मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|
कवि भास्करास

माधव जूलियन - कवि भास्करास

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


[जाति श्यामाराणी]

तू प्रसाद, तू रस, खरा कवी !
गा, बुडव जगत हें सुखसवीं ! ध्रु०

तृणींहि तुज सौन्दर्य आढळे,
गळे अहन्ता भाव ऊचमळे,
आनन्दाचा गन्ध दरवळे, हठसमाधि कां वृथा हवी ? १

शोधाया जा शब्द कशाला ?
मोहुनि धावे प्रतिभाबाला,
सङगीताशी रङग मिळाला, चित्रमालिका पहा नवी, २

तुझ्या द्दष्टिने बघतां बघतां
जाऊ काठयांची कण्टकता;
सहानुभव जंव कवळी जगता, परन्धाम ही भवाटवी ! ३

तुझ्यापुढे कां व्हावी ऊरुचिर
रातकिडयापरि माझी किरकिर ?
गाशी ऊजळित तू भवमन्दिर, मूक मनें मी तुला श्रवीं. ४

ता. २२ मार्च १९२९

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP