पंचम स्कंध - अध्याय दहावा

श्री मत्स्वच्छंदानंदानी रचिलेल्या प्रसिद्ध देवी भागवतसाराचा मराठी अवतार म्हणजे प्रस्तुत ‘ श्री देवी विजय ‘ ग्रंथ होय.


श्रीगणेशायनमः । पाहूनीदेवीतयासी । मधुरबोलेकालिकेशी । पाहेह्यामूर्खत्वाशी । जयाशाआहेअद्याप ॥१॥

रक्तबीजचंडमुंड । घोरसैन्य उदंड । सर्वझालेखंडखंड । तरीआशानसोडी ॥२॥

माझ्यामायेनेंमोहित । करुनिआणिलेंयेथ । प्राणघेतेंआतांत्वरित । जेणेदेवसुखावतीं ॥३॥

एवंवदोनिशुंभासि । बोलेमधुरवचनेशी । वृथाकांरेप्राणाशी । झोकितांतुम्हींमोहानें ॥४॥

पाताळींकरागमन । देतेंतुम्हांप्राणदान । कैचेंयशायशनिदान । जीववाचवाआपुले ॥५॥

नातरीममबाण । घेतीलतुमचाप्राण । अक्षय्यस्वर्गसुखजाण । रणीपडतांलाभतसे ॥६॥

वाक्य ऐसेंऐकून । निशुंभधावेंससैन्य । वृष्ठिवर्षेमहाबाण । छेदीअंबिकालीलेनें ॥७॥

दोघेंकरितीसमर । शस्त्रास्त्रेंवर्षतींअपार । निवारितीपरस्पर । भयंकरयुद्धतें ॥८॥

सिंहमारीसैनिका । पोटेंफाडिलींअनेका । फाडफाडूनमांसादिका । भक्षीस्वयेंबुभुक्षित ॥९॥

देवींस्वबाणेंकरुन । फोडिलात्याचास्यंदन । अश्वसारथीमारुन । विरथकेलातयासी ॥१०॥

निशुंभेंगदाघेंतली । सिंहमस्तकींताडिली । गदाघायेंतेवेळीं । निशुंभपाडिलादेवीनें ॥११॥

पुनः सावधहोऊन । धांवेअंबेवरीगर्जोन । अंबाकरीमधुपान । तयाप्रतीबोलिली ॥१२॥

क्षणएकहोयस्थिर । छेदितेंतवकंठसत्वर । सुखेंकरीस्वर्गविहार । ज्येष्ठासिमागाधाडितें ॥१३॥

व्यासम्हणेभारता । एवंवदोनिदेवमाता । खड्गप्रहारेंतत्वता । शिरतोडिलेंसकुंडल ॥१४॥

तरीतोमहाशूर । रुडचिनाचेनिशुंभासुर । छेदूनीशरेंपायकर । अंबापाडीतयाशी ॥१५॥

निशुंभपडतांरणीं । शुंभकोपेंआलाझणी । सुंदररुपपाहूनी । मोहाविष्टजाहला ॥१६॥

मनीम्हणहेरुपवती । शृंगाररसाचीमूर्ती । लावण्यकोमलकेवळरती । विपरीतवीरत्वहे ॥१७॥

केवीहीवशहोईल । अवश्यमजलामारील । पळोंतरीअपेशकेवळ । मरणवर्जस्त्रीहस्तें ॥१८॥

कायकरावेंविधान । नचलेयेथेंसामदान । भेदकैचाआलेंमरण । अवश्य आतांयुद्धची ॥१९॥

ऐसाकरुनीविचार । पातलाअंबिकेसमोर । बोललामध्यमवाग्भर । नातिमधुरनातिखट ॥२०॥

हेदेवीसुंदरी । मजसवेंयुद्धकरी । वृथाहेक्लेशभारी । करिसीतूंमूर्खत्वें ॥२१॥

स्त्रीधर्म ऐसानसे । वीरधर्म आचरेऐसे । धार्ष्ट्यकेवळतुझेंअसें । बुद्धिदात्रीकालिका ॥२२॥

स्त्रियांचेबाणनयन । भोंवयाहेंशरासन । हावभावशस्त्रास्त्रेंजाण । चतुरपुरुषलक्ष्यतो ॥२३॥

कवचतेंदिव्यचंदन । मनोरथाचास्यंदन । मंदमधुरजेंभाषण । जयभेरीस्त्रियांच्या ॥२४॥

अन्यशस्त्राचेंधारण । स्त्रियांसीतेंविटंबन । लज्यास्त्रियांचेंभूषण । धार्ष्ट्यदूषणहोतसे ॥२५॥

तुजसमानसुवेषधारी । पुरुषसवेंयुद्धकरी । कर्कशाभासेतीनारी । रसभंगहोतसे ॥२६॥

गुप्तकरावेस्तन । तेथेंधनुराकर्षण । कोठेंतेंमंदगमन । गदापाणीधांवणें ॥२७॥

रुपेंअतिसुकांत । परीबरीनसेसंगत । कालरात्रीबुद्धीदेत । नायीकाहीचामुंडा ॥२८॥

युक्तविचारीअथवाक्रीडनी । चंडिकाहीक्रूरवचनी । सिंहकल्पिलावाहनी । भयंकरश्रेष्ठजो ॥२९॥

टाकुनीवीणावादन । घंटेचाप्रियझालास्वन । ऐसेंअसोनीरुपयौवन । विपरीतसर्व आचरसी ॥३०॥

युद्धचिकरणेंमजसी । कुरुपहोयवेगेसी । क्रूरशब्दजरीबोलसी । समरकरीनतेधवा ॥३१॥

सुंदरातूंमनमोहिनी । शस्त्रनधरवेंमाझेंनी । ऐकूनीवाक्यभवानी । कार्मातजाणूनतीबोले ॥३२॥

सुहास्यकरुनीवदन । बोललीतयामधुरवचन । वृथाविषादेंभरलेंमन । कामबाणेंवेधलासी ॥३३॥

मुर्खाजरीएवंम्हणसी । युद्धकरीकालिकशी । अथवाझुंजेचामुंडेशी । सुखेंकरप्रिहार ॥३४॥

तुजसीसमरकालिका । करीलमीअसेंप्रेक्षका । इच्छानसेकामुका । तुजसवेंमजयुद्धी ॥३५॥

एवंतयाशीवदली । कालिकेसीमधुरबोलिली । तूंचिमारीयाचकालीं । कुरुपप्रिययुद्धीतो ॥३६॥

व्यासम्हणेनृपासी । कालीघेऊनीगदेशी । उभीराहेयुद्धासी । कालरुपाप्रत्यक्ष ॥३७॥

सज्जझालादैत्येश्वर । युद्धझालेंअतिघोर । पहातींदेवमुनीश्वर । आश्चर्यरुपजाहले ॥३८॥

गदाघऊन असुर । कालिकेसीकरीप्रहार । कालीतयासीगदाप्रहार । वारंवारकरीतसे ॥३९॥

गदाघायेकरुन । कालीचूरकरीस्यंदन । सारथीखरमारुन । खदखदांहांसतसे ॥४०॥

गदाघेऊनदुर्धर । धांवलाक्रोधेंअसुर । खड्गघेईकालीसत्वर । वामहस्तछेदिला ॥४१॥

गळेंतेथूनिरुधिर । दैत्यदिसेभयंकर । गदाघेऊनिमहावीर । तैसाचिधांवेमाराया ॥४२॥

गदेसह उजवाहात । कालीछेदूनिपाडित । तत्रापिआलाधांवत । दोनीपायछेदिले ॥४३॥

तरीतोमहाशूर । दैत्यराजभयंकर । उभाराहेक्षणभर । भक्षीनम्हणेकालिके ॥४४॥

कालानेंमगहस्यकेलें । खड्गेशिरकमलछेदिलें । भळभळारक्तकोसळलें । गतप्राणदैत्यझाला ॥४५॥

पुष्पवृष्टीदेवकरितीं । जयजयकारेंगर्जती । कालिकेचेंस्तवनकरितीं । चामुंडेचेंअंबिकेचें ॥४६॥

दिशाझाल्यानिर्मळ । वायुवाहेसीतल । प्रसन्नझालेंनदीसलिल । दक्षिणानलजाहला ॥४७॥

दैत्यजेशेष उरले । तेअंबिकेसिनमिले । शस्त्रेंसमर्पोनिगेले । पाताळाशींसत्वर ॥४८॥

अंबागेलीस्वभुवनी । देवगेलेस्वस्थानीं । सुखावलीमेदिनी । धर्मयुक्तनृपझाले ॥४९॥

देवांचेकेलेंरक्षण । दैत्यांचेकेलेंनिर्दालन । चरित्रहेंपरमपावन । उत्तमोत्तमदेवीचे ॥५०॥

करितीजेपठणश्रवण । अथवाकरितींलेखन । कृतार्थतेचिजगींधन्य । अंबासेवनकरितींजे ॥५१॥

बत्तीसश्लोकएकशत । निशुंभशुंभवधहोत । अंबाबोलिलीतेंचचरित । दिगंतकीर्तिपरांबा ॥५२॥

देवीविजयेपंचमेदशमः ॥१०॥      

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP