मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|विविध अभंग|
६९३५ ते ६९४३

विविध अभंग - ६९३५ ते ६९४३

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


गावगुंड अभंग

॥६९३५॥
आह्मीं झालों गावगुंड । अवघ्या पुंड भूतांसी ॥१॥
दुसरें तें खेळों आलें । एका बोलें तो मियां ॥२॥
अवघियांचा येऊं लाग । नेदूं अंग शिवाया ॥३॥
तुका म्हणे खुंटुं नाद । जिंतूं वाद सर्तीनें ॥४॥

==
जोगी अभंग

॥६९३६॥
जग जोगी जग जोगी । जग जागे बोलती ॥१॥
जागता जगदेव । राखा कांहीं भाव ॥२॥
अवघा क्षत्रपाळे । पूजा सकळ ॥३॥
पूजापात्र कांहीं । फलपुष्प तोय ॥४॥
बहुतां दिसां फेरा । आला या नगरा ॥५॥
नका घेऊं भार । धर्म तोचि सार ॥६॥
तुका मागे दान । द्या जी अनन्य ॥७॥
==
गोंधळी अभंग.

॥६९३७॥
आह्मी गोंधळी गोंधळी । गोविंद गोपाळाच्या मेळीं ॥१॥
आमुचा घालावा गोंधळ । वाजवूं हरि नामीं संभळ ॥२॥
दहा पांचा घाला जेवूं । आह्मी गोंधळाला येऊं ॥३॥
काम क्रोध बकरे मारा । पुजा रखमादेवीवरा ॥४॥
जेथें विठोबाचें देऊळ । तेथें तुकयाचा गोंधळ ॥५॥
==

जैन अभंग.

॥६९३८॥
लंचूनियां केश जति होती सायास । पूजिती पारशनाथ देव ॥१॥
हो कोण अवतार नकळे तयांसीं । सांडूनी हरिसीं भ्रमताती ॥२॥
तुका म्हणे धर्म सोडिला विचार । केवीं येरझार चुके बापा ॥३॥
==

सरवदा अभंग.

॥६९४०॥
ऐका गा एक भाई । सरवदा सांगतो काई । येथें नाडेल माई । दोघां पुत्रांची ॥ ते करिती तिची विटंबना । अवघ्या प्रसिद्ध जना । एक न मारितां शाहाणा । तो जाणा सुख न पवे ॥१॥
आणीक ऐका गा ए । सरवदा सांगतो काय । खरेंचि बोले तो जाय । नरकामध्यें अधोगती ॥ हें चौघांच्या मुखें । मना आणावें सुखें । अवघीं चुकती दु:खें । खोटें बोला नरनारी ॥२॥
आणीक नाडेल एक जाण । सरवदा बोलतो वचन । जागें माझें चित्त म्हणोन । पडिलें खान तया घरीं ॥ ह्मणोन न ह्मणा माझें कांहीं । निजीं निजा सुखें ठायीं । यत्न होईल तई । चोराठायीं विश्वास ॥३॥
आणीक एकी परी । सरवदा सांगतो थोरी । दु:ख पावेल नारी । पतिव्रता यामधीं ॥ पांचांनीं दिधली हातीं । ह्मणोनि न मनावी निश्चिती । परपुरुषी होय रती । सुखगती ते पावे ॥४॥
आणीक एकी परी । सरवदा सांगतो तें करीं दान देतां जो न वारी । नव्हे भला तो भला तो ॥ तुका म्हणे आई । येथें नां काई । सांगसी तें ठायीं । मरो रांडेचें ॥५॥
==

मुंढा अभंग.

॥६९४१॥
संबाल यारा उपर तलें दोन्ही मारकी चोट । नजर करे सो ही राखे पश्वा जावे लुट ॥१॥
प्यार खुदाई रे बाबा । जिकिर खुदाई ॥२॥
उडे कुदे दुंग नचावे आगल भुलन प्यार । लडबड खडबड कांहेकांख चलवत भार ॥३॥
कहे तुका चलो एका हम जिन्होंके सात । मिलावे तो उसे देना तोही चढावे हात ॥४॥

॥६९४२॥
सब संबाल भ्याने लौंढे खडा केऊं गुंग । मदिरथी मता हुवा भुलि पाडे भंग ॥१॥
आपसकुं संबाल आपसकुं संबाल । मुंढे खुबराख ताल । मुथिवोहि बोला नहीं तो करुंगा हाल ॥२॥
आवलका तो पीछे नहीं मुदल विसर जाय । फिरते नहीं लाज रंडी गधे गोते खाय ॥३॥
जिन्हो खातिर इतना होता सो नहीं तुझे बेफाम । उचा जोरो लिया तुंबा तुंबा बुरा काम ॥४॥
निकल जावे चिकल जोरो मुंढे दिलदारी । जबानीकी छोड दे बात फिर एक तारी ॥५॥
कहे तुका फिसल रुका मेरेको दान देख । पकड धका गांडगुडघी मार चलाऊं आलेख ॥६॥

॥६९४३॥
आवल नाम आल्ला बडा लेते भुल न जाये । इलाम त्याकालसमुपरताही तुंव बजाये ॥१॥
आल्ला एक तुं नबी एक तुं ॥२॥
काटतें सिर पावों हात नहीं जीव उराये । आगले देखे पिछले बुझे । आपें हजुर आयें ॥३॥
सब सबरी बचाव म्याने । खडा आपनी सात ॥ हात पावों रखते जबाव । नहीं आगली बात ॥४॥
सुनो भाई बजार नहीं । सबहि निरचे लाव । नन्हा बडा नहीं कोये एक ठोर मिलाव ॥५॥
एक तार नहीं प्यार । जीवतनकी आस ॥ कहे तुका सो हि मुंढा । राखलिये पायेनपास ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : June 09, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP