प्रसंग चवदावा - देवता निखंदन

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.


सांगतां राहिल्‍या होत्‍या देवता । त्‍या सांगो आरंभिल्‍या उन्मत्ता । कळों यावें समस्‍तां । संत श्रोत्‍यांलागीं ॥४९॥
मग चौथीस पूजिती गण । जेवीत ना चंद्र देखिल्‍याविण । म्‍हणे मी नेणें तुजविण । गणपतिराया ॥५०॥
पंचमीस होऊनि सोंवळें । पुजतील नव नागकुळें । पडलेंसें भ्रांतीचें जाळें । प्रसिद्ध जनांवरी ॥५१॥
पुढें षष्‍टी आलियाउपरी । सडे संमार्जनरी । मुरळीचीं पत्रें भरी । पालथा पडोनियां ॥५२॥
तेवेळीं हरिभक्त आला । म्‍हणती पुढें होय वहिला । हात रिकामा नाहीं जाहाला । तुज द्यावयालागीं ॥५३॥
ज्‍या मुरळ्या करिती अनाचार । चालविती उन्मत्ताचे घरचार । त्‍यांस म्‍हणती भंडार । आपुलिया हातें ॥५४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP