मराठी मुख्य सूची|ऐतिहासिक साहित्य|शिवचरित्रसाहित्य|
लेख २७

शिवचरित्र - लेख २७

छत्रपति शिवाजी महाराज एक भारतीय शासक आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक होते.


N/Aता
श.१५३८ अधिक आश्विन शु. १३
इ. १६१६ सप्टें १३
 
अज दिवाण मामले मुर्तजाबाद उरुफ चेऊल हवाले आगा हाजी याकुद इस्तबोली हवालदार स॥ तलकोकण व मामले मजकुरु खत फरोख्त बो। रुईवास फिरंगी सो कोट रेवदाडे नजीक चेऊल ब॥ वाडी महादेभट वाडी गुम प॥ तुडाल व भाटा बाबती बाईद्या प॥ मोखव बागाईत आगर चेऊल मामले मजकुरु सु॥ सन सबा असर व अलफ कारणे दिवाण मामले मजकुरी आपण आपले खुसीन सदरहु वाडी गुम देखील भाट बाइद्या याचे फरोख्तखत लेहोनु दिधले असे सदरहु वाडी गुप्त देखील भाट भाइद्या देखील जल स्थल व झाड व माड व बावी सगसंगी व बाजे बावी कुली तमाम चहुहदार्सा फ्ररोख्त केले असे आता सदरहु वाडी गुम व भाट देखील बावी सगसगी व बाजे बावी व झाड व माडा व जलस्थल यासि आपणासि व आपले औळाद व अफलादेसी निसबती नाही तुम्ही सुखे कमावीस कीजे व कतबे व तहकुब ? ते कागद व संतेसे ? व आणीक जे कागद फिरगी व हेदवी सदरहु वाडी व भाट याचे आपणाजवली असतील ते व बाजे हरकोण्हा फिरगिबाजवली असतील तेही कुली तमाम रद असती तुमची निसबती नाही व वाडी गुमाचा फर्मान आपणाजवली होता तोही आपण तुम्हापासि दिधला असे आता पेस्तर वाडी गुम व भाट देखील बावी सगसगी व बाजे बावी व झाड व माड व जल स्थल देखील कुली आपणासि येके जरेयासि येके जरेयासि निसबती नाही व हरकोणी फिरगी उभा राहोनु घसदावा करील तो आपण जाणे आपण तो धसदावा सोडउनु देणे तुमसी जिमा नाही आता सदरहु वाडी व भाट देखील बावी संगसगी व बाजे व झाड व माड व जलस्थळ कुली याचे परमोल ? प्रमाणे आपण खुसी होउनु किमती कबूल करुनु खत फरोख्त लेहोन दिधले असे आपणासि किमतीं पावली हे खत फरोख्त सही किमती सुटी दराज लारी पंधरासे रास १५०००

गौही
तेरीख १२ माहे रमझान उरुफ भादवा

N/A

References : N/A
Last Updated : February 22, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP