प्राणवहस्त्रोतस् - राजयक्ष्मा

धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरूषार्थांच्या प्राप्तीकरितां आरोग्य हे अत्यंत आवश्यक असते.


शारीर
राजयक्ष्मा हा विकार सर्व शरीरांत व्यापून असलेल्या रसवह स्त्रोतस् व कफप्रधान अवयवांत असतो, तरी श्वास, कास, उरक्षत, पीनस, हीं लक्षणें त्यांत प्राधान्यानें असल्यामुळें प्राणवहस्त्रोतस् हेंच त्याचें महत्त्वाचें अधिष्ठान असतें. इतर अवयवांतहि त्याची उत्पत्ति होत नाहीं असें नाहीं. शरीरांतील सर्व धातु व सर्व अवयव उण्या अधिक प्रमाणांत या विकारास बळी पडून विकृति पावतात.

व्याख्या
संशोषणाद्रसादीनां शोष इत्यभिधीयते ।
क्रियाक्षयकर्त्वाच्च क्षय इत्युच्यते पुन: ॥
राज्ञश्चन्द्रमसो यस्मादभूदेष किलामय: ।
तस्मात्तं राजयक्ष्मेति केचिदाहु: पुनर्जना: ॥
इदानीमस्य व्याधेर्थथा शोषक्षयराजयक्ष्मेति नामानि तथाऽऽ
ह-संशोषणाद्रसादीनांमित्यादि । क्रिया चिकित्सा, कायवाड्वानसं
वा कर्म, तस्य भयकरत्वात् । राज इति `द्विजानां' इति शेष: ।
चन्द्रमस: चन्द्रस्य, आमयो यक्ष्मा रोग:, किचिदिति आत्रेयप्रभृतय:;
यस्मादेष आमयो द्विजानां राज्ञश्चन्द्रमसश्चन्द्रस्याभूत्तस्मात्
तं रोगं केचित् पुनर्जना ब्रुवते; यतोऽयं यक्ष्मा रोगो रोगाणां राजा
अतो राजयक्ष्मेति वाग्भटो व्याख्यानयति । किलेति वार्तायाम् ।
एवं खलु यथा श्रूयते - पूर्वं दक्षनामा प्रजापतिभूत्, तस्य बह्वयो
दुहितरो बहूव:, तेन च सप्ताधिका विंशति: कन्यकाश्चन्द्राय
विवोढे दत्ता:, स चन्द्रमास्तासु मध्ये रोहिण्यामेवानुरक्तो
बभूव, ततश्च सशोकाभिरश्विन्यादिभिर्दुहितृभिरात्मपितरि
दक्षसंज्ञके चन्द्रस्य रोहिण्यामासक्तिवृत्तान्तो निवेदित:, ततो
दुहितृणां वार्तामाकर्ण्य, चन्द्रमाहूय, सर्वास्वपि निजपुत्रीषु
समतया वर्तनाय चन्द्रोऽभिहित:, स च तथेति स्वीकृत्यापि
स्वगुरोर्वचनमनादृत्य न तासु समवर्तत, ततो दक्षप्रजापते:
क्रोधो निश्वासरुपेण मूर्तिमान् भूत्वानि:सृत्य यक्ष्मरुपेण
रोहिण्यामतिप्रसड्गेनाविलं चन्द्रमाविशत्, ततोऽसौ तेन
रोगेणाभिभूत: सन् गतप्रभो गतोत्साहश्च संजात:, गुरुवच-
नातिक्रमेण दोषं मत्वा तमेव दक्षमात्मानं गुरुं शरणं गतवान्,
ततोऽनन्तरं देववैद्याभ्यामश्विभ्यां स चिकित्सित:, तत:
प्राप्तबल्श्चन्द्रो (रराजातीवसुप्रभ:) लघ्वगुरुप्रसादोऽश्वभ्यां
चिकित्सितोऽभूत ।
एवं च सति कर्मदोषजो व्याधिरिति दर्शितम् ।
सु.उ.४१-४, ५ सटीक; पान ७११

यच्च राजा च यक्ष्मा च राजयक्ष्मा ततो मत: ।
देहौषधक्षयकृते: क्षयस्तत्सम्भवाच्च स: ।
वा.नि. ५-२, ३; पान ४७६

यच्च - यस्माच्च, राजा च यक्ष्मा च - राजा च रोगाणां मध्ये
अनेक्रोगानीकपरिवृतत्वेन यक्ष्मा च, ततो राजा चासौ
यक्ष्मा च राजयक्ष्माऽभिमतो मुनीनामिति शेष: ।
तथा देहश्चौषधं च, तयो: क्षय:, तस्य कृति:- करणं, ततो
देहौषधक्षयकृते: क्षय इत्युच्यते ।
अनेन चास्य व्याधेर्बहुकालस्थायित्वं द्योतयति ।
किलायं व्याधिर्बहुतरं कालमवतिष्ठते न च शान्तिं गच्छति ।
यावद्देह: क्षीयते, औषधान्यपि क्षीयन्ते, न पुनरयं व्याधि:
इति देहौषधक्षयकृते: क्षय इत्युच्यते ।
तस्मम्भवाच्च स: । तदित्यनेने देहौषधक्षय: प्रत्यवमृश्यते ।
स सम्भवो - जन्म, यस्यासौ तत्सम्भव:, तस्मादपि क्षय इत्युच्यते ।
वा.नि. ५-२, ३ स. टीका, पान ४७७

राजयक्ष्म्याला शोष, क्षय, राजयक्ष्मा, यक्ष्मा अशी नांवें आहेत. त्यास रोगराज असेंहि म्हणतात. रसादि धातूंचा शोष होतो म्हणून त्यास शोष असें म्हणतात. शरीराचा वा कायिक, वाचिक, मानसिक क्रियांचा वा चिकित्सेचा वा औषधांचा या रोगामध्यें क्षयच होत असतो म्हणून यांस क्षय असें म्हणतात. नक्षत्रांचा राजा जो चंद्र त्याला पूर्वी हा रोग झाला होता म्हणून त्यास राजयक्ष्मा म्हणतात असेंहि एक मत आहे. वाग्भटानें व वाग्भटाच्या टीकाकारानें हा सर्व रोगांचा राजा आहे म्हणून यास राजयक्ष्मा म्हणतात असा राजयक्ष्मा शब्दाचा अर्थ सांगितला आहे तो अन्वर्थक व प्रत्यक्षगम्य आहे. टीकाकारानें उल्लेखिलेले चंद्राविषयीचे पौराणिक कथानक, चिंता, संतापादि मानसिक कारणें व अतिव्यवायादि शारीरिक कारणें हीं या रोगाच्या उत्पत्तीस विशेषेंकरुन कारणीभूत होतात असें दर्शवितें. चंद्राच्या प्रकरणांत घडलेला हा व्याधिसंभव विशिष्ट नामरुपानें प्रथम निश्चित केला गेला असेंहि म्हणतां येईल. अनेक विकारांचा समूह या रुपानें असतो म्हणूनहि त्यास राजयक्ष्मा असें म्हणतात.

स्वभाव
अनेकरोगानुगतो बहुरोगपुरोगम: ।
दुर्विज्ञेयो दुर्निवार: शोषो व्याधिर्महाबल: ॥
सु.उ. ४१-३, पान ७११

राजयक्ष्म्याच्या आधीं अनेक रोग उत्पन्न होतात. याचीं पूर्वरुपें स्वतंत्र रोगांच्या स्वरुपाचींच असतात आणि राजयक्ष्म्याला उपद्रवहि अनेक प्रकारचे आहेत. राजयक्ष्म्याचें स्वरुप संपूर्णपणें वेळीच जाणणें आणि या व्याधीचें निवारण करणें अत्यंत कठिण जातें. व्याधि बलवान, बहुधा चिरकारी आणि घातक असा आहे.

मार्ग
मध्यम

प्रकार-
वेगरोधात् क्षयाच्चैव साहसाद्विषमाशनात् ।
त्रिदोषो जायते यक्ष्मा गदो हेतुचतुष्टयात् ॥
मा.नि. राजयक्ष्मा - १, पान १२३

विषमाशनज, वेगावरोधज, साहसच, क्षयज, असें कारणानुरुप केलेले राजयक्ष्म्याचे चार प्रकार आहेत. तसेच राजयक्ष्म्याच्या स्वरुपावरुन लक्षणांच्या न्यूनाधिकतेचा विचार करुन अवस्थाभेदानें त्रिरुप, षड्‍रुप व एकादशरुप असें या व्याधीचे तीन प्रकार केले आहेत. अनुलोम व प्रतिलोम असे दोन प्रकार उत्पत्ति भेदानें मानता येतील.
(सु.उ. ४१-९)

हेतू

विषमाशन:
यदा पुरुष: पानाशनभक्ष्यलेह्योपयोगान् प्रकृतिकरणसंयोग-
राशिदेशकालोपयोगसंस्थोपशयविषमानासेवेति, तदा तस्य
तेभ्यो वातपित्तश्लेष्माणो वैषम्यमापद्यन्ते ।
च.नि. ६-१२, पान ४६८

अत्र च `उपशय' शब्देन, उपयोक्ता यो रसविमाने वक्तव्य:, स एव गृह्यते ।
यत: तत्रोक्तम् ``उपयोक्ता पुनर्यस्तमाहारमाहरति, यदायत्तमोकसात्म्यम्-''
(वि.अ.-१) इति) ।
अनेन हि तत्रोपयोक्तृपरीक्षया सात्म्यमेव परीक्ष्यत इत्युक्तम् ।
च.नि. ६-१३ टीका, पान ४६९

आहारा संबंधीचे आठ विधि विशेष सांगितले आहेत. ज्यावेळीं हे नियम मोडले जातात त्यावेळीं विषमाशन या नांवानें, उल्लेखिलेलें कारण घडतें;
बहुस्तोकमकाले वा ज्ञेयं तत् विषमाशनम् ।
(मा.नि. राजयक्ष्मा १ आ. टीका पृ. १२४)

विषमाशनाचें स्वरुप थोडक्यामध्यें सांगावयाचें म्हणजे असें - कधीं अगदीं थोडें, कधीं पुष्कळ प्रमाणांत, कधीं लघु, कधीं गुरु, कधीं लंघन, कधीं अध्यशन या पद्धतीनें जेवणें व जेवणाच्या वेळेसंबंधीं एक निश्चित नियम नसणें - या प्रकाराला विषमाशन असें म्हणतात. यासंबंधीचें वर्णन निदानपंचक विभागांत बाह्यनिदान प्रकरणीं पहावें. या विषमाशनानें आम उत्पन्न होऊन स्त्रोतोरोध होतो व शरीर क्रमानें दुर्बल होत जातें कारण धातुपोषण होत नाहीं.

वेगावरोध
यदा पुरुषो राजसमीपे भर्तृसमीपे वा गुरोर्वापादमूले द्यूत-
सभमन्यं वा सतां समाजं स्त्रीमध्यं वा समनुप्रविश्य यानै-
र्वाप्युच्चावचैरभियान् भयात्प्रसाड्गाद्‍ ह्वीमत्त्वाद्‍ घृणित्वाद्वा
निरुणद्धयागतान् वातमूत्रपुरीषवेगान् तदा तस्य सन्धार-
णाद्वायु: प्रकोपमापद्यते ।
च.चि. ६-७, पान ४६६

वातमूत्रपुरीषांचे वेग उत्पन्न झाल कीं त्यांची प्रवृत्ति होण्याची व्यवस्था लगेच केली पाहिजे. परन्तु ज्यावेळीं व्यक्ति ही राजा, धनि, गुरु यांच्या सान्निध्यांत असते, मोठमोठया अधिकारी सभ्य व्यक्तींच्या सभेंत बसलेली असते, सभोंवतीं स्त्रीवर्ग वा पुरुषवर्ग (भिन्नलिंग) असतो एखाद्या गोष्टींत रंगतो. वा वाहनांतून प्रवास होत असतां त्यावेळीं वेगविधारण केलें जातें, तसेंच भीतीमुळें, लाजेमुळें, किळसीमुळें वातमूत्रपुरीषाच्या आलेल्या वेगांचें संधारण होतें. या वेगविधारनानें वातप्रकोप होतो.

साहस
यदा पुरुषो दुर्बलो हि सन् बलवता सह विगृह्यति, अति-
महता वा धनुषा व्यायच्छति, जल्पति वातिमात्रमतिमात्रं
वा भारमुद्वहति, अप्सु वा प्लवते चातिदूरम्, उत्सादन-
पदाघातने वातिप्रगाढमासेवते, अतिप्रकृष्टं वाध्वानं द्रुतम-
तिपतति, अभिहन्यते वान्यद्वा किंचिदेवंविधं विषममतिमात्रं
व्यायामजातमारभते, तस्यातिमात्रेण कर्मणोर: क्षण्यते ।
च.नि. ६-४, पान ४६५

धनुषाऽऽयस्यतोऽत्यर्थ भारमुद्वहतो गुरुम् ।
युध्यमानस्य बलिभि: पततो विषमोच्चत: ॥
वृषं हयं वा धावन्तं दम्य वाऽन्यं निगृह्यत: ।
शिलाकाष्टाश्मनिर्घातान् क्षिपतो निघ्नत: परान् ॥
आधीयानस्य वाऽत्युच्चैर्दूरं वा व्रजतो द्रुतम् ।
महानदीर्वा तरतो हयैर्वा सह धावत: ॥
सहसोत्पततो दूरं तूर्ण वाऽपि प्रनृत्यत: ।
तथाऽन्यै: कर्मभि: क्रुरैर्भृशमभ्याहतस्य वा ॥
विक्षते वक्षसि व्याधिर्बलवान समुदीर्यते ।
स्त्रीषु चातिप्रसक्तस्य रुक्षाल्पप्रमिताशिन: ॥
मा.नि. राजयक्ष्मा, २१ ते २५ पान १३२

ज्यावेळीं व्यक्ति आपणास सोसणार नाहीं अशा प्रमाणांत शक्तीबाहेरचे श्रम करते, त्यावेळीं त्या क्रियेस साहस असें म्हणतात. आपणापेक्षां बलवान माणसांशीं झुंज खेळणें, मोठें, बळकट व कठिण असें धनुष्य वापरणें, सारखे मोठयानें बोलणें वा गाणें, जड ओझीं वहाणें, पाण्यामध्यें फार दूरपर्यन्त पोहत जाणें, अधिक प्रमाणांत अंग रगडून घेणें वा तुडवून घेणें फार दूरपर्यन्त पळत जाणें, उडया मारणें, उंच पर्वत चढणें, वेगानें-पळणार्‍या वा माजलेल्या बैल, घोडा, हत्तीं, इ. पशूंना आवरणें, वजनदार लाकूड वा दगड दूर फेकणें, मारामारी करणें, मार लागणें, नृत्य करणें, रुक्ष, अल्प मोजके खाणारानें अतिमैथुन करणें; खेळ वा व्यायाम यांच्या निमित्तानें कोणत्याहि स्वरुपांत एकदम फार श्रम करणें या कारणांनीं उर:क्षत निर्माण होतें.

क्षय
क्षयज राजयक्ष्म्याचे दोन प्रकार आहेत. अनुलोम (क्षयज) राजयक्ष्मा प्रतिलोम (क्षयज) राजयक्ष्मा.

यदा पुरुषोऽतिमात्रं शोकचिन्तापरीहृदयो भवति ईर्ष्यो-
त्कण्ठाभयक्रोधादिभिर्वा समाविश्यते, कृशो वा सन्
रुक्षान्नपानसेवी भवति, दुर्बलप्रकृतिरनाहारोऽल्पाहारो वाऽस्ते,
तदा तस्य हृदयस्थायी रस: क्षयमुपैति, स तस्योपक्ष-
यात्संशोषं प्राप्नोति ।
च.नि.६-९ पान ४६७

ज्यावेळीं एखादी व्यक्ति शोक, चिंता, इत्यादि मानसिक विकारांनीं अत्यंत पीडित होते; किंवा ईर्षा, उत्कंठा, भय, क्रोध या भावनांनीं चित्ताची समस्थिति बिघडते किंवा स्वत: कृश असूनहि आहारामध्यें रुक्ष गुणाचे पदार्थ घेतले जातात, प्रकृतीनें दुर्बल असूनहि आहार थोडा घेणे वा मुळींच न घेणें अशा गोष्टी केल्या जातात त्यावेळीं उत्पन्न होणारा आहाररस क्षीण होतो आणि अनुलोम राजयक्ष्मा उत्पन्न होतो.

यदा वा पुरुषोऽतिहृर्षणात् प्रसक्तभाव: स्त्रीष्वतिप्रसड्गमारभते,
तस्यातिमात्रप्रसड्गाद्रेत: क्षयमुपैति ।
क्षयमप चोपगच्छति रेतसि यदि मन:स्त्रीभ्यो नैवास्य निवर्तते,
अतिप्रवर्तत एव, तस्य चातिप्रणीतसड्कल्पस्य मैथुन्मापद्यमानस्य
न च शुक्रं प्रवर्तते, अतिमात्रोपक्षीणरेतस्वात् ।
च.नि. ६-१० पान ४६७

संप्रति क्षयेषु शोषकारणेषु प्राय: शोषजनकत्वेन प्रधानं
शुक्रक्षयं शोषकारणं `यदा वा' इत्यादिना प्राह ।
अतिप्रणीतसड्कल्पस्येति, अतिमहता प्रयत्नेन कृतध्वजोच्छ्रायस्या
च.नि. ६-११ टीका पान ४६८

अति कामुकतेमुळें पुरुष अतिप्रमाणांत स्त्रीगमन करतो व त्यामुळें त्याचे शुक्र क्षीण होतें. शरीरास दुर्बलता येऊन स्वाभाविक असें मैथुन सामर्थ्य कमी होतें. अशा स्थितींत वस्तुत: मैथुनपासून निवृत्त झाले पाहिजे; परन्तु मानसिक विकृतीमुळें उच्छृंखलता वाढून स्त्रीविषय अभिलाषा उणावण्याचे ऐवजी अधिकाधिक वाढत जाते. असा मनुष्य कृत्रिम उपायानें प्रयत्नपूर्वक शिस्नोस्थान घडवून, आणतो आणि वरचेवर मैथुनास प्रवृत्त होतो. शुक्र क्षीण झालें असल्यामुळें मैथुनाचे वेळीं व्हावा तसा शुक्रस्त्राव होत नाहीं. फार्र थोडें शुक्र स्त्रवतें. अशा रीतीनें शुक्रक्षय होऊन वायूचा प्रकोप होतो.

संप्राप्ति
तैरुदीर्णोऽनिल: पित्तं कफं चोदीर्य सर्वत: ।
शरीरसन्धीनाविश्य तान् सिराश्च प्रपीडयन् ॥
मुखानि स्त्रोतसां रुद्‍ध्वा तथैवातिविवृत्य वा ।
सर्पन्नूर्ध्वमधस्तिर्यग्यथास्वं जनयेद्गदान् ॥
वा.नि. ५-५, ६ पान ४७७

स०-तै: - साहसादिभि:, उदीर्णोऽनिल इदमिदं कुर्वत् यथास्वं
गदान् जनयेत् ।
उदीर्ण:- उल्बण: पित्तश्लेष्मभ्यामधिक: अत एव पित्तमुदीर्य -
स्वस्थानाच्च्यावयित्वा, तथा कफं सर्वत:- सर्वस्मात् उदीर्य,
तथा शरीरसन्धीन - दशाधिकशतद्वयसड्खयातान्,
आविश्य-तेषामन्त: प्रवेशं कृत्वा, तांश्च - सन्धीन्, प्रप्रीडयन् -
प्रकर्षेन मर्दयन्निव, तथा सिरा अपि सकलशरीरगा: प्रप्रीडयन्
तथाऽन्येषांस्त्रोतसां स्त्रोतसां मुखानिद्वाराणि रुद्‍ध्वा, तथैव तानि
वा अतिविवृत्य - प्रसार्यस्त्रोतोमुखानि । सर्पन्नित्यादि ।
उर्ध्व सर्पन् वायु: पीनसादीन् व्याधीन् जनयेत्, अध: सर्पन्
विड्भ्रंशं विदशोषं वा कुर्यात्, तिर्यक् सर्पन् पार्श्वरुजं वा कुर्यात्,
इति यथास्वंशब्दस्यार्थ: ।
वा.नि. ५-५, ६ स० टीका, पान ४७७

दोषैर्मन्दानलत्वेत सोपलेपै: कफोल्बंणै: ।
स्त्रोतोमुखेषु रुद्धेषु धातूष्मस्वल्पकेष च ॥
विदह्यमान: स्वस्थाने रसस्तांस्तानुपद्रवान् ।
कुर्यादगच्छन्मांसादीनसृक् चोर्ध्व प्रधावति ॥
पच्यते कोष्ठ एवान्नमन्नपक्त्रैव चास्य यत् ।
प्रायोऽस्मान्मलतां यातं नैवालं धातुपुष्टये ॥
रसो‍ऽप्यस्य न रक्ताय मांसाय कुत एव तु ।
उपस्तब्ध: स शकृता केवलं वर्तते क्षयी ॥

स०-दोषै:-वातपित्तकफै:, कफोल्बणत्वात् स्त्रोतोद्वारेषु रुद्धेषु -
पिहितेष सत्सु, रस: स्वस्थान एव विदह्यमानो - न
सम्यग्रक्ततां प्राप्नुवन्, तांस्तान् - अनेकान् कण्ठोद्‍ध्वसादीन्,
उपद्रवान कुर्यात् । किम्भूतैर्दोषै ? कफोल्बणै:- श्लेष्माधिकै: ।
अत एव कफाधिकत्वात् सहोपलेन श्लेष्मलेपे-नसह
वर्तन्ते सोपलेपा:, तैस्तथाविधैर्दोषैस्तदानीं मन्दानत्वं क्रियते ।
तेनैव च मन्दानलत्वेन हेतुना धातूष्मसु रसाद्यग्निषु, अल्पकेषुं ।
अतिशयेनाल्पेषु । एवमनेककारणसद्भावाद्रस: स्वस्थान एव
विदह्यमान:- पित्तकारिणीं मध्यमं: पाकावस्थामनुभवन् सम्यक्
पाकमगच्छन् यथोचितान् विकारांस्तांस्तान् कुर्वन्, मांसादीन्-मांस-
प्रभृतिकान् धातून् अगच्छन्-अप्राप्नुवन् विदह्यमानतया
रक्ततामापन्न:, तदसृक् चोर्ध्व प्रसर्पति, केवलं निष्ठीवन-
सहितं वा । तस्मात् क्षणियो न तन्मांसादिधातुपुष्टये ।
किञ्चास्मादपि हेतो: स रसो न धातुपुष्टये । [यत्-]
यस्मात्, [अन्नं] पच्यते - अन्नं सारकिट्टत्वं नीयते,
अन्नपक्त्रैव-जाठराग्निना, कोष्ठ एव - न धातुषु, जाठराग्निनैव-
नधात्वग्रिभि:, इति । यत एवं ततोऽस्मात् प्राड्निरुपिताद्धेतु-
कदम्बकात्, प्रायो मलतां - आधिक्येन मूत्रपुरीषतां, प्राप्त-
मन्नं नैव धातुपुष्टयेऽलं-समर्थम् ।
धातुपुष्टिग्रहणेनैतत्सूचयाति, अभिनवमृत्कुम्भजललवस्यन्दनन्यायेन
करोत्येव, अन्यथा वर्षगणानुबन्धि जीवितं क्षयिणो न सम्भाव्येत ।
तस्माद्धातुस्थितिमात्रं भवति न तु धातुपोषणमिति स्थितम् ।
रस:-उभयरुपोऽन्नरसो धातुरसो वा, अस्य - क्षयिण:,
निकटस्य रक्तधातोर्न पुष्ट्ये, मांसधातोर्विप्रष्टस्य तु कुत
एव स्यात् ? एवं न सम्भाव्यत इत्यपिशब्दार्थ: ।
ननु यद्येवं तत्कथमन्येभ्यो धातुभ्यो विशेषेण धारण-
स्वभावेभ्यो विना क्षयी जीवेत ? इत्याशड्कयाह - उपस्तब्ध: इति ।
स:-क्षयी, शकृता-पुरीषेण केवलमुपस्तब्ध: - कृतावष्टम्भो, वर्तते -
प्राणिति, पूर्वोक्तन्यायेन किञ्चिदाहाररसाप्यायितैर्धातुभिर्धारणस्वभावैर्धृतमात्र: ।
ननु, `विदह्यमान: स्वस्थाने रसस्तांस्तानुपद्रवान् ।
कुर्यादगच्छन्मांसादीनसृक् चोर्ध्व प्रधावति ॥''
इत्यनेन रक्तस्य सत्ता प्रतिपादिता । ``रसोऽप्यस्य
न रक्ताय इत्यनेन क्षयीणो रक्तस्याभाव: प्रत्यपादि ।
तदिमे वाक्ये परस्परं व्याघ्नाते । अत्रोच्यते ।
नानयोर्वाक्ययो: परस्परं विरोध: । यत: ``असृक
चोर्ध्व प्रधावति ।'' इत्यनेन न तद्धातुरुपतां प्राप्तमुक्तम् ।
किन्तर्हि ? रसस्य विदह्यमानतया स्वस्थानस्थितस्य रक्त-
धात्वाशयमगच्छतो रक्तोद्‍भूतिरुक्ता । अनेनैवाभिप्रायेणोक्तरत्र
वाक्ये ``रसोऽप्यस्य न रक्ताय'' इत्युवाच ।
अनेन हि रसो धातुरुपाय रक्ताय शोषिणो न संपद्यत इति प्रत्यपादि ।
वा.नि. ५-१९ ते २२, स. टीकेसह, पान ४७९.

विषमाशन, वेगरोध, साहस व धातुक्षय या कारणांनीं वाताचा प्रकोप होताच तो पित्तांचें व कफाचेंहि उदीरण करतो आणि त्यांच्यासह सर्व शरीरांत संचार करीत असतांना, शरीरांमध्यें असलेल्या सहस्त्रावधि संधींत शिरुन (केवळ अस्थि-संधि नव्हेत) सर्व सिरांचें प्रपीडन करुन, स्त्रोतसांचीं मुखें रुद्ध करुन, कांहीं स्त्रोतसांना प्रसारित करुन सर्व शरीरभर निरनिराळे विकार उत्पन्न करतो. त्यांत प्राणवहस्त्रोतसाची विकृति विशेषस्वरुपामध्यें असते. मूलभूत कारण व प्रेरक या दृष्टीनें जरी वाताचें प्राधान्य असलें, तरी पुढें वातामुळें उदीरित होऊन प्रकोप-प्रसर पावणार्‍या कफाचेंच महत्त्व राजयक्ष्म्यामध्यें अधिक राहतें. उपलेप करणें हा कफाचा स्वभाव आहे. वातानें प्रेरित होऊन शरीरांतील सर्व सूक्ष्मातिसूक्ष्म संधीमध्यें कफाचा प्रवेश झाल्यानंतर स्त्रोतसांचीं मुखें अवरुद्ध होतात. अग्निमांद्य असतेंच. त्याचा व स्त्रोतसांच्या रोधाचा परिणाम म्हणून धात्वग्नीहि मंद होतात. त्यामुळें आहारापासून उत्पन्न झालेला रस, त्या त्या ठिकाणीं जाऊन धातूंच्या पोषणाचे कार्य करुं शकत नाहीं. रस जेथें जेथें जाईल तेथें तेथें स्त्रोतोरोध व धात्वग्निमांद्य असल्यामुळें पुढील धातूंत रसाचें रुपांतर होत नाहीं. या न वापरल्या गेलेल्या रसावर वातानें प्रेरित होऊन प्रसर पावणार्‍या पित्ताचा परिणाम होतो व रसाला विदग्धता येते. या विदग्धतेमुळें अनेक प्रकारचे विकार उत्पन्न होतात. कोष्ठातल्या कोष्ठांत जाठराग्नीमुळें अन्नाचें जें काय पचन होईल तें तसेंच रहातें; उत्तम प्रकारच्या आहररसांत त्याचे परिणमन होत नाहीं, रसापासून रक्तहि धड बनत नाहीं, मग मांसभेदादि पुढील धातु पोसले जाण्याची गोष्ट दूरच रहाते. अशा स्थितीमध्यें रोगी हा केवळ पुरीषनिचयामुळें उत्पन्न झालेल्या अवष्टंभाच्या बळावर कसाबसा काळ कंठीत असतो.

तस्मिन् काले पचत्यग्निर्यदन्नं कोष्ठसंश्रितम् ।
मलीभवति तत्प्राय: कल्पते किंचिदोजसे ॥
च.चि. ८-४१, पान १०७३.

धातूचें पोषण उत्तम रीतीनें होत नसलें आणि स्त्रोतोवरोध सर्व शरीरभर झालेला असला तरी जाठराग्नीच्या संस्कारानें जो थोडासा आहार रस उत्पन्न होतो, तो नवीन मडक्यांतून पाणी ओझरावें त्याप्रमाणें पच्यमानाशयांतून पाझरतो, सर्व स्त्रोतसामध्येंहि याच तर्‍हेनें तो पोहोचूं शकतो. धात्वग्नी मंदावले असले तरी कांहीं थोडेसें कार्य करीत असतातच. त्यामुळें जाठराग्नीनें उत्पन्न केलेल्या आहाररसानें धातूंचें पोषण झालें नाहीं, तरी धातूंच्या धारणाचें कार्य होत राहतें. (येथील ओजस् शब्दाचा अर्थ टीकाकारानें आहाररस असाच केला आहे.) असें झालें नसतें तर राजयक्ष्म्याने पीडीत रुग्ण मासानुमास क्वचित् वर्षानुवर्षहि जगूं शकला नसता. रस रक्तांतहि परिणत होत नाहीं असे म्हटल्यावर रक्त बाहेर पडून वसहाणें `असृक्' चोर्ध्व प्रधावति' हें लक्षण कसें सांगितलें आहे अशी शंका येते. याचें उत्तर असें कीं या ठिकाणीं रक्तपित्ताच्या स्वरुपानें बाहेर पडणारें रक्त हें विदग्धता आलेल्या रसाचा परिणाम म्हणून विकृत झालेलें असतें, धातुप्रसादरुप असत नाहीं. आहार रसाचें सम्यक् परिणमन न झाल्यामुळें धातु क्षीण, दुर्बल होत जातात, अशा स्थितींत प्रकुपित झालेल्या तीनहि दोषांचा संचार सर्व शरीरभर होत असतोच. धातुदौर्बल्यामुळें त्यांचा प्रतिकार होऊं शकत नाहीं. दौर्बल्यामुळें उत्पन्न झालेल्या स्त्रोतोवैगुण्यामुळें स्थानसंश्रयास हवा तेवढा वाव असतो व त्यामुळें सर्व शरीरभर तिन्ही दोषांचा परिणाम म्हणून अनेक प्रकारचीं लक्षणें उत्पन्न होतात.

जायन्ते व्याधयश्चात: षडेकादश वा पुन: ।
येषां संघातयोगेन राजयक्ष्मेति कथ्यते ॥
च.चि. ८-४४, पान १०७३.

विशिष्ट संप्राप्तीनें घटित अशा या सर्व रोगरुपलक्षणांच्या समुदायालाच राजयक्ष्मा असें म्हणतात.

पूर्वरुपें
रुपं भविष्यतस्तस्य प्रतिश्यायो भृशं क्षव: ।
प्रसेको मुखमाधुर्यं सदनं वह्निदेहयो: ॥
स्थाल्यमत्रान्नपानादौ शुचावप्यशुचीक्षणम् ।
मक्षिकातृणकेशादिपात: प्रायोऽन्नपानयो: ॥
हृल्लासश्छर्दिररुचिरश्नतोऽपि बलक्षय: ।
पाण्योरवेक्षा पादास्यशोफोऽक्ष्णोरतिशुक्लता ॥
बाह्वो प्रमाणजिज्ञासा काय बैभत्स्यदर्शनम् ।
स्त्रीमद्यमांस प्रियताघृणित्वं मूर्द्धगुण्ठनम् ॥
नखकेशातिवृद्धिश्च, स्वप्ने चाभिभवो भवेत् ॥
पतड्गकृकलासाहिकपिश्वापदपक्षिभि: ॥
केशास्तितुषभस्मादिराशौ समधिरोहणम् ।
शून्याणां ग्रामदेशानां दर्शनं शुष्यतोऽम्भस: ।
ज्योतिर्गिरीणां पततां ज्वलतां च महीरुहाम् ।
वा.नि. ५-७ ते १२, पान ४७७-७८.

राजयक्ष्म्याच्या पूर्वरुपामध्यें पडसें येणें, शिंका पुष्कळ येणें, तोंडास पाणी सुटणें, तोंड गोड पडणें, अग्नि मंद होणें, शरीर गळून गेल्यासारखें वाटणें; अन्न शिजविण्याची भाण्डी, ताट, वाटी, भोजनाचे पदार्थ हे अगदीं स्वच्छ, निर्मल असले तरी त्यांत कांहींतरी घाण आहे असें वाटणें; माशा, गुंतवळ, केर, कचरा अन्नामध्यें सांपडणें (तशी शंका येणें), मळमळणें, खाल्लेले उलटून पडणें, तोंडाला चव नसणें, खाल्लेले अंगीं न लागणें, पायावर-तोंडावर किंचित् सूज येणें, (टापसणें); डोळ्यांतील पांढरा भाग स्वच्छ, चकचकीत, पांढरा दिसणें, मैथुनासक्ति वाढणें; मद्य, मांस सेवन करावेसें वाटणें (चमचमीत खमंग खावेसे वाटणें), नखें, केस यांची अधिक वाढ होणें, स्वत:चे शरीर निर्मल असलें तरी त्याला कांहीतरी घाण लागली आहे असें समजून किळस वाटणें, डोक्यावरुन पांघरुण घ्यावेसें वाटणें, हात खालीवर करुन वरचेवर पुढून मागून पहाणें; दंडाचे (बाहूंचें) प्रमाण कसें आहे, जाडी वाढली आहे कां ते बारीक झाले आहेत अशी जिज्ञासा वरचेवर प्रदर्शित करणें, स्वभाव सौजन्यहीन, सहानुभूतिशून्य व निष्ठुर बनणें. (निर्घृणित्वम्-च. नि. ६-१५) वाग्भटाचा पाठ घृणित्वम् असा असून हेमाद्रीनं सकृपत्व असा त्याचा अर्थ केला आहे. पाण्योरवेक्षा बाह्‍वोप्रमाणजिज्ञासा या पूर्वपदावरुन आत्मकेंद्रित स्वार्थी स्वभावाचा असा झालेला रोगी सकृप होण्याची शक्यता थोडी; यासाठीं घृणित्व शब्दाची सारखी कशाची तरी किळस येणें, संशयीपणा वाढणें असा अर्थ करावा. किंवा सकृप शब्दाचा अर्थ केविलवाणा, हळवा असा करावा. पूर्वरुपामध्यें रुग्णास कांही विचित्र स्वरुपाचीं स्वप्नेंहि पडतात. पतंग, सरडे, साप, माकडें, मोर, पोपट, घुबड, इ. पशुपक्षी आपल्या अंगावर धावून येत आहेत व आपला पराभव करीत आहेत असें स्वप्नांत दिसतें. उंट, कुत्रा, गाढव, डुक्कर यावर बसून आपण हिंडत आहोत अशीं स्वप्नें पडतात. केस, हाडें, कोंडा, राख यांच्या ढिगावर आपण चढलों आहोंत असें दिसतें. सुकलेले तलाव, ओसाड गांवें, वठलेलीं, जळलेलीं वा मोडलेलीं झाडें स्वप्नांत दिसतात. जळतें गोळे वा उल्का वा पर्वत कोसळत आहेत, झाडें पेटलीं आहेत अशीं स्वप्नें वरचेवर पडतात. शरीरामध्यें उत्पन्न झालेल्या अनेक प्रकारच्या विकृतीचा मानसिक परिणाम अशा रीतींच्या स्वप्नांना कारणीभूत होतो.

रुपें
पीनश्वासकासांसमूर्द्धस्वररुजोऽरुचि: ॥
ऊर्ध्व, विड्भ्रंशसंशोषावध:, च्छर्दिश्च कोष्ठगे ।
तिर्यक्स्थे पार्श्वरुग्दोषे, संधिगे भवति ज्वर: ॥
रुपाण्येकादशैतानि जायन्ते राजयाक्ष्मिण: ।
स०-अंसौ च मूर्द्धा च स्वरश्च तेषां रुजोंऽसमूर्द्धस्वररुज: ।
पीनसश्च श्वासश्चांसमूर्द्धस्वररुजश्च ता:, तथा अरुचि:,
इत्यर्ध्व-ऊर्ध्वस्थिते दोषे, भवति ।
अरुचेरेष पृथगुपन्यास: प्राधान्यख्यापनार्थ: ।
यथा,-अस्मिन् वाधावतिभयावहोऽरुच्याख्य उपद्रवो
न तथा पीनसादय इति । अदह: स्थिते दोषे
विश:-पुरीषस्य, भ्रंशसंशोषौ विड्‍भ्रंशसंशोषौ भवत: ।
``विड्भ्रंशो-भिन्नवर्चस्त्वं, विट्‍शोषो - बद्धविट्‍कता ।''
एतयोश्च परस्परं विरुद्धत्वान्न तुल्यकालं सम्भव: ।
तस्मा त्कदाचिद्विड्भ्रंश: कदाचिद्विदशोषोभवति ।
छर्दिस्तु कोष्ठस्थिते दोषे स्यात् तिर्यक्स्थे दोषे
पार्श्वरुक् भवति । सन्धिगे ज्वरो भवति ।
एतानि पीनसादीन्येकादश रुपाणि शोषिण
उत्पद्यन्ते मुनिस्त्वेवमवोचत् (च.चि.अ. ८/२३) -
``प्रतिश्यायं ज्वरं कासमड्गमर्द शिरोरुजम् ।
श्वासं विड्‍भेदमरुचिं पार्श्वशूलं स्वरक्षयम् ॥
कुरुते चांससन्तापमेकादशम्'' इत्यादि ।
वा.नि. ५-१३, १४, स. टीकेसह, पान ४७८

प्रकुपित झालेले दोष शरीराच्या ऊर्ध्व भागांत प्रविष्ट झाले असतांना चिरकारी स्वरुपाचें पडसें (पीनस), क्षुद्रश्वास, कास, अरुचि, डोकें दुखणें, अंसभागीं निरनिराळ्या स्वरुपाच्या वेदणा होणें, स्वरभेद होणें अशीं लक्षणें दिसतात. अरुचि हें या लक्षणांपैकीं विशेष महत्वाचें लक्षण आहे असें टीकाकारानें सुचविलें आहे आणि तें योग्य आहे. राजयक्ष्म्यामधील अरुचि हें सर्वात वाईट लक्षण आहे कारण अन्न नकोसें वाटल्याने पुढें धातुक्षय सुधारण्याची शक्यता उणावते. प्रकुपित झालेले दोष शरीराच्या अधोभागामध्यें गेल्यास कधीं द्रवमलप्रवृत्ति (विट्‍भ्रंश) तर कधी मलप्रवृत्ति न होणें, मलाचे खडे होणें (विट्‍ संशोष) अशीं लक्षणें उत्पन्न होतात. दोष कोष्ठगत - विशेषत: आमाशयगत झाल्यास छर्दि हें लक्षण उत्पन्न होतें. दोष तिर्यग्‍गत झाले असतां पार्श्वशूल हें लक्षण उत्पन्न होतें. दोष संधिगत झाल्यामुळें ज्वर उत्पन्न होतो.

तेषामुपद्रवान् विद्यात्कण्ठोध्द्वंसमुरोरुजम् ॥
जृम्भाड्गमर्दनिष्ठीववह्निसादास्यपूतिता: ।
वा.नि. ५-१५, पान ४७८

या लक्षणांच्या जोडीलाच मार्ग पुढें केव्हांतरी कंठोध्वंस - घसा सुजणें - दुखणें - आवळल्यासारखा वाटणें, उर:शूल, जृंभा, अंगमर्द; वरचेवर थुंकी सुटणें, तोंडाला घाण येणें, अग्निमांद्य अशीं लक्षणें होतात. दोषांच्या दृष्टीनें राजयक्ष्म्यांतील लक्षणांची वर्गवारी पुढील प्रमाणें करतां येते.

वातज लक्षणें
तत्र वाताच्छिर:पार्श्वशूलमंसाड्गमर्दनम् ॥
कण्ठोध्द्वंस: स्वरभ्रंश: ।

आ.र. - वातजस्य रुपमाह - तत्र वातादिति ।
अंसस्य पृथग्वचनमतिशयार्थम् ।
वा.नि. ५-१६, आ.र. टीकेसह, पान ४७८.

शिर:शूल, पार्श्वशूल, अंसमर्द, अंगमर्द, कंठोध्वंस, स्वरभेद ही लक्षणें वातामुळें उत्पन्न होतात. अंगमर्द यांतील अंग शब्दानें अंसाचाहि समावेश होत असतांना अंसमर्द स्वतंत्र सांगितला नसतां तरी चाललें असतें. परन्तु अंसमर्द या लक्षणाचे विशिष्ट महत्त्व लक्षांत घेऊन गोबलीवर्दन्यायानें त्याचा वेगळा उल्लेख केला आहे.

पित्तज लक्षणें
पित्तात्पादांसपाणिषु ।
दाहोऽतिसारोऽसृक्छर्दिर्मुखगन्धो: ज्वरो मद: ॥
वा.नि. ५-१७, पान ४७८

हातापायाची आग होणें, खांद्याच्या ठिकाणीं उष्णता वाटणें, अतिसार, सरक्त छर्दि, तोंडास घाण येणें, ज्वर, मद, अशीं लक्षणें पित्तामुळें होंतात.

कफज लक्षणें
कफादरोचकश्छर्दि: कासो मूर्द्धाड्गगौरवम् ।
प्रसेक: पीनस: श्वास: स्वरसादोऽल्पवह्निता ॥
वा.नि. ५-१८, पान ४७९

अरुचि, छर्दि, कास, डोकें जड होणें, अंग जड होणें, तोंडास पाणी सुटणें, थुंकी येणें, पीनस, श्वास, आवाज न उमटणें, अग्निमांद्य ही लक्षणें कफामुळें उत्पन्न होतात. सुश्रुतानें राजयक्ष्म्यांतील लक्षणांचें दोषभेदानुरुप वर्णन करीत असतांना संलोचश्वांसपार्श्वयो: असें एक लक्षण दिलें आहे. टीकाकारानें संलोच या शब्दाचा अर्थ लुंचन असा दिला आहे. संकोच असा एक पाठभेदहि सुचविला आहे. संकोचामध्यें जखडल्यासारखें वाटल्यामुळें हालचाली मोकळेपणानें होत नाहींत असा अर्थ होतो तर लुंचनामध्यें केस उपटतांना जशा वेदना होतात तशा वेदना अपेक्षित आहेत. कंठस्य चोध्वंस: हें लक्षण सुश्रुतानें वाग्भटाप्रमाणें वाताचें न देतां कफाचें म्हणून सांगितलें आहे. टीकाकारानें कण्ठभंग आणि उत्कासिका असें दोन अर्थ त्याचे केले आहेत. उत्कासिका म्हणजे ठसका लागणें असा अर्थ करणें अधिक बरें. (सु.उ.४१-१२,१३)
राजयक्ष्म्याचे अवस्थाभेदानें तीन लक्षणांनीं युक्त-त्रिरुप, सहा लक्षणांनीं युक्त-षड्‍रुप, अकरा लक्षणांनीं युक्त - एकादशरुप असें तीन प्रकार केले आहेत. राजयक्ष्मा व्याधीची गंभीरता लक्षांत येण्याच्या दृष्टीनें या प्रकारांचा उपयोग होतो.

त्रिरुप यक्ष्मा
अंसपार्श्वभितापश्च संताप: करपादयो: ।
ज्वर: सर्वाड्गश्चेति लक्षणं राजयक्ष्मण: ॥
म.-त्रिरुपसंपन्नमाह-अंसेत्यादि । अंसपार्श्वयोरभिताप:
पीडा, अंसो भुजस्योपरिभाग:, अभितापत्वेन एकं रुपं,
एवं संतापेऽपि वाच्यम् । करपादयोरित्यत्र प्राण्यड्गत्वादेकव-
द्भावं मन्यमाना: काश्मीरा:- `ताप: पादकस्य च' - इति
पठन्ति, `करपादिक:' इति च पाठान्तरम् ।
एतत्त्रयं प्रायोभावित्वेन चरकेणोक्तं, तेनैकादशरुपेषु मध्येऽन्यदपित्रयं
बोध्यम यथाच भोज:- ``कासो ज्वरो रक्तपित्तं त्रिरुपे राजयक्ष्मणि'' इति ।
अन्ये त्वाहु:,-राजयक्ष्मणि यो ज्वरस्तस्यैतल्लक्षणमिति; जेज्जटस्तु
त्रिरुपसंपत्तिमेव व्याख्यातवान् ।
मा.नि. राजयक्ष्मा ५, म. टीकेसह, पान १२७

अंसभाग व पार्श्वभाग या ठिकाणीं पीडा होणें, हातापायाची जळजळ होणें व सर्व शरीर कढत वाटणें अशीं लक्षणें त्रिरुप राजयक्ष्म्यामध्यें असस्तात. भोजानें कास, ज्वर आणि रक्तपित्त या लक्षणांनीं युक्त असा त्रिरुप राजयक्ष्मा वर्णिलेला आहे. माधवाच्या टीकाकारानें राजयक्ष्म्याच्या एकूण लक्षणांपैकीं कोणतींहि तीन लक्षणें असलीं म्हणजे त्याला त्रिरुप राजयक्ष्मा म्हणावें असें सुचविलें आहे. परन्तु लक्षणोत्पत्तीमध्यें एक प्रकारचा अनुक्रम असतो असें मानलें तर कोणत्याहि तीन लक्षणांना अस्तित्व असणें फारसें संभवत नाहीं. दोष जसजसे अधिकाधिक गंभीर होत जातील वा अधिकाधिक स्थानांना व्यापतील त्या क्रमानेंच लक्षणें उत्पन्न होतात, असें असल्यामुळें शरीराच्या बाह्य भागांत प्रत्ययास येणारे अंसपार्श्वाभिताप, हस्तपाददाह आणि ज्वर हींच लक्षणें सामान्यत: राजयक्ष्म्याची प्रथमावस्था दाखविणारी मानावींत. स्त्रोतोरोध होऊन रसाचा विदाह होऊं लागला आहे असें या लक्षणांवरुन सामान्यपणें म्हणतां येतें. त्रिरुप राजयक्ष्म्याचे लक्षणांत व्याधींच्या उत्पत्तिभेदानें थोडाफार पालट होण्याची मात्र शक्यता आहे. भोजानें सांगितलेला त्रिरुप राजयक्ष्मा साहसज असावा. कारण त्यानें ज्वर, कास आणि रक्तपित्त अशी तींन रुपें सांगितलीं आहेत. अंसपार्श्वाभिताप या शब्दानें बरगडया (पृष्ठभाग) व खांदे या भागांत अवघडल्यासारखे वाटणें जखडल्यासारखें वाटणें, टोचल्यासारख्या वेदना होणें, उष्णता जाणवणें, हीं लक्षणें, विशेषेंकरुन असतात असें समजावें. चरकाचा टीकाकार चक्रपाणी अंसपार्श्वाभितापादि लक्षणें राजयक्ष्म्याची न मानतां राजयक्ष्म्यांतील ज्वराची मानतो. मात्र या लक्षणांना त्रिरुप राजयक्ष्मा म्हणतात असें एकीय मत त्यानेंहि सांगितलें आहे. या लक्षणांना ज्वराचीं लक्षणें मानणें योग्य नाहीं असें आम्हास वाटतें. कारण राजयक्ष्म्यांतील या त्रिरुपावस्थेंत ज्वरवेग नसलेल्या काळांतहि इतर लक्षणें विद्यमान असतात.

षड्‍रुप राजयक्ष्मा
षडिमानि वा ।
कासो ज्वर: पार्श्वशूलं स्वरवर्चोभेदोऽरुचि: ॥
च.चि. ८-४६, पान १०७३

कास, ज्वर, पार्श्वशूल, स्वरभेद, वर्चोभेद, अरुचि अशीं सहा लक्षणें चरकानें षड्‍रुप राजयक्ष्म्याची म्हणून सांगितलीं आहेत.

भक्तद्वेषो ज्वर: श्वास: कास: शोणितदर्शनम् ।
स्वरभेदश्च जायेत षड्‍रुपे राजयक्ष्मणि ॥
इदानीं मध्यबलदोषारब्धस्य शोषस्य षड्‍रुपाणि: दर्शयन्नाह-
भक्तद्वेषो ज्वर इत्यदि । स्वरभेद: घर्घरादिस्वर: ।
सु.उ. ४१-११, सटीक; पान ७१२

सुश्रुतानें पार्श्वशूल व वर्चोभेद हीं चरकानें उल्लेखिलेलीं लक्षणें न सांगतां त्या ऐवजी श्वास आणि रक्तप्रवृत्ति (शोणितदर्शन) अशीं लक्षणें सांगितली आहेत. राजयक्ष्मा साहसज असेल त्यावेळीं सुश्रुतोक्त लक्षणें षट्‍रुप राजयक्ष्म्याची मानावींत असें आम्हास वाटतें, दोषाचे बल मध्यम असतांना षड्‍रुप यक्ष्मा होतो.

अन्गिमांन्द्यं ज्वर: शैत्यं वान्ति: शोणितपूययो: ।
सत्वहानिश्च दौर्बल्यं रोगराजस्य लक्षणम् ॥
यो.र, राजयक्ष्मा. पान ३११

योगरत्नाकरानें अग्निमांद्य, ज्वर, थंडी वाजणें, रक्तपूयमिश्रित वान्ती होणें केविलवाणेपणा, अस्वस्थता येणें (सत्वहानी), दुर्बल होणें अशीं सहा लक्षणें षड्‍रुप राजयक्ष्म्यांचीं सांगितलीं आहेत. सुश्रुतोक्त षड्‍रुप राजयक्ष्माहि योगरत्नाकरानें सांगितला आहेच.

एकादशरुप राजयक्ष्मा
कार्सोऽसतापो वैस्वर्य ज्वर:पार्श्वशिरोरुजा: ॥
छर्दनं रक्तकफयो: श्वासवर्चोगदोऽरुचि: ॥
रुपाण्येकादशैतानि यक्ष्मण: ।
च.चि. ८-४५.४६. पान;१०७३

अत ऊर्ध्वमेकादशरुपाणि तस्य भवन्ति तद्यथा-शिरस:
परिपूर्ण्त्वं, कास, श्वास:, स्वरभेद:, श्लेष्मणश्छर्दनं शोणित-
ष्टीवनं, पार्श्वसंरोजम्, अंसावमर्दो, ज्वर: अतीसारस्तथारोचक, इति ॥
एकादशरुपाणीतिवचनेन - एकादशरुपाण्येव संपूर्णराजयक्ष्मणि
भवन्तीति दर्शयति ।
कासश्वासाद्‍यश्च ये, एकादशरुपा उदाहरणार्थ व्याख्याता:, न ते प्रतिनियमार्थम् ।
तेन चिकित्सिते वक्ष्यमाणमेकादशरुपचतुष्टयं भिन्नलक्षणं न विरोधि ।
च.नि. ६-१६ सटीक पान ४७०

कास, असंताप, वैस्वर्य, ज्वर, पार्श्वशूल, शिर:शूल, रक्तछर्दि कफच्छर्दि, श्वास, वर्चोभेद, अरुचि अशीं लक्षणें चरकानें एकादशरुप राजयक्ष्म्याचीं सांगितलीं आहेत. छर्दनं रक्तकफयो: या पदानें रक्तप्रवृत्ति आणि छर्दि अशीं दोन लक्षणें घावींत. सुश्रुतानें वर्णन केलेल्या अकरा लक्षणांमध्यें चरकोक्त श्वास या लक्षणाऐवजी कंठस्य उध्वंस: असें वेगळें लक्षण सांगितलें आहे. या एकादश लक्षणांच्या स्वरुपामध्यें उत्पत्तिभेदानें होणार्‍या यक्ष्म्याच्या प्रत्येक भेदांत लक्षणांचा थोडाथोडा वेगळेपणा असणें स्वाभाविक आहे. कांहीं ठिकाणीं एकच अवयवांतील पीडाविशेष निरनिराळ्या शब्दानें सांगितले आहेत.

अत्र प्रत्येकमेकादशलक्षणपठेन एकादशलक्षणयोगेनैव
राजयक्ष्मण: संपूर्णत्वं प्रायो भवतीति दर्शयति ।
यत्तु षड्‍लक्षणत्वं त्रिलक्षणत्वं वा यक्ष्मणो वक्ष्यन्ति,
तदसंपूर्णलक्षणस्यैव ज्ञेयम‍ ।
ननु शोषाणामयथाबलमारम्भादिजत्वभेदेन चातुर्विध्यकथनेन
किं ? यतस्तानि तान्येव लक्षणानि सर्वत्र भवन्ति; तथाच
सर्वेऽपि त्रिदोषजा: तेनैकरुपत्वाभिधानमेव युक्तम्, उक्तं च
शल्ये -``एकादशानामेकत्र सांनिध्यात्तन्त्रयुक्तित: ।
क्रियाणां चाविभागेन प्रागेकोत्पादनेच च ॥
एक मत: शोष: सन्निपातात्मको गद: ''
(सु.उ. अ.४१)
इति - इहापि चोक्तम् - `सर्वस्त्रिदोषजो यक्ष्मा इत्यादि । मैवं ।
हेतुलक्षणचिकित्सितेन चतुर्णामपि भेदाद्भिन्न एवेति युक्तम् ।
तत्र हेतवोऽयथाबलमारम्भादय उक्ता एव, लिड्गं च भिन्नं
साहसजे कण्ठोद्‍ध्वंस उरोरुग्‍ज्जृम्भा च; वेगसंधारणजे च
अड्गमर्दो मुहुश्छर्दिस्तथा वर्चोर्भेदस्त्रिलक्षण: ।
अन्यत्र हि वर्चोभेदस्त्रिलक्षणो न भवति; क्षयजे श्वासपार्श्वशूलांससंतापा:;
विषमाशनजे छर्दनं रुधिरस्य साहसजे प्रतिश्यायाभाव: शोषेतु
प्रतिश्याय इत्यादिलक्षणभेद: ।
चिकित्सितभेदस्तु असाधारणलक्षणे चिकित्साभेदकृत एव; तस्मादभेदो
यक्ष्मणां युक्त एव; तन्त्रान्तरे तु स्थूलदृष्टया अभेद उक्त:;
इहापि स्थूलदृशा `सर्वस्त्रिदोषजो ज्ञेय:' इत्यादिनाऽभेद उक्त एव;
सूक्ष्मचिन्तायां त्वयमेव भेद उक्तो ज्ञेय: ।
पुनश्च कासोऽड्गताप इत्यादिना दोषलक्षणानि च वक्ष्यति,
तत्सामान्येन यक्ष्मण: प्रायोभाविलक्षणं चतुर्ष्वपि
समुच्चित्योक्तमिति ज्ञेयं; तेन न पौनरुक्त्यम् ।
च.चि. ८-२८ ते ३२ टीका, पान १०७२

राजयक्ष्मा वस्तुत: सान्निपातिक वा एकच आहे. सर्व अकराच्या अकरा लक्षणें व्यक्त झालीं म्हणजेच तो पूर्ण झाला असें म्हणावें. त्रिरुपता वा षड्‍रुपता ही राजयक्ष्म्याच्या असंपूर्णतेचीच द्योतक आहेत. व्याधिदृष्टया जरी राजयक्ष्मा एकरुप असला तरी कारणभेदानें त्याचे चार प्रकार करणें योग्य आहे. सर्व सामान्य स्वरुप, सर्वप्रकारच्या राजयक्ष्म्यांत एक असलें तरी लक्षणांचा उत्पत्तिक्रम आणि लक्षणसमुच्चय यामध्यें थोडाथोडा भेद असतो. साहसज राजयक्ष्म्यामध्यें कंठोध्वंस, उर:शूल, जृंभा हीं लक्षणें अधिक असतात. वेगसंधारणज राजयक्ष्म्यामध्यें अंगमर्द, छर्दि, तीन दोषांच्या लक्षणांनीं युक्त असा वर्चोभेद; क्षयज यक्ष्म्यामध्यें श्वास, पार्श्वशूल अशीं लक्षणें विशेष असतात. चिकित्सेच्या दृष्टीनें लक्षणसमुच्चयातील हे भेद लक्षांत घावेच लागतात. त्यामुळें स्थूलदृष्टीनें राजयक्ष्मा एकरुप मानूं नये. त्याचे प्रकार वर्णन करणें इष्ट आहे. कारणभेदानें होणार्‍या राजयक्ष्म्याचे चार प्रकार चरकानें विस्तृतपणें वर्णिलेले आहेत ते अभ्यासणें आवश्यक आहे.

विषमाशनज राजयक्ष्मा
तस्यानाप्यायमानस्य विषमाशनोपचिता दोषा: पृथक् पृथ-
गुपद्रवैर्युञ्जन्तो भूय: शरीरमुपशोषयन्ति, तत्र वात: शूल-
मड्गमर्द कण्ठोद्‍ध्वंसनं पार्श्वसंरोजनमंसावमर्दनं स्वरभेदं
प्रतिश्यायं चोपजनयति, पित्तं पुनर्ज्वरमतीसारमन्तर्दाहं च,
श्लेष्मा तु प्रतिश्यायं शिरसो गुरुत्वमरोचकं कासं च, स
कासप्रसड्गादुरसि क्षते सशोणितं ष्टीवति, शोणितगमना-
च्चास्य दौर्बल्यमुपजायते ।
एवमेते विषमाशनोपचितास्त्रयो दोषा राजयक्ष्मणामभिनिर्वर्तयन्ति ।
स तैरुपशोषणैरुपद्रवैरुपद्रुत: शनै: शनैरुपशुष्यति ।
च.नि. ६-१२ पान ४६८

विविधान्यन्नपानानि वैषम्येण समश्नत: ।
जनयन्त्यामयान् घोरान्विषमान्मारुतादय: ॥
स्त्रोतांसि रुधिरादीनां वैषम्याद्विषमं गता: ।
रुद्‍ध्वा रोगाय कल्पन्ते पुष्यन्ति च न धातव: ॥
प्रतिश्यायं प्रसेकं च कासं छर्दिमरोचकम् ।
ज्वरमंसाभितापं च छर्दनं रुधिरस्य च ॥
पार्श्वशूलं शिर:शूलं स्वरभेदमथापि च ।
कफपित्तानिलकृतं लिड्गं विद्याद्यथाक्रमम् ॥
च.चि. ८-२८ ते ३१, पान १०७१

विषमाशनामुळें प्रकुपित झालेलें दोष स्त्रोतोरोध उत्पन्न करुन पुढील प्रमाणें लक्षणें निर्माण करतात. त्यांत वायूमुळें शूल, अंगमर्द, कंठोध्वंस, पार्श्वशूल, स्वरभेद, प्रतिश्याय अशीं लक्षणें होतात. शिरोगुरुत्व, अरोचक, कास हीं लक्षणें कफाचीं आहेत. प्रतिश्याय हें एकच लक्षण वात व कफ या दोन्ही दोषांनीं उत्पन्न होणारें असलें तरी त्याच्या स्वरुपामध्यें अन्तर असतें. कफज प्रतिश्यायांत गौरव, स्त्राव चिकट असणें, नाक चोंदणें ही लक्षणें असतात. वातज प्रतिश्यायामध्यें स्त्राव पाण्यासारखा पातळ असतो. सतत येणार्‍या कासामुळें उर:क्षत निर्माण होते व त्याचा परिणाम म्हणून रक्ताचें निष्ठीवन होतें. रक्तष्ठीवनानें दौर्बल्य येतें, प्रसेक व छर्दि हीं लक्षणेंहि कफामुळें होतात.

वेगसंधारण राजयक्ष्मा
स (वात:) प्रकुपित: पित्तश्लेष्माणौ समुदीर्योर्ध्वमधस्तिर्यक् च विहरति ।
ततश्चांशविशेषण पूर्वकं च शरीरावयवविशेषं प्रविश्य शूलमुपजनयति,
भिन्नति पुरीषमुच्छोषयति वा, पार्श्वे चातिरुजति, अंसौ चावमृद्गाति,
कण्ठमुरश्चावधमति, शिरश्चोपहंति, कासं श्वासं ज्वरं स्वरभेदं प्रतिश्यायं
चोपजनयति ।
तत: सोऽप्युपशोषणैरेतैरुपद्रवैरुपद्रतु: शनैरुपशुष्यति ।
च.नि. ६-७, पान ४६६

ह्रीमत्त्वाद्वा घृणित्वाद्वा भयाद्वा वेगमागतम् ।
वातमूत्रपुरीषाणां निगृण्हाति यदा नर: ॥
तदा वेगप्रतीघातात् कफपित्ते समीरयन् ।
ऊर्ध्व तिर्यगधश्चैव विकारान् कुरुतेऽनिल: ॥
प्रतिश्यायं च कासं च स्वरभेदमरोचकम् ।
पार्श्वशूलं शिर:शूलं स्वरमंसावमर्दनम् ॥
अड्गमर्द मुहुश्छर्दि वर्चोभेदं त्रिलक्षणम् ।
रुपाण्येकादशैतानि यक्ष्मा यैरुच्यते महान् ॥
च.चि. ८-२० ते २३, पान १०७१

वेगरोधानें प्रकुपित झालेला वायु पित्तकफाना उदीरित करुन स्त्रोतोरोध व निरनिराळीं लक्षणें उत्पन्न करतो. उदरशूल निर्माण होतो. पुरीष हे भिन्नसंघात होऊन द्रवमलप्रवृत्ति होते किंवा शुष्क होऊन त्याच्या गांठी बनतात व मलावष्टंभ होतो. पार्श्वशूल, अंसमर्द, कंठ व उर यामध्यें वेदना, शिर:शूल, कास, श्वास, ज्वर, स्वरभेद, प्रतिश्याय अशीं लक्षणें उत्पन्न होतात.

साहसज राजयक्ष्मा
तस्योर: क्षतमुपप्लवते वायु:, स तत्रावस्थित: श्लेष्माण-
मुर:स्थमुपसंसृज्य शोषयन् विहरत्यूर्ध्वमधस्तिर्यक् चर्योंऽ
शस्तस्य शरीरसन्धीनाविशति तेनास्य जृम्भाड्गमर्दो ज्वर-
श्चोपजायते, यस्त्वामाशयमभ्युपैति तेनास्य वर्चो भिद्यते ।
यस्तु हृदयमाविशति तेन रोगा भवन्ति उरस्या: यो
रसानां तेनाऽस्य अरोचकश्च ।
य कण्ठमभिप्रपद्यते, कण्ठस्तेनोद्‍ध्वंस्यते स्वरश्चावसीदति ।
य: प्राणवहानि स्त्रोतांस्यन्वेति, तेन श्वास: प्रतिश्यायश्चोपजायते ।
य: शिरस्यवतिष्ठते, शिरस्तेनोपहन्यते, तत: क्षणनाच्चैवोरसो
विषमगतित्वाच्च वायो:-कण्ठस्योद्‍ध्वंसनात्कास: सततमस्य
संजायते, स कासप्रसड्गादुरसि क्षते सशोणितं ष्ठीवति,
शोणितगमनाच्चास्य दौर्बल्यमुपजायते, एवमेते साहस-
प्रभवा: साहसिकमुपद्रवा: स्पृशन्ति ।
तत: सोऽप्युपशोषणैरेतैरुपद्रवैरुपद्रुत: शनै: शनैरुपशुष्यति ।
च.नि. ६-५, पान ४६५-६६

युद्धाध्ययनभ्राराध्वलड्घनप्लवनादिभि: ।
पतनैरभिघातैर्वा साहसैर्वा तथाऽपरै: ॥
अथवाबलमारम्भैर्जन्तोरुरसि विक्षते ।
वायु: प्रकुपितो दोषावुदीर्योभौ प्रधावति ॥
स शिरस्थ: शिर:शूलं करोति गलमाश्रित: ।
कण्ठोद्‍ध्वंसं च कासं च स्वरभेदमरोचकम् ॥
पार्श्वशूलं च पार्श्वस्थो वर्चोभेदं गुदे स्थित: ।
जृम्भां ज्वरं च सन्निस्थ उर:स्थश्चोरसो रुजम् ॥
क्षणनादुरस: कासात्कफं ष्टीवेत् सशोणितम् ।
जर्जरेणोरसा कृच्छ्रसुर:शूलातिपीडित: ॥
इति साहसिको यक्ष्मा रुपैरितै: प्रपद्यते ।
एकादशभिरात्मज्ञो भजेत्तस्मान्न साहसम् ॥
च.चि. ८-१४ ते १९, पान १०७०

उर:क्षत: उत्पन्न झाल्यामुळें वायु व पित्त दोन्ही प्रकुपित होतात. ग्रंथामध्यें पित्ताचा उल्लेख स्पष्टपणें नसला तरी उर:क्षत उत्पन्न होण्याच्या प्रक्रियेमध्यें रक्तदुष्टि व आश्रयाश्रयिभावानें होणारी पित्तदुष्टी अभिप्रेत आहे. प्रकुपित वातपित्त उर:स्थानांतील कफाला विकृत करता. उर:स्थानांतील प्रकृत असलेल्या कफाचें शोषण होतें, सर्व शरीरामध्यें दोषांचा वर, खालीं, बाजूला या प्रमाणें संचार होत असतांना त्यांचें जे अंश शरीरसंधीमध्यें प्रवेश करतात त्यामुळें जृंभा, अंगमर्द, ज्वर हीं लक्षणें उत्पन्न होतात. आमाशयामध्यें प्रविष्ट होणारे दोष पुरीषाचा भेद करतात. हृदयामध्यें प्रवेशित झालेल्या दोषांनीं उराच्या आश्रयानें होणारे हृद्रव, हृतशूल, इत्यादि व्याधि उत्पन्न होतात. रसाश्रित दोषामुळें अरुचि उत्पन्न होते. कंठाश्रित दोषानें कंठोध्वंस व स्वरसाद होतो. प्राणवहस्त्रोतसाच्या आश्रयानें असलेल्या दोषामुळें प्रतिश्याय, श्वास हीं लक्षणें होतात. शिर:स्थ दोष शिराचा उपघात करतात. शिर:शूल, शिरोगौरव हीं लक्षणें तेथें दिसतात. वायूची विषम गति, उरामध्यें क्षत निर्माण होणें व कंठोध्वंस या कारणांनीं सारखा खोकला येत रहातो. कासामुळें उरक्षत वाढून रक्तनिष्ठीवन होतें. रक्त गेल्यामुळें दौर्बल्य येतें. अशा रीतींने रोगी अधिकाधिक पीडित होऊन क्षीण होत जातो.

क्षयज राजयक्ष्मा
अथास्य वायुर्व्यायच्छमानशरीरस्यैव धमनीरनुप्रविश्य
शोणितवाहिनी:ताभ्य: शोणितं प्रच्यावयति, अस्य पुन:
तच्छुक्रक्षयात् शुक्रमार्गेण शोणितं प्रवर्तते वातानुसृतुलिड्गम् ।
अथास्य शुक्रक्षयाच्छोणितप्रवर्तनाच्च सन्धय: शिथिली-
भवन्ति, रौक्ष्यमुपजायते, भूय: शरीरं दौर्बल्यमाविशतीति,
वायु: प्रकोपमापद्यते, स प्रकृपितो वशिकं शरीरमनुसर्पन्
उदीर्य्य श्लेष्मपित्ते परिशोषयति मांसशोणिते, प्रच्यावयति
श्लेष्मपित्ते, संरुजति पार्श्वे, चावमृद्गात्यंसौ, कण्ठमुद्‍ध्वंस-
यति, शिर: श्लेष्माणमुपक्लेश्य परिपूरयति श्लेष्मणा,
सन्धींश्च प्रपीडयन् करोत्यड्गमर्दमरोचकाविपाकौ च
पित्तश्लेष्मोत्क्लेशात् प्रतिलोमगत्वाच्च वायुर्ज्वरं, कासं,
श्वासं, स्वरभेदं, प्रतिश्यायञ्चोपजनयति, सकासप्रसड्गादुरसि-
क्षते शोणितं निष्ठीवति ।
शोणितगमनाच्चास्य दौर्बल्यमुपजायते ।
तत: सोऽप्युपशोषणैरेतैरुपद्रवैरुपद्रुत: शनै शनैरुपशुष्यति ।
वशिकं-शून्य-शुक्र-शोणितक्षयाद्‍ रिक्तं इति
च.नि. ६-१०, पान ४६७-६८

ईर्ष्योत्कण्ठाभयत्रासक्रोधशोकातिकर्शनात् ।
अतिव्यवायानशनाच्छुक्रमोजश्च हीयते ॥
तत: स्नेहक्षयाद्वायुवृद्धो दोषावुदीरयत् ।
प्रतिश्यायं ज्वरं कासमड्गमर्द शिरोरुजम् ॥
श्वासं विड्भेदमरुचिं पार्श्वशूलं स्वरक्षयम् ।
करोति चांससंतापमेकादशगदानिमान् ॥
लिड्गान्यावेदयन्त्येतान्येकादश महागदम् ।
संप्राप्तं राजयक्ष्माणं क्षयात् प्राणक्षयप्रदम् ॥
च.चि. ८-२४ ते २७, पान १०७१

प्रकुपित झालेला वायु रसरक्तवाहानीसिरामध्यें प्रविष्ट होतो व रक्ताला स्थानभ्रष्ट करतो. रसरक्त व शुक्र यांच्या क्षयामुळें शरीरांतील सर्व संधी शिथील होतात. व रुक्षता उत्पन्न होते. या रुक्ष, शिथील शरीरामध्यें वायूचा प्रकोप होऊन शरीराला अधिकच दुर्बलता येते. वातप्रकोपामुळें शरीरांतील भाग धातुक्षय होऊन पोकळ होतात. (ही सुषिरता उर व अस्थि यांचे ठिकाणीं विशेष दिसते) त्या ठिकाणीं प्रकुपित वायूमुळें शेष्मपित्ताचें उदीरण होतें. रक्त व मांस शुष्क होतें कफचित्त स्थानभ्रष्ट होतात. अशा रीतीनें सर्व शरीरांतील धातु व स्त्रोतसे विकृत व दुर्बल झाल्यामुळें स्वाभाविकपणेंच अनेक प्रकारची लक्षणें दिसतात. पार्श्वामध्यें रुजा, अंसांचें अवमर्दन, कंठोद्‍ध्वंस, कफानें जणूं भरल्याप्रमाणें डोकें जड होणें, संधीचें प्रपीडन, अंगमर्द, अरोचक, अविपाक हीं लक्षणें निर्माण होतात. पित्त, कफ यांच्या उत्क्लेशामुळें वायूची गति प्रतिलोम होऊन ज्वर, कास, श्वास, स्वरभेद, प्रतिश्याय हीं लक्षणें उत्पन्न होतात. कासाच्या अतियोगानें उर:क्षत; रक्तप्रवृत्ति आणि दौर्बल्य हीं लक्षणें परिणत होत जातात व क्रमाक्रमानें रोगी क्षीण होत जातो. राजयक्ष्म्याच्या चार प्रकारांपैकीं मिथ्याहारविहारामध्यें कोणत्यातरी एकाच प्रकारचीं लक्षणें घडतात असें बहुधा होत नाहीं. दोन वा अधिक प्रकारांतील मिथ्याचारहि व्यक्तीकडून घडलेले असल्यानें संप्राप्तिक्रमानें होणारा लक्षणप्रादुर्भावांचा अनुक्रम एकसारखा असत नाहीं. त्यामध्यें परस्पर संमिश्रण असूं शकतें. यासाठींच वाग्भटानें संप्राप्तीचें व लक्षणोत्पत्तीचें सामान्यीकरण केलें असावें. राजयक्ष्मा व्यक्त झाल्यानंतर त्यामधील ज्वर एका विशिष्ट स्वरुपाचा असतो. कफस्थान जे संधि त्याठिकाणीं मूलत: दोषांचें अधिष्ठान असतें व तेथून ज्वराच्या संप्राप्तीस आरंभ होतो. माधवाच्या ज्वरप्रकरणांत ज्याठिकाणीं प्रलेपक व वातबलासक या दोन ज्वरांचा उल्लेख आला आहे, त्याठिकाणीं ते राजयक्ष्म्याचे उपद्रव म्हणूनच उल्लेखिलेले आहेत. यासाठीं या दोन ज्वरांचे वर्णन आम्ही येथें राजयक्ष्मा प्रकरणांतच करणार आहोंत.

N/A

References : N/A
Last Updated : July 21, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP