडविलेस तू सकल चराचर ।
तव हातीं उत्पत्ति-स्थिति-लय
विश्वमंदिरीं, मानव मूर्ती ।
शिल्प, चमत्कृति, तुझी शुभंकर ॥
मानवप्रज्ञा ज्ञान प्रबोधन ।
चित्त शक्तीचें करी प्रदर्शन ।
अणुरेणूसी, भंग करोनी ।
सेवाभावीं लावित नमवुन ।
शल्यचिकित्सा, हस्तलाघवीं ।
याच जीवनीं, शतायु केले ।
चंद्र-मंगळावरी पद ठेवून ।
सप्त ग्रह, प्रांगणीं वेधिले ।
पंचमहाभूतासि खेळवीं ।
बुध्दिवैभवें, अन् श्वेच्छेनें ।
जगत नियन्त्या, तवस्थानावर ।
हेच आक्रमण, आव्हानानें ।
मानव धावे, विराट वेगें ।
पादाक्रांन्त करायां त्रिभुवनि ।
पुढील शतकीं, तुझे अढळपण ।
राहिल कां रे, आता भुवनीं ?

N/A

References : N/A
Last Updated : February 10, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP