पंचम स्कंध - अध्याय चवथा

श्री मत्स्वच्छंदानंदानी रचिलेल्या प्रसिद्ध देवी भागवतसाराचा मराठी अवतार म्हणजे प्रस्तुत ‘ श्री देवी विजय ‘ ग्रंथ होय.


श्रीगणेशायनमः । कृष्णम्हणेभूपती । तेदोघेअसुरबोलती । महिषासीकरीतूंपती । सर्वलक्षणेंयुक्ततो ॥१॥

देवीम्हणेरेदुर्मती । व्यर्थकांकरिसीउक्ति । कामयुक्तामजप्रति । जाणसीषंढाकालवशा ॥२॥

इच्छाजरीजीविताची । वाटधरापाताळाची । अथवातुम्हीयमपुराची । पहामौजरकणरा ॥३॥

ऐकोनीकोपलदुष्ट । युद्धकरितीवृथापुष्ट । धनुकरुनीकर्णाकृष्ट । बाणवृष्टीकरितीते ॥४॥

देवी आणिबाष्कल । युद्धकरितीतुमुल । देवीगर्जेमधुकोमल । देवकार्यकराया ॥५॥

छेदूनीतयाचेशर । धनुष्यतोडिलेंसत्वर । गदाघेऊनीधावेअसुर । देवीतयागदाहाणी ॥६॥

गदाघायेंमूर्छित । झालामुहुर्तेजागृत । गदामारिचंडीप्रत । पराक्रमीअसुरतो ॥७॥

शूलघायेंबाष्कलासी । देवीधाडीयमपुरीशी । देवगर्जतीजयशब्दासी । दुर्मुखपुढेंधावला ॥८॥

रथारुढतोंमहाशूर । तिष्टतिष्टम्हणेक्रूर । बाणाचावर्षलापूर । प्रलयमेघवर्षेजेवी ॥९॥

तयाशंखनादेकोपवी । बाणछेदीगर्जेदेवी । प्रत्यंचाशब्दघोषवी । तुमुलकरीसंग्राम ॥१०॥

बाणशक्तीगदातोमर । वर्षतीदोघेपरस्पर । रणभूमीमाजीघोर । रुधिरनदीजाहली ॥११॥

धनुष्यतयाचेंतोडिलें । कोपेंतेव्हांदुर्मुखबोले । वधितोआतांसत्यबाले । गदाघेऊनिधांवला ॥१२॥

गदामारीहरिशिरी । परीनचळेतोकेसरी । तववेगेखड्गधारी । मस्तकछेदीचंडीका ॥१३॥

जयशब्दातेउच्चारिती । पुष्पवृष्टीदेवकरिती । वृत्तकळतांमहिषाप्रती । क्रोधविस्मयकरीतसे ॥१४॥

ह्मणेआतांकायगती । स्त्रीवधीअसुराप्रती । चिक्षुरम्हणेहोनृपती । चिंतानकीजेसर्वथा ॥१५॥

ताम्रासहनिघेचिक्षुर । सवेसैन्य अपार । पतंगजेवीदीपावर । तेवीआलेरणांगणी ॥१६॥

तयासीपहातादेवी । ज्याघंटाशंखवाजवी । अदभुतनादेंकांपवी । ह्रदयेंदैत्याचीतेधवा ॥१७॥

भयेंतेव्हांपळतीअसुर । तयाधीरदेईचिक्षुर । बाणवृष्टीअतिघोर । देवीवरीकरीतो ॥१८॥

देवीतेव्हांशरजाल । तोडीमारीअसुरबल । शरवृष्टीकरुनतुमुल । वसंतवनरणकेलें ॥१९॥

बाणशरीरींटोंचले । तेचवृक्षापल्लव आले । सरक्तक्षतफुले । पलाशदाडिमीजास्वंदी ॥२०॥

पडतांडोळेवटारले । कमळींभ्रमरशोभले । मरतांहंसतांबाहेरआले । दंततेचीजाईजुई ॥२१॥

गजावरीबैसलेंवीर । तुटूनपडेखालीशिर । पक्व आम्रफलेंनिर्धार । रसयुक्तपडताती ॥२२॥

शरीरींदिसतीमांसगोळे । अनेकतींपिकलींफळें । हस्तपादभिन्नझालें । शाखापडल्यातुटोनी ॥२३॥

ऋव्यादाशीसुखकर । ऋतुवर्णिलाकुस्रुमाकर । कातरासीभयंकर । उत्साहकरशूरासी ॥२४॥

ग्रीष्मऋतुमहिषासुर । तेणेंशोषिलेधर्मनीर । अधर्म उष्णभयंकर । संतदेवतापले ॥२५॥

जपतपहोमयज्ञ । जळालेसर्वदेवांन । मगदेवींदेवप्रार्थून । वर्षाऋतुइच्छिला ॥२६॥

देवतेजाचेमेघवळले । देवीतडिदूपप्रकाशले । शंखघंटादिशब्ददाटले । मेघगर्जनाकोंदली ॥२७॥

दैत्य अंधःकारवळला । शरजालपाऊस आला । खद्योताचामेळाझाला । नानाशस्त्रेंझळकती ॥२८॥

देवीकोपाचामारुत । घोरशस्त्रेंवृष्टिहोत । दुष्ठधुरोळाबैसत । दैत्यपातपृथ्वीशी ॥२९॥

चंडीसिंहतटदोनी । रक्तनदीउचंबळोनी । मिळेमृत्युसिंधुसीजाऊनी । दुस्तरझालीराक्षसा ॥३०॥

दैत्यमुंडेतींतपडली । तुंबीफळेशोभली । जलशिक्षार्थघेतलीं । यमदूतेंबाळलीला ॥३१॥

करचरणछिन्नवाहती । तेचीजणूमीनतळपती । कच्छाकृतीधडेंशोभतीं । करपदशिररहित ॥३२॥

सांगप्रेतेवाहती । जणूआनंदेंक्रीडीती । उघडिल्यादंतपंक्ती । स्वर्गसुखप्रेमभरें ॥३३॥

टोंचितीतयागृध्रवरी । वाटेसमाधीदेहविसरी । गजशुंडानक्रापरी । देहत्यांचेगंडशिळा ॥३४॥

रथचक्रेध्वजवाहती । जलचरेतीनानाजाती । खरोष्ट्र अश्वादिवाहती । वाटेजातीपरतीरा ॥३५॥

केशशैवालपसरले । वीरतेथोनिघसरले । काळेंबोलावूंपाठविले । शस्त्रास्त्रदूतजयांशीं ॥३६॥

शेनगृध्रघारीबक । कोल्हेव्याघ्रचित्तेवृक । भूतेंप्रेतेंयक्षकंक । नदींतीरीक्रीडती ॥३७॥

असोएवंशस्त्रेंवर्षून । देवीमारीतसेसैन्य । चिक्षुरासीगदाहाणून । मूर्छितकेलारथावरी ॥३८॥

ताम्रयेतोंसापाहून । देवीबोलेगर्जोन । येसत्वरधावोन । यमपुरासधाडितें ॥३९॥

कायतुम्हांसीमारुन । वेगेंजाईपरतोन । तोपाठीवबलवान । मस्तटोणगामारीनमी ॥४०॥

ताम्रक्रोधेंखवळला । शरवर्षूलागला । चिक्षुरहीपुन्हाआला । सावधजाहलाद्विमुहूर्ते ॥४१॥

दोघेकरितीशस्त्रवृष्टी । निवारीमायसहदृष्टीं । तवताम्रेंयेऊनमुसलमुष्टी । केसरीशिरींताडिलें ॥४२॥

गर्जेहांसमेदोन्मत । आनंदेंपुढेंनाचत । अंबात्याचेंशिरकापित । खड्गप्रहारदेखता ॥४३॥

शिरपडलेंभूमंडळी । परीतोकबंधमहाबळी । क्षणएकफिरेरणमंडळी । मुसलहस्तपडियेला ॥४४॥

ताम्रपडलापाहून चिक्षुरधावेखड्गघेऊन । पांचशरसोडून । देवीवधीततयाशी ॥४५॥

खड्गछेदीएकशर । दुजाएकतोडीकर । तीनशरेंतोडिलेंशिर । चिक्षुरमरणपावला ॥४६॥

सैन्यसर्वभग्नझाले । किंचित्शेषजेंउरलें । दशदिशापळूंलागल । कळलेंसर्वरंभपुत्रा ॥४७॥

देववर्षतींसुमने । जयशब्दगर्जतीवचनें । इकडेमहिषेकोपानें । सैन्ययुद्धापाठविलें ॥४८॥

असिलोमाआणिबिडाल । पातलेदोघेरणमंडल । सैन्यहीपातलेविपुल । नम्रबोलेअसिलोमा ॥४९॥

म्हणेदेवीसुंदरीचतुरा । किमर्थमारिसिअसुरा । दयाटाकूनीअंतरा । किमर्थ आलीससांगिजे ॥५०॥

संधीकरीघेइच्छित । स्वस्थानासीजाईत्वरीत । वृथाकांमारिशीदैत्य । अपराधकाय आमुचा ॥५१॥

देवीम्हणेदैत्याऐक । मीसर्वत्रव्यापक । साधुधर्माचिरक्षक । अधर्महारिणीजाणिजे ॥५२॥

पीडिलेतुम्हीसुरनर । करितांबहुअधर्माचार । मजप्रार्थितीसुरभूसुर । धर्मरक्षणाकारणें ॥५३॥

जाणोनिमहिषदुराचार । पातलेकरायासंहार । सत्यजाणहानिर्धार । जाअथवाउभारहा ॥५४॥

अथवासांगमहिषासी । जरीसधीइच्छितोशी । त्वरेंजाईपाताळाशीं । देवद्रव्यटाकोनिया ॥५५॥

टाकोनियादेववैर । सुखेंराहेनिरंतर । बळीजेवीनिर्मत्सर । तेवीसुखेंअसावें ॥५६॥

वाक्यतियेचेऐकून । बिडाल आरंभीरण । देवीमारीतीनबाण । बिडालमरणपावला ॥५७॥

गदाघेऊनीधावला । असिलोमाबहुकोपला । सिंहमस्तकींताडिला । नखेंमारीतकेसरी ॥५८॥

सिंहमस्तकीचढूनी । चंडिकेसहाणीगदेकरुन । प्रहारत्याचाचुकऊन । खड्गेंछेदिलें शिरत्याचे ॥५९॥

सिंहेंसेनाभक्षिली । देवीसुमनवृष्टीकेली । वार्तादुष्टसीकळली । सवेंयुद्धपातला ॥६०॥

रथींज्याच्यासहस्त्रखर । रुपनटलामनोहर । सैन्यघेऊनीअपार । रणभूमीपतला ॥६१॥

त्रेसष्टश्लोकएकशत । शत्रुसैन्य अंबानाशित । सुरसतिचेचरित । तीचसांगेकृपेनें ॥६२॥

देवीविजये पंचमस्कंदेमहिषोपाख्यानेमहिषागमनोन्नामतुर्थोध्ययः ॥४॥   

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP